चैत्रशुक्लपंचमीकल्पादिः तदुक्तंहेमाद्रौमात्स्ये ब्रह्मणोयादिनस्यादिः कल्पादिः साप्रकीर्तिता वैशाखस्यतृतीयायाकृष्णायाफाल्गुनस्यच पंचमीचैत्रमासस्यतथैवांत्यातथापरा शुक्लात्रयोदशीमाघेकार्तिकस्यतुसप्तमी नवमीमार्गशीर्षस्यसप्तैताः संस्मराम्यहं कल्पानामादयोह्येतादत्तस्याक्षयकारकाः अत्रसर्वोपिनिर्णयोमन्वादिवज्ज्ञेयः हेमाद्रौब्राह्मे शुक्लायामथपंचम्यांचैत्रेमासिशुभानना श्रीर्ब्रह्मलोकान्मानुष्यंसंप्राप्ताकेशवाज्ञया ततस्तांपूजयेत्तत्रयस्तंलक्ष्मीर्नमुंचति ।
चैत्रशुद्ध पंचमी ही कल्पादि तिथि होय, तेंच सांगतो - हेमाद्रींत - मत्स्यपुराणांत - “ ब्रह्मदेवाच्या दिवसाची जी आदि तिथि ती कल्पादि होय. त्या कल्पादि तिथि येणेंप्रमाणें - वैशाखशुद्ध तृतीया, फाल्गुनकृष्ण तृतीया, चैत्रशुद्ध पंचमी, चैत्रकृष्ण पंचमी, माघशुद्ध त्रयोदशी, कार्तिकशुद्ध सप्तमी, मार्गशीर्षशुद्ध नवमी ह्या सात तिथि कल्पादि होत. या तिथींचे ठायीं दान दिलें असतां तें अक्षय होतें. ” या तिथींचा सर्व निर्णय मन्वादितिथींसारखा जाणावा. हेमाद्रींत - ब्राह्मपुराणांत - “ चैत्रशुक्ल पंचमीस शुभानना लक्ष्मी विष्णूच्या आज्ञेनें ब्रह्मलोकापासून मनुष्यलोकीं आली, यास्तव तिचें पूजन त्या दिवशीं जो करितो त्याला ती लक्ष्मी सोडीत नाहीं. ”
चैत्रेशुक्लाष्टम्यांभवान्याउत्पत्तिः तत्रनवमीयुताग्राह्या अष्टमीनवमीयुक्तानवमीचाष्टमीयुतेतिब्रह्मवैवर्तात् अत्रभवानीयात्रोक्ताकाशीखंडे भवानींयस्तुपश्येतशुक्लाष्टम्यांमधौनरः नजातुशोकंलभतेसदानंदमयोभवेदिति अत्रैवाशोककलिकाप्राशनमुक्तंहेमाद्रौलैंगे अशोककलिकाश्चाष्टौयेपिबंतिपुनर्वसौ चैत्रेमासिसितेष्टम्यानंतेशोकमवाप्नुयुः प्राशनमंत्रस्तु त्वामशोकवराभीष्टंमधुमाससमुद्भवं पिबामिशोकसंतप्तोमामशोकंसदाकुर्विति अत्रविशेषः पृथ्वीचंद्रोदयेविष्णुः पुनर्वसुबुधोपेताचैत्रेमासिसिताष्टमी प्रातस्तुविधिवत्स्त्रात्वावाजपेयफलंलभेदिति तिथितत्त्वेकालिकापुराणे चैत्रेमासिसिताष्टम्यांयोनरोनियतेंद्रियः स्नायाल्लौहित्यतोयेषुसयातिब्रह्मणः पदं चैत्रंतुसकलंमासंशुचिः प्रयतमानसः लौहित्यतोयेयः स्नायात्सकैवल्यमवाप्नुयात् लौहित्योब्रह्मपुत्रः मंत्रस्तु ब्रह्मपुत्रमहाभागशंतनोः कुलसंभव अमोघागर्भसंभूतपापंलौहित्यमेहर ।
चैत्रशुद्ध अष्टमीस भवानीची उत्पत्ति झाली, त्याविषयीं ती अष्टमी नवमीयुक्त घ्यावी; कारण, ‘ अष्टमी नवमीयुक्त व नवमी अष्टमीयुक्त घ्यावी. ” असें ब्रह्मवैवर्त पुराणवचन आहे. काशीखंडांत या तिथिस भवानीयात्रा सांगितली आहे, ती अशी - “ जो मनुष्य चैत्रशुद्ध अष्टमीस भवानीचें दर्शन घेईल तो कदापि शोक पावणार नाहीं व सर्वकाल आनंदयुक्त होईल. ” याच तिथीचे ठायीं अशोककलिकाप्राशन सांगितलें आहे - हेमाद्रींत - लिंगपुराणांत - ‘‘ जे मनुष्य चैत्रशुद्ध अष्टमीस पुनर्वसुनक्षत्रावर असोगीच्या कळ्या आठ प्राशन करितील ते शोक पावणार नाहींत. ” प्राशनमंत्र - “ त्वामशोकवराभीष्टं मधुमाससमुद्भवं । पिबामिशोकसंतप्तोमामशोकंसदाकुरु ॥ ” येथें विशेष सांगतो - पृथ्वी चंद्रोदयांत विष्णु - “ पुनर्वसुनक्षत्र, बुधवार यांहीं युक्त चैत्रशुद्ध अष्टमीस प्रातःकाळीं यथाविधि स्नान केलें असतां वाजपेययज्ञाचें फळ प्राप्त होतें. ” तिथितत्त्वांत कालिकापुराणांत - “ चैत्रशुद्ध अष्टमीस जितेंद्रिय होऊन जो मनुष्य लौहित्य ( ब्रह्मपुत्र ) तीर्थांत स्नान करील तो ब्रह्मपदीं जाईल. जो पुरुष शुद्ध व नियतमन होऊन सारा चैत्रमहिना लौहित्यतीर्थोदकांत स्नान करील त्यास मोक्ष प्राप्त होईल. ” स्नानमंत्र - “ ब्रह्मपुत्रमहाभागशंतनोःकुलसंभव । अमोघागर्भसंभूतपापंलौहित्यमेहर ॥ ”
चैत्रशुक्लनवमीरामनवमी तदुक्तमगस्त्यसंहितायां चैत्रेनवम्यांप्राक् पक्षेदिवापुण्येपुनर्वसौ उदयेगुरुगौरांशोः स्वोच्चस्थेग्रहपंचके मेषेपूषणिसंप्राप्तेलग्नेकर्कटकाह्वये आविरासीत्सकलयाकौशल्यायांपरः पुमान् तस्मिन्दिनेतुकर्तव्यमुपवासव्रतंसदा तत्रजागरणंकुर्याद्रघुनाथपरोभुवीति इयंचमध्याह्नयोगिनीग्राह्या चैत्रशुक्लेतुनवमीपुनर्वसुयुतायदि सैवमध्याह्नयोगेनमहापुण्यतमाभवेदितितत्रैवोक्तेः तथा चैत्रमासेनवम्यांतुजातोरामः स्वयंहरिः पुनर्वस्वृक्षसंयुक्तासातिथिः सर्वकामदा श्रीरामनवमीप्रोक्ताकोटिसूर्यग्रहाधिका तथा केवलापिसदोपोष्यानवमीशब्दसंग्रहात् तस्मात्सर्वात्मनासर्वैः कार्यंवैनवमीव्रतम् ।
चैत्रशुद्ध नवमी ही रामनवमी. तें सांगतो - अगस्त्यसंहितेंत - ‘‘ चैत्रशुद्ध नवमीस दिवसास पुण्य पुनर्वसुनक्षत्रीं गुरु व चंद्र हे लग्नीं असतां व पांचग्रह उच्चीचे असतां, मेषास सूर्य असतां कर्कलग्नीं कौसल्येचे ठायीं परपुरुष ( नारायण ) अंशानें प्रकट झाला; यास्तव त्या दिवशीं भूमीवर राहणारानें उपोषणव्रत नित्य करावें व रामतत्पर होऊन जागरण करावें ” ही नवमी मध्याह्नव्यापिनी घ्यावी; कारण, “ चैत्रशुद्ध नवमी पुनर्वसुयुक्त असेल तर तीच मध्याह्नीं महापुण्यकारक होते ” असें अगस्त्यसंहितेंतच सांगितलें आहे. तसेंच “ चैत्रमासीं नवमीस हरि स्वतः झाला, ती पुनर्वसुनक्षत्रानें युक्त सर्व मनोरथ देणारी होते. ही श्रीरामनवमी कोटि सूर्यग्रहणांहून अधिक आहे. ” तसेंच “ नवमी या शब्दावरुन ती तिथि केवळ ( पुनर्वसुरहित ) देखील उपोषणाला योग्य आहे. नक्षत्राचें प्रयोजन नाहीं, तस्मात् सर्वांनीं सर्वात्मभावानें नवमीव्रत करावें. ”
पूर्वेद्युरेवमध्याह्नयोगेकर्मकालव्याप्तेः सैवग्राह्या दिनद्वयेमध्याह्नव्याप्तौतदभावेवापूर्वदिनेपुनर्वस्वृक्षयुक्तामपित्यक्त्वापरैवकार्या तदुक्तंमाधवीयेऽगस्तिसंहितायां नवमीचाष्टमीविद्धात्याज्याविष्णुपरायणैः उपोषणंनवम्यांचदशम्यांचैवपारणमिति अष्टमीविद्धासऋक्षापिनोपोष्येतिमाधवः रामार्चनचंद्रिकायामपि विद्धैवचेदृक्षयुक्ताव्रतंतत्रकथंभवेत् विद्धानिषिद्धश्रवणान्नवमीचेतिवाक्यतः वैष्णवानांविशेषात्तुतत्रविष्णुपरैरपि दशम्यादिषुवृद्धिश्चेद्विद्धात्याज्यैववैष्णवैः तदन्येषांचसर्वेषांव्रतंतत्रैवनिश्चितमिति अत्रदशम्यादिषुवृद्धिश्चेदितितदन्येषामितिचवदन् यदाप्रातस्त्रिमुहूर्तानवमीदशमीचक्षयवशात्सूर्योदयात्प्रागेवसमाप्यतेतदास्मार्तानांतत्रैवएकादशीनिमित्तोपवासात् नवमीव्रतांगपारणालोपः स्यात् अतोऽष्टमीविद्धैवस्मार्तैः कार्या वैष्णवानांत्वरुणोदयविद्धैकादश्याहेयत्वान्नपारणालोपप्रसंग इतिद्वितीयैवतैः कार्येतिसूचयति दशमीवृद्ध्यभावेष्टमीविद्धाया एवमध्याह्नव्यापित्वेक्षयेचवैष्णवैरपिविद्धैवोपोष्येत्यर्थसिद्धम् ।
पूर्वदिवशीं मध्याह्नयोग असतां कर्मकालव्याप्ति आहे म्हणून तीच घ्यावी. दोनही दिवशीं मध्याह्नव्याप्ति असो किंवा दोन्हीं दिवशीं मध्याह्नव्याप्ति नसो, पूर्व दिवशीं पुनर्वसुयुक्त असली तरी ती सोडून पराच करावी, तें सांगतो - माधवीयांत अगस्तिसंहितेंत - “ विष्णुभक्तांनीं अष्टमीविद्ध नवमी टाकावी. नवमीस उपोषण करुन दशमीस पारणा करावी. ” अष्टमीनें विद्ध नवमी पुनर्वसुनक्षत्रयुक्त असली तरी तीस उपोषण करुं नये, असें माधव सांगतो. रामार्चनचंद्रिकेंतही “ अष्टमीविद्धाच पुनर्वसु नक्षत्रयुक्त असली तर तिचे ठायीं व्रत कसें होईल ? कारण, अष्टमीविद्ध नवमी निषिद्ध असें पूर्वीच्या ‘ नवमी चाष्टमी० ’ या वाक्यानें सांगितलें आहे, म्हणून वैष्णवांस स्मार्तांहून विशेष असल्यामुळें विष्णुपर अशा वैष्णवांनीं दशम्यादिकांची वृद्धि असेल तर विद्धा सोडावीच. वैष्णवांवांचून इतर सर्वांस अष्टमीविद्ध नवमीदिवशींच व्रत निश्चित होय. ” येथें वरील वाक्यांत ‘ जर दशम्यादिकांची वृद्धि असेल तर वैष्णवांनीं विद्ध टाकावी व त्यांहून ( वैष्णवांवांचून ) अन्यांनीं करावी ’ असें सांगितलें, यावरुन जेव्हां प्रातःकाळीं त्रिमुहूर्त नवमी असून दशमी, क्षयवशात् सूर्योदयापूर्वींच समाप्त होईल तेव्हां स्मार्तांस एकादशीनिमित्तक उपवासामुळें त्या ठिकाणीं नवमीव्रताचा पारणालोप होईल, म्हणून अष्टमीविद्धाच स्मार्तांनीं करावी. वैष्णवांस तर अरुणोदयविद्ध एकादशी त्याज्य असल्यामुळें पारणालोपप्रसंग येत नाहीं, यास्तव त्यांनीं ( वैष्णवांनीं ) दुसरे दिवशींच करावी असें सुचविलें आहे. दशमीची वृद्धि नसून अष्टमीविद्ध नवमीच
मध्याह्नव्यापिनी असेल किंवा क्षय असेल तर वैष्णवांनींही विद्ध नवमीसच उपोषण करावें असें अर्थात् सिद्ध होतें.
इदंचव्रतंसंयोगपृथक्त्वन्यायेनकाम्यंनित्यंच तदुक्तंहेमाद्रावगस्तिसंहितायां उपोषणंजागरणंपितृनुद्दिश्यतर्पणं तस्मिन्दिनेतुकर्तव्यंब्रह्मप्राप्तिमभीप्सुभिः सर्वेषामप्ययंधर्मोभुक्तिमुक्त्यैकसाधनः अशुचिर्वापिपापिष्ठः कृत्वेदंव्रतमुत्तमं पूज्यः स्यात्सर्वभूतानांयथारामस्तथैवसः यस्तुरामनवम्यांतुभुंक्तेमोहाद्विमूढधीः कुंभीपाकेषुघोरेषुपच्यतेनात्रसंशयः तथा अकृत्वारामनवमीव्रतंसर्वव्रतोत्तमं व्रतान्यन्यानिकुरुतेन तेषांफलभाग्भवेत् प्राप्तेश्रीरामनवमीदिनेमर्त्योविमूढधीः उपोषणंनकुरुतेकुंभीपाकेषुपच्यते अत्रकेचित् तदुपासकानामेवेदंव्रतंनित्यंनत्वन्येषामित्याहुः अन्येतु अकरणेदोषश्रवणात् तस्मात्सर्वात्मनासर्वैः कार्यंवैनवमीव्रतमितिपूर्वोक्तवचनाच्च जन्माष्टम्यादिवदिदमपिसर्वेषांनित्यं अन्यथाजन्माष्टम्यादावपितदुपासकानामेवनित्यतांवक्तुः कोवारयितेत्याहुः ।
हें व्रत संयोगपृथक्त्वन्यायानें काम्य व नित्यही आहे. तें हेमाद्रींत अगस्त्यसंहितेंत सांगतो - “ ब्रह्मप्राप्ति इच्छिणार्यांनीं
रामनवमीस उपोषण व जागरण, पितरांच्या उद्देशानें तर्पण हीं करावीं, हा सर्वांना भुक्तिमुक्तिसाधन करणारा धर्म
होय. अशुद्ध किंवा पापी असेल तोही हें उत्तम व्रत करुन सर्व भूतांस पूज्य जसा राम तसाच तो होतो. जो मूर्ख मनुष्य
रामनवमीस मोहानें ( अज्ञानानें ) भोजन करतो तो कुंभीपाक नरकास जातो यांत संशय नाहीं. ” तसेंच. “ सर्व व्रतोत्तम
असें रामनवमीव्रत न करितां अन्य व्रतें करील तर त्या व्रतांचें त्यास फल प्राप्त होणार नाहीं. श्रीरामनवमीदिवस प्राप्त झाला
असतां जो मूर्ख मनुष्य उपोषण करीत नाहीं तो कुंभीपाकनरकांत पडतो. ” एथें कोणी ग्रंथकार - हें व्रत रामोपासकांसच
नित्य आहे, इतरांस नाहीं, असें म्हणतात. अन्यग्रंथकार तर, अकरणीं दोषश्रवण असल्यामुळें व ‘ सर्वांनीं सर्वभावानें रामनवमीव्रत करावें ’ असें पूर्वी वचन सांगितल्या वरुनही जन्माष्टमीप्रभृति व्रतासारखें हेंही व्रत सर्वांस नित्य आहे.
असें नसेल तर जन्माष्टम्यादिव्रतही कृष्णोपासकांसच नित्य, इतरांस नित्य नाहीं, असें बोलणाराचें कोण निवारण
करील ? असें सांगतात.
अत्रविशेषोहेमाद्रावगस्त्यसंहितायां आचार्यंचैवसंपूज्यवृणुयात्प्रार्थयेन्निशि श्रीरामप्रतिमादानंकरिष्येहंद्विजोत्तम भक्त्याचार्योभवप्रीतः श्रीरामोसित्वमेवच तथा स्वगृहेचोत्तरेदेशेदानस्योज्ज्वलमंडपं शंखचक्रहनूमद्भिः प्राग्द्वारेसमलंकृतं गरुत्मच्छार्ड्गबाणैश्चदक्षिणेसमलंकृतं गदाखड्गांगदैश्चैवपश्चिमेसुविभूषितं पद्मस्वस्तिकनीलैश्चकौबेरेसमलंकृतं मध्येहस्तचतुष्काढ्यंवेदिकायुक्तमायतं ततः संकल्पयेद्देवंराममेवस्मरन्मुनेअस्यांरामनवम्यांचरामाराधनतत्परः उपोष्याष्टसुयामेषुपूजयित्वायथाविधि इमांस्वर्णमयींरामप्रतिमांचप्रयत्नतः श्रीरामप्रीतयेदास्येरामभक्तायधीमते प्रीतोरामोहरत्वाशुपापानिसुबहूनिमे अनेकजन्मसंसिद्धान्यभ्यस्तानिमहांतिच ततः स्वर्णमयींरामप्रतिमांपलमात्रतः निर्मितांद्विभुजांदिव्यांवामांकस्थितजानकीम् बिभ्रतींदक्षिणकरेज्ञानमुद्रांमहामुने वामेनाधः करेणाराद्देवीमालिंग्यसंस्थिताम् सिंहासनेराजतेत्रपलद्वयविनिर्मिते तथा अशक्तोयोमहाभागः सतुवित्तानुसारतः पलेनार्धतदर्धार्धतदर्धार्धेनवामुने सौवर्णंराजतंवापिकारयेद्रघुनंदनम् पार्श्वेभरतशत्रुघ्नौधृतच्छत्रकरावुभौ चापद्वयसमायुक्तंलक्ष्मणंचापिकारयेत् दक्षिणांगेदशरथंपुत्रावेक्षणतत्परम् मातुरंकगतंराममिंद्रनीलसमप्रभम् पंचामृतस्नानपूर्वंसंपूज्यविधिवत्ततः कौशल्यामंत्रस्तु रामस्यजननीचासिरामरुपमिदंजगत् अतस्त्वांपूजयिष्यामिलोकमातर्नमोस्तुते नमोदशरथायेतिपूजयेत्पितरंततः अत्रदशावरणपंचावरणादिपूजाऽन्यत्रज्ञेया अशोककुसुमैर्युक्तमर्घ्यंदद्याद्विचक्षणः दशाननवधार्थायधर्मसंस्थापनायच राक्षसानांविनाशायदैत्यानांनिधनायच परित्राणायसाधूनांजातोरामः स्वयंहरिः गृहाणार्घ्यंमयादत्तंभ्रातृभिः सहितोनघ पुष्पांजलिंपुनर्दत्वायामेयामेप्रपूजयेत् दिवैवंविधिवत्कृत्वारात्रौजागरणंततः ततःप्रातः समुत्थायस्नानसंध्यादिकाः क्रियाः समाप्यविधिवद्रामंपूजयेद्विधिवन्मुने ततोहोमंप्रकुर्वीतमूलमंत्रेणमंत्रवित् पूर्वोक्तपद्मकुंडेवास्थंडिलेवासमाहितः लौकिकाग्नौविधानेनशतमष्टोत्तरंततः साज्येनपायसेनैवस्मरन्राममनन्यधीः ततोभक्त्यासुसंतोष्यआचार्यंपूजयेन्मुने ततोरामंस्मरन्दद्यादेवंमंत्रमुदीरयेत् इमांस्वर्णमयींरामप्रतिमांसमलंकृताम् चित्रवस्त्रयुगच्छन्नांरामोहंराघवायते श्रीरामप्रीतयेदास्येतुष्टोभवतुराघवः इतिदत्वाविधानेनदद्याद्वैदक्षिणांभुवम् ब्रह्महत्यादिपापेभ्योमुच्यतेनात्रसंशयइति ।
येथें विशेष विधि हेमाद्रींत अगस्त्यसंहितेंत सांगितला तो असा - ‘‘ रात्रीं आचार्याला वरुन त्याचें पूजन करुन “ श्रीरामप्रतिमादानं करिष्येहं द्विजोत्तम । भक्त्याचार्यो भव प्रीतः श्रीरामोसि त्वमेव च ॥ ” अशी प्रार्थना करावी. ” तसेंच “ स्वगृहीं उत्तरभागीं प्रतिमादानासाठीं सुंदर मंडप करुन तो पूर्वद्वारीं शंख, चक्र व हनूमान् यांहीं अलंकृतः दक्षिणद्वारीं गरुड, शार्ड्गधनुष्य, बाण यांही अलंकृत; पश्चिमद्वारीं गदा, खड्ग, अंगद यांहीं विभूषित; उत्तरद्वारीं कमल, स्वस्तिक, नील यांहीं अलंकृत अशा मंडपामध्यें चारहातांची विस्तीर्ण वेदि करावी. नंतर रामाचेंच स्मरण करुन उपोषणाचा संकल्प करावा. संकल्पाचा मंत्र - उपोष्ये नवमीं त्वद्य यामेष्वष्टसु राघव । तेन प्रीतो भवत्वं मे संसारात् त्राहिमांहरे ॥ ह्या मंत्रानें रामनवमीस रामाराधनतत्पर होऊन आठप्रहर उपोषण करुन रामप्रतिमेचें यथाविधि पूजन करुन नंतर प्रतिमादान करावें. दानाचा मंत्र - इमां स्वर्णमयीं रामप्रतिमां च प्रयत्नतः । श्रीरामप्रीतये दास्ये रामभक्ताय धीमते ॥ प्रीतो रामो हरत्वाशु पापानि सुबहूनि मे । अनेकजन्मसंसिद्धान्यभ्यस्तानि महांति च ॥ दानाचा विधि - एकपल ( चारकर्ष ) सुवर्णानें निर्माण केलेली, दोन, भुजांची, सुंदर, डाव्या मांडीवर सीता व उजव्या हातांत ज्ञानमुद्रा धारण करणारी, डाव्या हस्तानें सीतेला आलिंगणारी व दोनपलमित रुप्याच्या सिंहासनीं बसलेली अशी प्रतिमा करावी. अथवा अशक्त ( द्रव्यहीन ) असेल तर त्यानें आपल्या द्रव्यानुसार पलाची ( चारतोळ्यांची ), दोन कर्षांची, एक कर्षाची, किंवा अर्धकर्षाची करावी. सोन्याची किंवा रुप्याची रामचंद्रप्रतिमा करावी. दोहोंबाजूंस छत्र धरणारे असे भरत व शत्रुघ्न करावे. दोन धनुष्यांनीं युक्त असा लक्ष्मण करावा. उजव्या अंगास रामाकडे दृष्टि ठेवणारा असा दशरथ करावा. मातेच्या मांडीवर बसलेला, इंद्रनीलमण्यासारखा नीलवर्ण अशा रामाचें पंचामृतस्नानपूर्वक शास्त्रोक्त विधीनें पूजन करावें. कौसल्येच्या पूजनाचा मंत्र - “ रामस्य जननी चासि रामरुपमिदं जगत् । अतस्त्वां पूजयिष्यामि लोकमातर्नमोस्तु ते ॥ ” नंतर ‘ दशरथाय नमः ’ ह्या नाममंत्रानें दशरथाची पूजा करावी. येथें दशावरण व पंचावरणादि पूजा सांगितली आहे ती अन्यग्रंथीं पहावी. “ नंतर अशोकपुष्पांनीं युक्त असें अर्घ्य द्यावें. अर्घ्याचा मंत्र - दशाननवधार्थाय धर्मसंस्थापनाय च । राक्षसानां विनाशाय दैत्यानां निधनाय च ॥ परित्राणाय साधूनां जातो रामः स्वयं हरिः ॥ गृहाणार्घ्यं मया दत्तं भ्रातृभिः सहितोऽनघ ॥ या मंत्रानें अर्घ्य देऊन पुनः पुष्पांजलि द्यावी. याप्रमाणें प्रहराप्रहराचे ठायीं पूजन करावें. याप्रमाणें दिवसास पूजन करुन रात्रीस जागरण करावें. नंतर प्रातःकाळीं उठून स्नानसंध्यादि कर्मै समाप्त करुन रामाचें यथाविधि पूजन करावें. नंतर मूलमंत्रानें होम करावा. पूर्वोक्त ( अगस्तिसंहितेंत उक्त ) पद्मकुंडांत अथवा स्थंडिलावर लौकिकाग्नींत यथाविधि अष्टोत्तरशत आज्यसहित पायसानें रामस्मरण करीत होम करावा. नंतर भक्तीनें आचार्यानें पूजन करुन त्याला संतुष्ट करावें. नंतर रामस्मरण करुन या ( पुढील ) मंत्राचा उच्चार करुन रामप्रतिमादान करावें. दानाचा मंत्र - इमां स्वर्णमयीं रामप्रतिमां समलंकृताम् । चित्रवस्त्रयुगच्छन्नां रामोहं राघवाय ते ॥ श्रीरामप्रीतये दास्ये तुष्टो भवतु राघवः ॥ या मंत्रानें प्रतिमा दान देऊन भूमि दक्षिणा द्यावी. तेणेंकरुन ब्रह्महत्यादिपापांपासून मुक्त होतो यांत संशय नाहीं. ”
इयंमलमासेनकार्या सुजप्तमप्यजप्तंस्यान्नोपवासः कृतोभवेदिति नकुर्यान्मलमासेतुमहादानव्रतानिचेतिच माधवीयेसंग्रहवचनात् ननुरामनवमीव्रतस्यनित्यत्वादेकादशीवन्मलमासेपिकर्तव्यतास्यादितिचेत् अत्रब्रूमः नैकादश्युपवासस्यव्रतत्वेनप्राप्तिः किंतु एकादश्यांनभुंजीतपक्षयोरुभयोरपीत्यादिनिषेधस्यमलमासेपिपालनीयत्वात्कृष्णैकादश्यांपुत्रवद्गृहिण इवार्थादुपवासः प्रसज्यते नत्विहतथेतिव्रतत्वेनप्राप्तिर्वाच्या साचनिषिद्धेत्यप्रसंगः स्पष्टमासविशेषाख्याविहितंवर्जयेन्मल इतिनिषेधाच्च एवंजन्माष्टम्यादावपिबोद्धव्यं इति रामनवमी ।
ही रामनवमी मलमासांत करुं नये; कारण, “ मलमासांत उत्तम जप केला तरी तो न केल्यासारखा व उपवास केला तरी न केल्यासारखा होतो ” असें व “ महादानें, व्रतें हीं मलमासामध्यें करुं नयेत ” असेंही माधवाच्या ग्रंथांत संग्रह वचन आहे. शंका - रामनवमी हें व्रत नित्य असल्यामुळें एकादशीसारखें मलमासांतही कर्तव्य आहे असें कोणी म्हणेल तर त्याविषयीं सांगतों. एकादशीच्या उपवासाची व्रतत्वेंकरुन प्राप्ति नाहीं, तर दोह्नीं पक्षांतील एकादशीस भोजन करुं नये. ” इत्यादि वचनानें जो भोजन निषेध केला तो मलमासांतही पालन करणें अवश्य आहे, म्हणून कृष्णैकादशीस पुत्रवान् गृह स्थाला जसा उपवास येतो तसा मलमासांतील एकादशीस अर्थात् उपवास प्राप्त होतो तसा ह्या नवमीव्रताचे ठायीं उपवास प्राप्त होत नाहीं. येथें व्रतत्वेंकरुन प्राप्ति सांगितली पाहिजे, ती तर मलमासांत निषिद्ध आहे, यास्तव ह्या स्थलीं त्याचा प्रसंग नाहीं. आणि “ विशेषमासाचें स्पष्ट नांव घेऊन विहित जें कर्म तें मलमासामध्यें वर्ज्य करावें. ” असा निषेधही आहे, यास्तव मलमासांत हें नवमीव्रत करुं नये. याप्रमाणें जन्माष्टमी इत्यादि स्थलींही निर्णय समजावा. इतिरामनवमी.
चैत्रशुक्लैकादश्यांदोलोत्सव उक्तोब्राह्मे चैत्रमासस्यशुक्लायामेकादश्यांतुवैष्णवैः आंदोलनीयोदेवेशः सलक्ष्मीकोमहोत्सवैरिति चैत्रशुक्लद्वादश्यांदमनोत्सवः द्वादश्यांचैत्रमासस्यशुक्लायांदमनोत्सवः बौधायनादिभिः प्रोक्तः कर्तव्यः प्रतिवत्सरमितिरामार्चनचंद्रिकोक्तेः ऊर्जेव्रतंमधौदोलाश्रावणेतंतुपूजनं चैत्रेचदमनारोपमकुर्वाणोव्रजत्यध इतितत्रैवपाद्मवचनाच्च शिवभक्तादिभिस्तुचतुर्दश्यादौकार्यं तत्रस्यात्स्वीयतिथिषुवह्न्यादेर्दमनार्पणमितितत्रैवोक्तेः ज्योतिः प्रकाशेपि स्वस्वदेवप्रतिष्ठायांमंत्रसंग्रहणेतथा पवित्रदमनारोपेग्राह्यातत्तत्तिथिर्बुधैः तिथयस्तु वह्निर्विरिंच्योगिरिजागणेशः फणीविशाखोदिनकृन्महेशः दुर्गांतको विश्वहरिः स्मरश्चशर्वः शशीचेतितिथीषुपूज्या इत्युक्ताः ।
चैत्रशुक्लैकादशीस दोलोत्सव सांगितला. ब्रह्मपुराणांत - “ चैत्रमासाचे शुक्लएकादशीस वैष्णवांनीं मोठ्या उत्साहानें लक्ष्मीसहित विष्णूचें आंदोलन करावें. ” चैत्रशुक्ल द्वादशीस दमनोत्सव ( दवण्यानें पूजा ) करावा; कारण, “ चैत्रशुद्ध द्वादशीस विष्णूचा दमनोत्सव बौधायनादिकांनीं सांगितला, तो प्रतिवर्षी करावा. ” असें रामार्चनचंद्रिकेंत वचन आहे. आणि “ कार्तिकमासीं व्रत, चैत्रमासीं दोलोत्सव, श्रावणांत तंतुपूजन ( पवित्रारोपण ), चैत्रमासीं दमनारोपण ( दवण्यानें पूजा ) हीं न करणारा नरकास जातो. ” असें तेथेंच पद्मपुराणवचनही आहे. शिवभक्तादिकांनीं तर चतुर्दश्यादितिथींस दमनारोपण करावें; कारण, “ स्वीय तिथींस ( म्हणजे ज्या देवतेची जी तिथि असेल त्या तिथीस ) अग्न्यादि देवतांना दमनार्पण करावें; असें येथेंच सांगितलें आहे. ज्योतिःप्रकाशांतही “ ज्या ज्या देवतेची देवप्रतिष्ठा, मंत्रग्रहण, पवित्रा रोपण व दमनारोपण हीं करावयाचीं असतील त्या त्या देवतेची तिथि घ्यावी. ” तिथींच्या देवता सांगतो - “ अग्नि, ब्रह्मा, गौरी, गणेश, सर्प, स्कंद, सूर्य, महेश, दुर्गा, अंतक ( यम ), विश्वेदेव, हरि, मदन, शिव, चंद्र, ह्या अनुक्रमानें प्रतिपदादि तिथींच्या देवता होत. ”