द्वितीय परिच्छेद - श्रावणमास
निर्णयसिंधु ग्रंथामध्ये कोणत्या कर्माचा कोणता काल, याचा मुख्यत्वेकरून निर्णय केलेला आहे.
कर्कसंक्रांतौपूर्वंत्रिंशद्दंडाः पुण्यकालः सूर्योदयोत्तरंसंक्रमेतुपरतएवपुण्यं रात्रौतुनिशीथात्प्राक्परतश्चसंक्रमेऽपरार्कहेमाद्यनंतभट्टादिमतेपूर्वोत्तरदिनयोः पंचनाड्यः पुण्यकालः धनुर्मीनावतिक्रम्यकन्यांचमिथुनंतथा पूर्वापरविभागेनरात्रौसंक्रमतेरविः दिनांतेपंचनाड्यस्तुतदापुण्यतमाः स्मृताः उदयेपितथापंचदैवेपित्र्येचकर्मणीतिस्कांदोक्तेः पूर्वापरविभागेनेतिमकरकर्कभिन्नसंक्रांतिपरं वक्ष्यमाणवचोविरोधादित्युक्तं मदनरत्ने तेनायमर्थः रात्रौपूर्वभागेमकरे उदयेपंचनाड्यः पुण्यकालः रात्रावपरभागेकर्कटेदिनांतेपंचनाड्यः पुण्यकालः विषुवतोस्तु पूर्वदिनेपंचापरदिनेचपंचेतिवाक्यांतरानुरोधात् तेनहेमाद्रिमाधवयोः सर्ववचनानांचाविरोधः माधवमते अर्धरात्रेतदूर्ध्वंवासंक्रांतौदक्षिणायने पूर्वमेवदिनंग्राह्यंयावन्नोदयतेरविरिति वृद्धगार्ग्योक्तेः मिथुनात्कर्कसंक्रांतिर्यदिस्यादंशुमालिनः प्रभातेवानिशीथेवातदापुण्यंतुपूर्वत इतिभविष्योक्तेश्चपूर्वदिनएवपुण्यं दाक्षिणात्यास्त्वेतदेवाद्रियंते अत्ररात्रावपिस्नानादिभवतीत्युक्तंप्राक् अत्रदानोपवासादिपूर्वमुक्तं तथाकर्केकेशादिकर्तनंनिषिद्धं कुंभेकर्कटकेवापिकन्यायांकार्मुकेरवौ रोमखंडंगृहस्थस्यपितृन्प्राशयतेयम इति सुमंतुवचनादित्युक्तं जीवत्पितृकनिर्णयेगुरुभिः ॥
आतां श्रावणमास - कर्कसंक्रांतीचे ठायीं पूर्वीच्या तीस घटिका पुण्यकाळ होय. सूर्योदयानंतर संक्रांति झाली तर पुढेंच पुण्यकाळ. रात्रीं तर मध्यरात्रीच्या पूर्वी किंवा नंतर संक्रांत असतां अपरार्क, हेमाद्रि व अनंतभट्ट इत्यादिकांचे मतीं पूर्व व उत्तर असा दोन दिवशीं पांच पांच घटिका पुण्यकाळ. कारण, “ धनु, मीन, कन्या, मिथुन, या संक्रांती सोडून पुढील संक्रांतींस रात्रीच्या पूर्वभागीं सूर्य जाईल तर पूर्वदिवसाचे अंती पांच घटिका पुण्यकाळ. आणि रात्रीच्या अपरभागीं सूर्य जाईल तर परदिवसाच्या सूर्योदयकालीं पांच घटिका पुण्यकाळ दैव पित्र्य कर्माविषयीं जाणावा. ” असें स्कंदपुराणवचन आहे. “ पूर्वापरविभागेंकरुन ” असें जें वरील वचनांत म्हटलें तें मकर व कर्क या संक्रांतीवांचून इतर संक्रांतींविषयक होय. कारण, मकर व कर्क यांविषयींही म्हटलें तर पुढें सांगावयाच्या वचनाचा विरोध येईल असें मदनरत्नांत सांगितलें आहे. त्यावरुन असा अर्थ होतो कीं, रात्रीच्या पूर्वभागीं मकरसंक्रांति होईल, तर परदिवशीं सूर्योदयीं पांच घ० पुण्यकाळ. रात्रीच्या उत्तरभागीं कर्कसं० तर पूर्वदिवसाच्या अंतीं पांच घ० पुण्यकाळ. विषुवसंक्रांतीचा तर पूर्वदिवशीं पांच व पुढील दिवशीं पांच घटिका असा अन्य वाक्यांच्या अनुरोधानें अर्थ समजावा. तेणेंकरुन हेमाद्रि, माधव व इतर सर्ववचनांची एकवाक्यता होऊन विरोध नाहींसा होतो. माधवमतीं तर अर्धरात्रीं किंवा त्यापुढें संक्रांत झाली असतां दक्षिणायनाचेठायीं पूर्वच दिवस पुण्यकाळ घ्यावा. कारण, “ जोंपर्यंत सूर्योदय झाला नाहीं ” असें वृद्धगार्ग्याचें वचन आहे व “ सूर्याची मिथुनापासून कर्कसंक्रांति जर प्रातःकालीं किंवा मध्यरात्रीं होईल तर पूर्वी पुण्यकाळ ” असें भविष्यवचनही आहे. म्हणून पूर्वदिवशींच पुण्यकाळ होतो. दक्षिणदेशीयलोक तर या पक्षाचाच स्वीकार करतात. या पुण्यकाळीं रात्रीसही स्नानदानादि करावें असें पूर्वी सांगितलें आहे. ह्या संक्रांतीचेठायीं दान उपवासादिक करणें तें पूर्वी ( प्रथमपरिच्छेदांत ) सांगितलें आहे. तसेंच कर्कसंक्रांतिस्थ रवि असतां केशादिकांचें वर्तन ( कापणें ) करुं नये. कारण, ‘‘ कुंभ, कर्क, कन्या, धनु, यांस रवि असतां जर केशादिकर्तन केलें तर गृहस्थाचे रोमखंड पितरांकडून यम खाववितो ” असें सुमंतुवचन आहे असें जीवत्पितृकनिर्णयांत गुरुंनीं सांगितलें आहे.
N/A
References : N/A
Last Updated : May 28, 2013
TOP