वैशाखशुक्लचतुर्दशी नृसिंहजयंती साप्रदोषव्यापिनीग्राह्या तदुक्तंहेमाद्रौनृसिंहपुराणे वैशाखेशुक्लपक्षेतुचतुर्दश्यांनिशामुखे मज्जन्मसंभवंपुण्यंव्रतंपापप्रणाशनं वर्षेवर्षेतुकर्तव्यंममसंतुष्टिकारणमिति दिनद्वयेपितव्द्याप्तावंशतः समव्याप्तौचपरा विषमव्याप्तौत्वधिकव्याप्तिमती दिनद्वयेप्यव्याप्तौपरा परदिनेगौणकालव्याप्तेः सत्त्वात् पूर्वदिनेचतदभावात् यत्तु ततोमध्याह्नवेलायांनद्यादौविमलेजले इत्युपक्रम्य परिधाय ततोवासोव्रतकर्मसमारभेदितितत्रैवोक्तं तत्संकल्परुपव्रतोपक्रमविषयं नत्वेतावतामध्याह्नव्यापिनीग्राह्येति भ्रमितव्यं पूर्वोक्तवचनविरोधात् वैशाखस्यचतुर्दश्यांसोमवारेनिलर्क्षके अवतारोनृसिंहस्यप्रदोषसमयेद्विजाइतिटोडरानंदेस्कांदात् कूर्मः सिंहोबौद्धकल्कींचसायमिति पूर्वोक्तपुराणसमुच्चयवचनाच्चेतिकेचित् तत्त्वंतुपूर्ववचसामनाकरत्वेननिर्मूलत्वात् हेमाद्रौनृसिंहपुराणे मज्जन्मसंभवंपुण्यंव्रतंपापप्रणाशनमित्युपक्रम्य स्वातीनक्षत्रयोगेचशनिवारेतुमद्रतं सिद्धयोगस्यसंयोगेवणिजेकरणेतथा पुंसांसौभाग्ययोगेनलभ्यते दैवयोगतः सर्वैरेतैस्तुसंयुक्तंहत्याकोटिविनाशनं एतदन्यतरेयोगेमद्दिनंपापनाशनं केवलेपिप्रकर्तव्यंमद्दिनेव्रतमुत्तमं अन्यथानरकंयातियावच्चंद्रदिवाकरावित्युक्त्वा ततोमध्याह्नवेलायांनद्यादौविमलेजलेइत्यादिनामध्याह्नएवव्रतविधानाच्चतुर्दश्युत्तरार्धवणिजेकरणेमध्याह्नेचस्पष्टंजन्मप्रतीयते संध्यायांजन्मतुक्काप्यनुक्तेर्मौर्ख्यकृतंतद्वशान्निर्णयश्चहेयएवेति ।
वैशाखशुक्ल चतुर्दशी ही नृसिंहजयंती. ती प्रदोषव्यापिनी घ्यावी. तें सांगतो - हेमाद्रींत नृसिंहपुराणांत - “ वैशाखशुक्ल चतुर्दशीस प्रदोषकालीं माझें ( नृसिंहाचें ) जन्म झालें. तें पुण्यकारक, पापनाशक माझें व्रत प्रतिवर्षी करावें, तेणेंकरुन माझा संतोष होतो. ” दोनही दिवशीं प्रदोषव्याप्ति असतां किंवा अंशतः समव्याप्ति असतां परा करावी. दोन दिवशीं विषमव्याप्ति असेल तर अधिक व्याप्ति असेल ती घ्यावी. दोनही दिवशीं व्याप्ति नसेल तर परा घ्यावी; कारण, दुसर्या दिवशीं गौणकालीं ( संकल्पकालीं ) व्याप्ति आहे, व पूर्वदिवशीं व्याप्ति नाहीं. आतां जें “ मध्याह्नसमयीं नद्यादि स्वच्छ जलांत स्नान करुन - असा उपक्रम करुन सांगतो - वस्त्रधारण करुन व्रतकर्मास प्रारंभ करावा ” असें तेथेंच सांगितलें आहे, तें, संकल्परुप जो व्रतारंभ तद्विषयक होय. यावरुन मध्याह्नव्यापिनी घ्यावी, अशा भ्रमांत पडूं नये. कारण, पूर्वोक्त नृसिंहपुराणवचनाशीं विरोध येईल. आणि “ वैशाखशुक्ल चतुर्दशीस सोमवार व स्वाती नक्षत्र यांचा योग असतां प्रदोषसमयीं नृसिंहाचा अवतार झाला ” असें टोडरानंदांत स्कंदपुराणवचन आहे. आणि “ कूर्म, नृसिंह, बौद्ध, कल्की हे सायंकालीं अवतीर्ण झाले ” असें पूर्वी चैत्रमासीं पुराणसमुच्चयवचनही सांगितलें आहे, असें केचित् म्हणतात. खरा प्रकार म्हटला तर, पूर्वींचीं वचनें मोठ्या प्रसिद्ध निबंधांत उपलब्ध नसल्यामुळें निर्मूल असल्याकारणानें; आणि हेमाद्रींत नृसिंहपुराणांत - “ माझ्या जन्मानें उत्पन्न पुण्यव्रत पापनाशक आहे ” असा उपक्रम करुन “ स्वातीनक्षत्र, शनिवार, सिद्धयोग, वणिजकरण यांचा योग असतां तें व्रत पुरुषांना सौभाग्ययोगानें व दैवयोनानें प्राप्त होतें. या सर्व योगांनीं युक्त असें माझें व्रत कोटिहत्या नाश करणारें होतें. यांतून एकादाही योग जरी असेल तथापि तो माझा दिवस पापनाश करणारा होय. ( केवल योगरहित ) ही माझ्या दिवशीं हें उत्तम व्रत करावें, न करतील तर चंद्र सूर्य आहेत तोंपर्यंत नरकाप्रत जातील. ” - असें सांगून “ नंतर मध्याह्नीं नदी इत्यादि स्वच्छजलामध्यें स्नान करावें ” इत्यादि वचनेंकरुन मध्याह्नींच व्रत सांगितल्यावरुन चतुर्दशीच्या उत्तरार्धी वणिजकरण येतें त्या वेळीं मध्याह्नीं जन्म आहे असें स्पष्ट प्रतीतीस येतें. संध्यासमयीं जन्म झालें असें तर कोणत्याही ग्रंथांत सांगितलें नसल्याकारणानें तें वचन मूर्खपणानें कोणीतरी केलेलें आहे यास्तव त्याला अनुसरुन जो निर्णय तोही त्याज्यच आहे.
तथाइयमेव योगविशेषेणातिप्रशस्ता तदुक्तंतत्रैव स्वातीनक्षत्रयोगेचशनिवारेचमद्र्वतं सिद्धयोगस्य संयोगेवणिजेकरणेतथा पुंसांसौभाग्ययोगेनलभ्यतेदैवयोगतः एभिर्योगैर्विनापिस्यान्मद्दिनंपापनाशनं सर्वेषामेववर्णानामधिकारोस्तिमद्र्वते मद्भक्तैस्तुविशेषेनकर्तव्यंमत्परायणैः तथा सिंहः स्वर्णमयोदेयोममसंतोषकारकः तथा विज्ञायमद्दिनंयस्तुलंघयेत्पापकृन्नरः सयातिनरकंघोरंयावच्चंद्रदिवाकरौ इदंचसंयोगपृथक्त्वन्यायेननित्यंकाम्यंच अथात्रविशेषः मध्याह्नेमृद्गोमयतिलामलकस्नानंकृत्वा नृसिंहदेवदेवेशतवजन्मदिनेशुभे उपवासंकरिष्यामिसर्वभोगविवर्जित इतिमंत्रेणसंकल्पंकृत्वा आचार्यंवृत्वासायंकाले हैमीतुतत्रमन्मूर्तिः स्थाप्यालक्ष्म्यास्तथैवच पलेनवातदर्धेनतदर्धार्धेनवापुनः यथाशक्तितथाकुर्याद्वित्तशाठ्यविवर्जित इत्युक्तं नृसिंहमूर्तिंशक्त्याकृतंसुवर्णसिंहंचकलशोपरिसंपूज्यरात्रौजागरणंकृत्वाप्रातः पुनः संपूज्य नृसिंहाच्युतदेवेशलक्ष्मीकांतजगत्पते अनेनार्चाप्रदानेनसफलाः स्युर्मनोरथाः इत्याचार्यायदत्वा मद्वंशेयेनराजातायेजनिष्यंतिचापरे तांस्त्वमुद्धरदेवेशदुस्तराद्भवसागरात् पातकार्णवमग्नस्यव्याधिदुःखांबुवारिभिः तीव्रैश्चपरिभूतस्यमहादुःखगतस्यमे करावलंबनंदेहिशेषशायिन् जगत्पते श्रीनृसिंहरमाकांतभक्तानांभयनाशन क्षीरांबुधिनिवासिंस्त्वंचक्रपाणेजनार्दन व्रतेनानेनदेवेशभुक्तिमुक्तिप्रदोभवेतिप्रार्थयेदितिसंक्षेपः ।
तशी हीच नृसिंहचतुर्दशी तिथि योगविशेषानें अतिप्रशस्त होय. तें तेथेंच सांगतो - “ स्वातीनक्षत्र, शनिवार, सिद्धयोग, वणिजकरण, यांच्या योगानें युक्त चतुर्दशी प्राप्त होईल तर तो महादैवयोग होय, कदाचित् हे पूर्वोक्त योग जरी नसले तथापि माझा जन्मदिवस पापनाशक आहे. सर्व वर्णांस माझ्या व्रताचा अधिकार आहे. माझे जे भक्त मत्परायण त्यांनीं तर अवश्य करावें, ” तसेंच “ सुवर्णाचा सिंह माझ्या संतोषार्थ द्यावा. ” तसेंच - “ जो मनुष्य माझा दिवस जाणून त्या दिवशीं उपोषणादि करीत नाहीं तो चंद्रसूर्य आहेत तोंपर्यंत घोर नरकार जातो. ” हें व्रत संयोगपृथक्त्वन्यायानें नित्य व काम्यही आहे. आतां या तिथीचे ठायीं विशेष विधि सांगतो. मध्याह्नीं मृत्तिका, गोमय, तिल, आंवळ्यांचा कल्क यांहीं स्नान करुन “ नृसिंह देवदेवेश तव जन्मदिने शुभे ॥ उपवासं करिष्यामि सर्वभोगविवर्जितः ” या मंत्रानें व्रताचा संकल्प करुन आचार्य वरुन सायंकालीं “ पलप्रमाण ( चार तोळे ) सुवर्णाची किंवा त्याचे अर्धानें अथवा अर्धाचे अर्धानें किंवा यथाशक्ति नृसिंह व लक्ष्मी यांची मूर्ति करुन स्थापन करावी. ” असें सांगितलें आहे. नृसिंहमूर्ति व शक्तीप्रमाणें केलेला सुवर्णसिंह यांची कलशावर पूजा करुन रात्रीं जागरण करुन प्रातःकालीं पुनः पूजा करुन “ नृसिंहाच्युत देवेश लक्ष्मीकांत जगत्पते ॥ अनेनार्चाप्रदानेन सफलाः स्युर्मनोरथाः ” या मंत्रानें ती मूर्ति आचार्यास द्यावी आणि “ मद्वंशे ये नरा जाता ये जनिष्यंति चापरे ॥ तांस्त्वमुद्धर देवेश दुस्तराद्भवसागरात् ॥ पातकार्णवमग्नस्य व्याधिदुःखांबुवारिभिः तीव्रैश्च परिभूतस्य महादुःखगतस्य मे ॥ करावलंबनं देहि शेषशायिन् जगत्पते ॥ श्रीनृसिंह रमाकांत भक्तानां भयनाशन ॥ क्षीरांबुधिनिवासिंस्त्वं चक्रपाणे जनार्दन ॥ व्रतेनानेन देवेश भुक्तिमुक्तिप्रदोभव ” या मंत्रांनीं प्रार्थना करावी. याप्रमाणें हें संक्षेपानें व्रत सांगितलें, असें समजावें.