तद्विधिश्चहेमाद्रौवह्निपुराणे नदीनांसंगमेस्नायादर्चयेदत्रवामनम् सौवर्णंवस्त्रसंयुक्तंद्वादशांगुलमुच्छ्रितम् ततोविधिवत्संपूज्य हिरण्मयेनपात्रेणदद्यादर्घ्यंप्रयत्नतः नमस्तेपद्मनाभायनमस्तेजलशायिने तुभ्यमर्घ्यंप्रयच्छामिबालवामनरुपिणे नमः कमलकिंजल्कपीतनिर्मलवाससे महाहरिवपुस्कंधधृतस्कंधायचक्रिणे नमः शार्ड्गसीरबाणपाणयेवामनायच यज्ञभुक् फलदात्रेचवामनायनमोनमः देवेश्वरायदेवायदेवसंभूतिकारिणे प्रभवेसर्वदेवानांवामनायनमोनमः एवंसंपूजयित्वातंद्वादश्यामुदयेरवेः शृंगारसहितंतंतुब्राह्मणायनिवेदयेत् वामनः प्रतिगृह्णातिवामनोहंददामिते वामनंसर्वतोभद्रंद्विजायप्रतिपादयेइति श्रवणयुतशुद्धैकादश्यलाभेतुदशमीविद्धापिश्रवणर्क्षयुताकार्या दशम्यैकादशीयत्रसानोपोष्याभवेत्तिथिः श्रवणेनतुसंयुक्तासाचेत्स्यात्सर्वकामदेति वह्निपुराणादित्युक्तंमदनरत्ने पूजाचमध्याह्नेकार्या अह्नोमध्येवामनोरामरामावितिपूर्वोक्तवचनात् ।
वामनव्रताचा विधि - हेमाद्रींत - वह्निपुराणांत - " नद्यांच्या संगमीं स्नान करुन या तिथीस सुवर्णमय , वस्त्रयुक्त , बारा अंगुळें उंच अशा वामनप्रतिमेचें पूजन करावें . तदनंतर यथाविधि पूजन करुन सौवर्णपात्रानें अर्घ्य द्यावें . त्याचा मंत्र - नमस्ते पद्मनाभाय नमस्ते जलशायिने ॥ तुभ्यमर्घ्यं प्रयच्छामि बालवामनरुपिणे ॥ नमः कमलकिंजल्कपीतनिर्मलवाससे ॥ महाहरिवपुस्कंधधृतस्कंधाय चक्रिणे ॥ नमः शार्ड्गसीरबाणपाणये वामनाय च ॥ यज्ञभुक् फलदात्रे च वामनाय नमो नमः
॥ देवेश्वराय देवाय देवसंभूतिकारिणे ॥ प्रभवे सर्व देवानां वामनाय नमो नमः ॥ या प्रकारें द्वादशीस सूर्योदयीं वामनाची पूजा करुन अलंकारसहित ती मूर्ति ब्राह्मणाला द्यावी . दानमंत्र - वामनः प्रतिगृह्णाति वामनोहं ददामि ते ॥ वामनं सर्वतोभद्रं द्विजाय प्रतिपादये . " अनंतभट्टही सांगतो . श्रवणद्वादशीस जनार्दननामक विष्णूची पूजा करितात . श्रवणयुक्त एकादशीस वामनावतार झाला . श्रवणयुक्त शुद्धैकादशी न मिळेल तर दशमीविद्धही श्रवणयुक्त करावी . कारण , " दशमीविद्ध एकादशीस उपोषण करुं नये ; परंतु ती श्रवणयुक्त जर असेल तर सर्व कामना देणारी होते , " असें वह्निपुराणवचन आहे . असें मदनरत्नांत सांगितलें आहे . पूजा मध्याह्नीं करावी . कारण , " मध्याह्नीं वामन , परशुराम , आणि राम हे झाले " असें पूर्वीं चैत्रमासीं वचन सांगितलें आहे .
अत्रैवदुग्धव्रतंसंकल्पयेत् तदुक्तं दुग्धमाश्वयुजेमासीति अत्रेदंचिंत्यते दुग्धव्रतेपायसादिवर्ज्यंनवेति नेति केचित् नहिप्रकृतिवर्जनेविकारवर्जनंयुक्तं दधिघृतादीनामपिवर्जनापत्तेः नचयत्रप्रकृतिरसोपलंभस्तद्वर्जनमितिवाच्यम् मांसविकारस्यौष्ट्रदध्यादेश्चावर्जनापत्तेः तस्माद्दध्यादिवत्पायसादिभक्ष्यमिति अत्रब्रूमः यत्रविकारेप्रकृतिरसोपलंभस्तत्प्रत्यभिज्ञावातत्रविकारस्यापिनिषेधः अस्तिचमांसविकारेमांसप्रत्यभिज्ञामांसत्वानपायात् यत्तु औष्ट्रदध्यादेरनिषेधापत्तिरिति तन्न औष्ट्रमितिविकारतद्धितेननिषेधात् तथाचविज्ञानेश्वरः औष्ट्रमैकशंफस्त्रैणमारण्यकमथाविकमित्यत्र औष्ट्रमितिविकारतद्धिताच्छकृन्मूत्रादीनामपिनिषेधइत्याह नन्वेनंसंधिन्यनिर्दशाऽवत्सागोपयः परिवर्जयेदितिसंधिन्यादिक्षीरनिषेधेपिदध्यादिग्रहणंस्यात् सत्यंप्राप्तं वचनेनपरंनिषेधः तदाहापरार्केशंखः क्षीराणियान्यभक्ष्याणितद्विकाराशनेबुधः सप्तरात्रंव्रतंकुर्यात्प्रयत्नेनसमाहितइति व्रतंगोमूत्रयावकं तस्मात्पायसेदुग्धरसोपलंभाद्वर्जनं अतएवामिक्षायांदधिसत्त्वेपिमाधुर्योपलंभात् पयोरुपत्वमुक्तंसीमांसकैः तदुक्तं पयएवघनीभूतमामिक्षेत्यभिधीयतइति दध्यादिषुतुतदभावादवर्जनमिति एवंदध्यादिव्रते नतक्रादीनांनिषेधः उक्तोभयहेत्वभावादितिकेचित् पूर्वोक्तशंखवचनात्सर्वविकारनिषेधइतियुक्तंप्रतीमः इतिदुग्धव्रतम् ।
या द्वादशीसच दुग्धव्रताचा संकल्प करावा . तें सांगतो - ‘ आश्विनमासांत दुग्ध वर्ज्य करावें ’ असें पूर्वीं सांगितलें आहे . या दुग्धव्रताविषयीं असा ( पुढें लिहिल्याप्रमाणें ) विचार करितात - दुग्धवर्जनव्रताचे ठायीं पायसादिक वर्ज्य करावें किंवा न करावें ? न करावें , असें केचित् म्हणतात . कारण , दूध ही प्रकृति व पायसादिक हे त्या दुधाचे विकार असल्यामुळें , प्रकृतीचें वर्जन सांगितलें असतां विकृतीचें ( विकाराचें ) वर्जन युक्त नाहीं . जर विकाराचें वर्जन केलें तर दधि , घृत इत्यादिकांचें देखील वर्जन प्राप्त होईल . आतां असें म्हणूं कीं , ज्यांत प्रकृतीचा रस ( मधुरादि ) उपलब्ध आहे , त्याचें वर्जन करावें . असें म्हणतां येणार नाहीं . कारण , मांसाचा विकार एकादा असेल व त्यांत मांसरसाचा उपलंभ नसेल तर त्याचें आणि उंटाचें दहीं वगैरे याचें वर्जन होणार नाहीं . म्हणून प्रकृतिरसाचा उपलंभ ज्यांत आहे त्याचें वर्जन असें म्हणूं नका . तर दधि इत्यादिक जसे भक्ष्य आहेत तसें पायसादिक भक्षण करावें . येथें आम्हीं ( कमलाकरभट्ट ) असें सांगतों कीं , ज्या विकाराचे ठायीं प्रकृतिरसाचा उपलंभ होतो , किंवा तोच ( प्रकृतीच ) हा असें ज्ञान होतें त्या ठिकाणीं विकाराचाही निषेध आहे . मांसाच्या विकारांत मांसाचें ज्ञान आहे . कारण , मांसत्व नाहींसें होत नाहीं . आतां जें उंटाचें दहीं वगैरे त्याचें वर्जन होणार नाहीं , म्हणून सांगितलें , तें बरोबर नाहीं . कारण , ‘ औष्ट्रं ’ हा विकारार्थी तद्धित प्रत्यय असल्यामुळें त्याचा निषेध होतो . तेंच विज्ञानेश्वर - " उंटाचें , एकशफाचे पशूचें , स्त्रियेचें , अरण्यांतील प्राण्याचें , व मेंढ्याचें दूध वर्ज्य . " या वचनांत ‘ औष्ट्रं ’ ह्या उष्ट्र शब्दाहून विकारार्थी तद्धित प्रत्यय केल्यामुळें उष्ट्राचे ( उंटाचे ) विकार असे जे विष्ठा , मूत्र इत्यादिक त्यांचाही निषेध , असें सांगतो . शंका - " संधिनी ( वृषभानें मैथुनार्थ आक्रमिलेली गाय ), प्रसूत होऊन दहा दिवस न झालेली , वत्सरहित , अशा गाईचें दूध वर्ज्य करावें " असा संधिनी इत्यादिकांच्या दुधाचा निषेध असला तरी दधि इत्यादिकाचें ग्रहण होईल . असें प्राप्त झालें खरे ; पण वचनानें त्याचा निषेध होतो . तें सांगतो - अपरार्कांत शंख - " जीं अभक्ष्य दुग्धें सांगितलीं त्यांचे विकार भक्षण केले असतां प्रयत्नानें सप्तरात्र व्रत करावें . " व्रत म्हणजे गोमूत्रांत यव शिजवून खावे . तस्मात् पायसाचे ठायीं दुग्धरसाचा उपलंभ होत असल्यामुळें पायस वर्ज्य आहे . म्हणूनच आमिक्षेचे ठायीं ( कढत दुधांत दहीं घातल्यानें झालेल्या द्रव्याचे ठायीं ) दहीं असलें तरी मधुररस असल्यामुळें तें दुग्धरुप आहे . असें मीमांसकांनीं सांगितलें आहे . तें सांगतो - ‘‘ दूधच घट्ट झालें म्हणजे त्याला आमिक्षा म्हणतात . " दधि इत्यादिकांत दुग्धाचा रस ( माधुर्य ) नसल्यामुळें त्याचें वर्जन नाहीं . याप्रमाणें दधि इत्यादि व्रतांत तक्रादिकांचा निषेध नाहीं . कारण , वर सांगितलेले दोन हेतु ( प्रकृतिरसाचा उपलंभ किंवा तोच हा अशी प्रत्यभिज्ञा ) हे नाहींत , असें केचित् म्हणतात . वर सांगितलेल्या शंखवचनावरुन सर्व विकारांचा निषेध युक्त आहे , असें आम्हीं ( कमलाकरभट्ट ) समजतो . इति दुग्धव्रतं . ॥