मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ४ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मधुकैटभवधः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल सांगती दक्षाप्रत । नंतर ब्रह्मा निर्मित । मुखापासुनी ब्राह्मणां पुनीत । बाहूंपासून क्षत्रियांसी ॥१॥उरुंपासून वैश्यांस निर्मिलें । शूद्रां पायांपासून सृजिलें । गुणकर्म विभाग केले । संन्यास निर्मिला शिरापासून ॥२॥वदनापासून वानप्रस्थाश्रम । नाभींतून ब्रह्मचर्याश्रम । जंघेपासून गृहस्थाश्रम । वर्णाश्रम ऐसे निर्मिले ॥३॥त्यांसी पाहून हर्षभरित । नंतर पितामह धर्मासी निर्मित । आपुल्या उर प्रदेशांतून त्वरित । पाठीतून अधर्म उपजला ॥४॥त्या धर्मापासून संजात । देव सारे जगतांत । अधर्मापासून निर्माण होत । दैत्य गण त्या वेळीं ॥५॥नंतर देव गंधर्व अप्सरा गण । यक्ष असुर यातुधान । सर्प पक्षिपशु मानवगण । क्रियायुक्तां निर्मिलें ॥६॥ऐसा आपुला देह वाटला । त्यापासून समस्त जीवसंध उपजला । त्यांचा सर्गक्रम जो झाला । मुख्यत्वें तो सांगतों ॥७॥प्रथम महताचा सर्ग होत । नंतर तन्मात्रें उदित । वैकारिक तृतीय होत । इंद्रियें ऐसें नाव त्यांना ॥८॥ऐसे हे प्रकृतीचे सर्ग । उपजले बुद्धिपूर्वक संयोग । स्थावर चतुर्थ सर्ग । मुख्य सर्ग तो म्हणती ॥९॥तिर्यक् योनी पांचवा । ऊर्ध्व स्त्रोत देवसर्ग सहावा । अर्वाक्स्त्रोत मानवांचा सातवा । आठवा भूतांदींचा भौतिक सर्ग ॥१०॥फौमार सर्ग नववा । ऐसा विबुधीं जाणावा । सहा विकृत तीन प्राकृत भेद करावा । नवसर्गांत ऐश्या रीती ॥११॥बुद्धिपूर्व जे प्राकृत । तीन सर्व प्रकीर्तीत । बुद्धिपूर्व प्रवर्तत । तत्त्वादिक सर्व जंतू ॥१२॥ऐशी नानाविध सृष्टिरचना । ब्रह्मयानें निर्मिली ती वाढेना । म्हणोनि दुःख त्याच्या मना । तेव्हां नवल एक वर्तलें ॥१३॥त्याच्या शरीरापासून उपजत । एक दांपत्य क्षणांत । वामांगापासून संस्थित । रम्या प्रकृति शतरुपा ॥१४॥दक्षिणांगापासून संभूत । पुरुष तो मनु ऐसा स्मृत । स्वायंभुव महा भाग तो असत । आद्य क्षत्रिय धर्मवेत्ता ॥१५॥प्रकृति पुरुष हात जोडित । ब्रह्मदेवासी विनवीत । काय करावें ते आम्हांप्रत । आज्ञापावें प्रजापते ॥१६॥तेव्हां स्वयं जातास तयांस । प्रहर्षित ब्रह्मा म्हणे सरस । अतुल सृष्टि मैथुनी सुरस । निर्माण करा तपोबळानें ॥१७॥पुरुष प्रकृति विधीस नमून । उत्तम बनांत जाऊन । घोर तप आचरती चिंतन । अविरत करिती गणेशाचें ॥१८॥नंतर विधात्याच्या छायेपासून । कदर्म मुनि जन्मला पावन । ब्रह्म म्हणे त्यास पाहून । प्रजा निर्माण तूं करी ॥१९॥कर्दम वनांत जाऊन करित । परम तप तो विष्णूस ध्यात । शुक्लरुपा त्या देवाप्रत । प्रार्थी प्रजाकाम त्या वेळीं ॥२०॥इतुक्या माजी निर्माण होत । विष्णूच्या कर्णमलापासून अद्भुत । मधु कैटभ नामें दुष्ट । परम दारुण दोन दैत्य ॥२१॥त्यांनी स्वभुज वीर्ये जिंकिले । त्रिभुवन सारें संत्रस्त केलें । देव सारे भयभीत झाले । पळूं लागले दशदिशांत ॥२२॥ते मधुकैटभ दैत्य धावत । ब्रह्मदेवासी भक्षूं पाहत । तेव्हां तो निद्रेसी स्तवित । विष्णुनयनीं जी होती ॥२३॥त्या निद्रेनें होते मुक्त । विष्णु जागा झाला अव्यक्त । मधुकैटभांसवें तो करित । मल्लयुद्ध आवेशानें ॥२४॥पांच हजार वर्षे चालत । तें मल्लयुद्ध त्या दोघांत । परी जनार्दन जिंकू न शक्त । हरीसी मारिती महादैत्य ॥२५॥तेव्हा अन्तर्धान पावून । विष्णु करी पलायन । शंकरासी भावसमन्वित वंदून । शरण त्याला भक्तिभावें ॥२६॥महेशातें प्रणिपात करुन । भय संकुल बोले वचन । मल्लयुद्धाचा वृत्ताम्त निवेदन । करुन जयोपाय सांगा म्हणे ॥२७॥तेव्हां शंकर तयासी सांगती । तुज झाली गणेशाची विस्मृति । त्याचा आराधना करी भक्ति । तेणें सिद्धि पावशील ॥२८॥गणेशषडक्षरमंत्र देत । शिव तेव्हां विष्णूप्रत । तो जपण्या विष्णु जात । दंडकारण्यीं सत्वर ॥२९॥तेथ पद्मासन घालून । करी तो गजाननाचें ध्यान । षडक्षरमंत्र विधानें महान । गणेश तप आचरी तो ॥३०॥सहस्त्र वर्षे तप केलें । सुदारुण तेव्हां गणेश तोषले । वरदान देण्या प्रकटले । विष्णूसमोर गणपति ॥३१॥त्यासी पाहून पूजित । प्रणाम भक्तीनें करित । कर जोडून भावयुक्त । स्तुती करी गणेश्वराची ॥३२॥गणपतीसी विघ्नराजासी । कृपानिधीसी ढुंढीसी । भक्तसंरक्षकासी विघ्नहर्त्यासी । सिद्धिबुद्धिपतीस नमन असो ॥३३॥हेरंबरुपासी निर्गुणासी । अभक्ताम विघ्नकर्त्यासी । गुणचालकासी । प्रपंचरुपासी । प्रपंचरहिता नमन माझें ॥३४॥ब्रह्मदात्यासी ब्रह्मरुपासी । नरकुंजर रुपासी । नाना मायामयासी । नमन कारणांच्या कारणा ॥३५॥देवेशासी ज्येष्ठ राजासी । कारण रहितासी योगीहृदयसंस्थितासी योग्यांसी योगदायकासी । योगरुपधरा नमन ॥३६॥गणेशासी मायाश्रयासी । माया आधारा मोहदात्यासी । भाविकां मायामयासी । नमन तुला एकदन्ता ॥३७॥तुज स्तवण्या कोण समर्थ । योगाकारें तू स्थित । जेथ वेदशास्त्रें अंगांसहित । कुंठित झालीं सर्वही ॥३८॥तुझ्या स्तवनीं गजानना । मनोवाणीविहीना । मनोवाणीमय मी स्तवना । विघ्नपा तुझ्या कैसें करुं? ॥३९॥देवा म्हणोनी कृपा करावी । बुद्धि मजला तूंच द्यावी । तुझ्या वरदानें व्हावी । स्तुति माझी प्रिय तुला ॥४०॥तुझ्या दर्शनें धन्य झालों । देवदेवेशा तुजसमीप आलों । योगींद्रा ब्रह्मरुपा तोषलों । योगदायका निस्संदेह ॥४१॥ऐसें बोलून करी वंदन । भक्तिभावें नाचे रंगून । रोमांच हरीरीं दाटून । आनंदाश्रूंनी नयन भरले ॥४२॥त्यांसी म्हणे गजानन । वर माग जनार्दना मीं प्रसन्न । तुझें तप भक्ति भाव पाहून । मनोवांछित पुरवीन ॥४३॥तूं रचिलेलें हें स्तोत्र । सर्वसिद्धिदायक पवित्र । वाचितां मानवांसी सुपात्र । नारायणा करील सदा ॥४४॥धर्मांर्थकाममोक्षसाधक । ईप्सितार्थ फलदायक । हे स्तोत्र होईल निःशंक । माझ्या प्रसादें केशवा ॥४५॥मुद्गल सांगती दक्षाप्रत । गणेशवचन ऐकून मुदित । विष्णु त्यासी प्रणाम करित । वांच्छित मागे त्या वेळीं ॥४६॥जरी तू मजवरी प्रसन्न । सुदुर्लभ तव भक्ति देऊन । अव्यभिचारिणी सदा मन । लावी दृढ तुझा चरणीं ॥४७॥तैसेंचि अतुल ज्ञान । कीर्ति सामर्थ्य सन्मान । मधुकैटभ नाशा उपायकथन । देई शक्ति दैत्य हननीं ॥४८॥त्याची प्रार्थना ऐकून । ‘तथास्तु’ म्हणे गजानन । युद्धासी जावें श्रद्धा ठेवून । जिंकशील त्या असुरद्वयासी ॥४९॥तपानें ब्रह्मदेव त्यांच्या संतुष्ट । वरदान दिलें पूर्वीं इष्ट । मधुकैटभांसी मरण सुगुप्त । त्या कारणें जाहलें ॥५०॥ते दैत्य स्वमुखानें सांगतील । उपाय आपुल्या मृत्यूचा सबल । तेव्हाच ते मरतील । ब्रह्मदेवाचा वर ऐसा ॥५१॥मायेचा आश्रय घेऊन । मी त्यांच्या चित्तीं वास करीन । तेणें ते होतील तवाधीन । महाबई दैत्य युद्धीं ॥५२॥युद्धांत माझे स्मरण चित्तांत । करशील तेव्हां अविलंबित । जयोपाय मी सांगेन निश्चित । दैत्यनाश जेणें होय ॥५३॥ऐसें बोलून अन्तर्धान । गणेश ब्रह्मनायक होऊन । विष्णू तेथ महामूर्ति स्थापून । पूजन करी गणेशाचें ॥५४॥योग्य द्विज ती मूर्ति स्थापितो । षोडशोपचार पूजा करिती । तें स्थान सिद्धिक्षेत्र नावें जगतीं । सुविख्यात जाहलें ॥५५॥अनुष्ठानें तेथ करित । नाना सिद्धिकर तीं होत । गणेशक्षेत्र विख्यात । ऐसें सिद्ध सेवित तें ॥५६॥तेथ सदा वास करित । विष्णु भक्तिप्रेम संयुत । पत्नी तैसि परिवारसहित । नित्य आदरभावानें ॥५७॥नंतर गणाधीशा नमून । युद्धासी गेला सोल्हास मन । गणेशा चित्तीं ध्याऊन । मधुकैटभांचा वध केला ॥५८॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते मधुकैटभवधो नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP