मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय १८ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय १८ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत भरतमृगदेहयागः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । ध्याननिष्ठ सदा चिंतन । करी गणेशाचें योगी महान । तेव्हां कालांतरेम प्रकट होऊन । गजानन पुन्हां भेटत ॥१॥योगशांति लाभून । पुलह करी गणेशमूर्तीचें पूजन । ध्यानांत निमग्न त्याचें मन । गणेश आगमन न कळे तया ॥२॥तेव्हां ढुंढी जो हृदयीं स्थित । त्यास घालवी गणेश क्षणांत । हृदिस्थ गणेशा न पाहत । भरांत अस्वस्थ पुलह झाला ॥३॥म्हणोनि ध्यान सोडून । बाहेर शोधी अधीरमन । गणेशा पुढयांत पाहून । कृतांजली त्यास वंदी ॥४॥विधियुक्त केलें पूजन । अनामय विनायका प्रसन्नमन । पूजा करुन करी वंदन । रोमांच अंगावरी आले ॥५॥हर्षगद्गद करी स्तवन । विघ्नराजा तुज नमन । भक्तविघ्नहर्त्या तुज वंदन । गणेशा तुज नमन असो ॥६॥अभक्तांसी विघ्नकर्त्यास । ब्रह्मास ब्रह्मरुपास । निराकारास साक्षीस । सर्व संस्थास नमन असो ॥७॥अनादिसिद्धास नमन । अनामयासी वंदन । महाओजस्वी देवा अभिवादन । अप्रतर्क्या वक्रतुंडा ॥८॥हेरंबासी स्वानंदराशीसी । भक्तसंरक्षकासी । योगपतीसी योगदात्यासी । शांतासी शांतरुपा नमन ॥९॥शांतिपतीस भक्तशांतिकरास । योगशांतास सर्वगास । नाना अवतार रुपास । जगदाधामूर्तीसी नमन ॥१०॥सुर असुरांच्या ईशास । सर्ववंद्यास सर्वादीस । सर्वांतास एकरुपास । मध्ये नानास्वरुपा नमन ॥११॥आदिमध्यांतहीनास । सृष्टिस्थितिअंतकरास । अनंत उदर संस्थास । लंबोदरा नमन असो ॥१२॥गजवक्त्रा तुज नमन । गजाकारा तुज अभिवादन । गजकर्णा पूर्णा वंदन । गजानना पुनःपुन्हा ॥१३॥मूषकध्वजरुपासी । मूषकारुढरुपासी । पाशांकुश धारकासी । विभूतिस्तुतासी नमन असो ॥१४॥चतुर्भुजधरासी । चतुर्वर्गमयासी । ब्रह्मभूतस्वरुपासी । देहधारिन् नमन तुला ॥१५॥ज्यास वेदवादी स्तवन करण्या अशक्त । वेद सांग योगी न शकत । ज्याची स्तुति करण्या संभव वाटत । ब्रह्म विष्णु शिवासी ॥१६॥त्या देवेशा योगरुपमयासी । कैसें मी तुजसी । म्हणोनि प्रार्थितों आतां तुजसी । भावबळें प्रसन्न हो ॥१७॥ढुंढे वर देई मजप्रत । योगात्मतेत मी व्हावें संतुष्ट । तुझी भक्ति व्यभिचारवर्जित । माझ्या मनीं दृढ व्हावी ॥१८॥ऐसें बोलून तो पुलहमुनी । प्रेमविव्हल नाचूनी । भक्तिरस संयुक्त वचनीं । प्रार्थी ऐसें गणनायका ॥१९॥गणेश तेव्हा त्यास म्हणती । माझी सुदृढ ऐसी भक्ति । अव्यभिचारी सात्विक ती । आनंददायी तुज लाभेल ॥२०॥महायोग्या तुज मम भक्ति । होईल सुखदायी जगतीं । जेव्हा माझें स्मरण चित्तीं । तेव्हां सन्निध मज पाहशील ॥२१॥तू रचिलेलें हें स्तोत्र वाचील । तैसें जो हें ऐकेल । त्यास भुक्तिमुक्तिप्रद तें होईल । शांतियोग प्रदायक ॥२२॥ मर्त्य हें पाठ करील । त्यास सर्व सुखें मिळतील । तुज जैसा पुलहा होईल । यात संशय कांहीं नसे ॥२३॥ऐसे बोलून गणाधीश होत । अंतर्धान तेव्हा त्वरित । पुलह तैसाच उभा राहत । मनीं ध्यात गणाधिपा ॥२४॥मृगरुपधर भरत । तेथ उभा होता ऐकत । ब्रह्मदेव पुलहा सांगत । तें पूर्ण ज्ञान लाभलें त्या ॥२५॥मृगदेहातही ध्यानसंयुक्त । गणेशास मनांत ध्यात । तेथेचि निवास तो करित । सदा चिंतन गजाननाचें ॥२६॥तेव्हां तो मनीं प्रार्थना गात । प्रजापते दक्षा ऐक सुवाहित । ऐसें मुद्गल सांगत । अहो विघ्न घोर ओढवलें ॥२७॥राज्य सोडून वनांत । नित्य हरीसी मी होतों स्मरत । तेथेहि मृगसंगानें संजात । मृगरुपधारी मी ॥२८॥विष्णु प्रमुख अमरेशही होत । निःसंशय विघ्नयुक्त । तेथ पाड काय माझा लागत । विघ्न जिंकण्या मनुष्याचा? ॥२९॥विघ्नराजाच्या प्रसादें दूर होत । दुर्जय विघ्नही जगतांत । शिव विष्णु आदी सर्व प्राणी पावत । निर्विघ्नता त्याच्या कृपेनें ॥३०॥धन्य माझी वैष्णवी भक्ति जगांत । वाटे जी परमाद्भुत । तेणें संस्कार संयुक्त । प्राप्त उत्तम ज्ञान मला ॥३१॥गाणपत्य महायोगी पाहिला । पुलह जो गणेश भजनीं रमला । अहो परम भाग्यदायक वाटला । योगायोग हा अपूर्व ॥३२॥ज्यानें मी गाणपत्याच्या संगांत । नित्य येथें असे स्थित । विघ्नहीन मी स्वभावें होत । जरी गणनायका पूजीन ॥३३॥ऐश्यापरी भक्तीनें युक्त । गणेशभक्ति करी सतत । मृगसत्तम देहत्याग करित । कालांतरें गणपा स्मरुन ॥३४॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते भरतमृगदेहत्यागो नामाष्टादशोऽध्यायः समाप्तः। श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP