मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय २३ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय २३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत ध्रुवचरितम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा सुरस सांगती । स्वायंभुव मनूचा जगती । उत्तानपाद नामें पुत्र धर्मभक्ति । मध्यदेशीं राज्य करी ॥१॥त्याच्या दोन भार्या सुविख्यात । सुनीति सुरुची नामें असत । सुनीतीपासून ध्रुव जन्मत । सुरुचीपासून सुत उत्तमनामा ॥२॥सुरुचींने राजासी मोहविलें । आपुल्या संपूर्ण वश केलें । सुनीतीस राजानें अवमानिलें । आठवणही तिची करीना ॥३॥एकदा ध्रुव बाळ जात । राजासमीप स्नेहात । राजाच्या मांडीवरी बसू इच्छित । जवळी उभा राहिला ॥४॥तेथ सुरुची दुष्टभावें करित । त्याचा अपमान सर्वांदेखत । म्हणोनि ध्रुव क्रोधसंयुत । वनांत गेला तक्षणीं ॥५॥मार्गांत नारद त्यास भेटत । त्यासी तो महा बुद्धिमंत । ध्रुव बाळ प्रणाम करित । धर्मधारक सदाचरणी ॥६॥कळताम अखिल वृत्तान्त । नारद त्यासी उपदेशित । विष्णूचा द्वादशाक्षर मंत्र देत । ध्रुव तेव्हां आनंदला ॥७॥नारदासी प्रणाम करुन । नंतर मथुरेसी जाऊन । तप केलें निष्ठा ठेवून । सनातन विष्णूचे ध्यान करी ॥८॥एक सहस्त्र वर्षपर्यंत । परम तप तो आचरित । तेव्हां विष्णु प्रसन्न होत । प्रकटला ध्रुवासमोर तें ॥९॥पृथ्वीचें राज्य अखंडित । तेव्हां दिधलें ध्रुवाप्रत । अन्तीं स्वर्गराज्य विष्णुपद प्राप्त । ध्रुवात्मक ऐसा वर दिला ॥१०॥नंतर ध्रुव स्वगृहीं परतला । माता पितरां नमिता झाला । राजा स्वागत करी त्या वेळां । तेजःपुंज त्या पुत्राचें ॥११॥कालांतरानें ध्रुवा नृपपद देत । उत्तानपाअद राज वनांत जात । महातेजस्वी परम तप आचरित । उत्तानपाद श्रद्धेनें ॥१२॥तेथ गणेशभक्त नारद येत । त्यास म्हणे नृपा तूं अविरत भेदाभेद विसरुन त्वरित । गणेशासी भजावें ॥१३॥शिव विष्णु आदि देव भजत । सनकादी योगी जयास पूजित । वसिष्ठादि ऋषिगण सेवित । ज्यास तो हा गजानन ॥१४॥गणेशाविना शांति न लाभत । यांत संशया जागा नसत । स्वायंभुवादी भूपाल ज्यास सेवत । तो हा गणांचा नायक ॥१५॥ऐसे सांगून मंत्र देत । गणेशाचा षडक्षरयुक्त । त्या मंत्र प्रभावें उत्तानपाद राजा होत । गाणपत्य एकनिष्ठ ॥१६॥मृत्यूसमयीं गणनाथा स्मरत । तेणें गणेशसायुज्य पावत । त्याचा पुत्र ध्रुव करित । धर्मनीतीनें राज्य सदा ॥१७॥नारद करुणानिधि तेथ जात । राज ध्रुवासी भेटत । ध्रुव त्याला आदरें नमित । भक्तिभावें पूजितसे ॥१८॥पूर्णभावें ओंजळ जोडून । स्वगुरुसमोर विनतवदन । त्यास महायोगी दिव्यदर्शन । नारद तेव्हां सांगती ॥१९॥आपुल्या शिष्य भक्तियुक्त । पाहून दयानिधि त्यास प्रणत । ध्रुवा ऐक बा माझें वचन उदात्त । वैकुंठाहून मी येथ आलों ॥२०॥विष्णूनें पाठविलें मज । तुझ्यासाठी येथ आज । महामते ऐक काज । लक्षपूर्वक सुशिष्या ॥२१॥मयूरेशाचें क्षेत्र असत । भूवरी तें ब्रह्ममय पुनीत । तेथ जाऊन महायात्रा विधिवत । करी माझ्या प्रिय शिष्या ॥२२॥तेणें तूं पावशील अक्षयपद । माझें सतत जें विशद । अन्यथा विघ्न येऊन दुःखद । पतन तुझें होईल ॥२३॥तो विष्णु करुणेनें सांगत । एकाक्षर गणेश महामंत्र जप सतत । ब्रह्मादिनीं लय जेव्हां तेणें तरशील ॥२४॥त्या मंत्रप्रभावानें प्राप्त । ध्रुवपद तुज जें अक्षय्य असत । शांति लाभोनि ब्रह्मभूत । होशील ध्रुवा निःसंशय ॥२५॥नाहीतरी योगशांति । तुज न मिळेल जगतीं । ऐसे सांगून नारद देती । विधिपूर्वक तो महामंत्र ॥२६॥गणेशाचा एकाक्षर मंत्र जपत । ध्रुव तेणें सिद्ध होत । मयूरेशक्षेत्रीं त्वरित जात । विधिवत् दारयात्रा करी ॥२७॥मंत्रकोविद ब्राह्मणा बोलावित । गणेशमूर्ति स्थापित । पूर्वद्धारासमीप ती असत । अर्धाकोस अंतरावरी ॥२८॥महामूल्यवंत देवालय बांधिलें । सुवर्ण शिखर त्याचें शोभलें । भक्तिपूर्वक पूजन केलें । ध्रुवानें त्या क्षेत्रांत ॥२९॥त्या गणेशाचें नांव कल्पित । राजा ध्रुवाविनायक उदात्त । वर्षमास निवास करित । ध्रुव त्या मयूर क्षेत्रांत ॥३०॥नंतर स्वनगरीं परतून । ध्रुवें राज्य केलें गणेशा स्मरुन । अंतीं स्वर्गप्राप्ती होऊन । ध्रुवतार तो जाहला ॥३१॥त्या ध्रुवस्थानीं ध्यात । महायश तो गणपतीस चित्तांत । ध्रुवस्थानाचा जें लोप होत । स्वानंदांत निमग्न झाला ॥३२॥ध्रुवविनायकाचें दर्शन घेत । अथवा हें ध्रुवाख्यान ऐकत । त्यासी भुक्तिमुक्ति लाभत । श्रद्धा भक्तियुत सर्वदा ॥३३॥ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदन्तचरिते ध्रुवचरित्रं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP