मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ५१ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ५१ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत सनत्कुमारदेवसमागमः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गृत्समद सांगे कथा अद्भुत । प्रल्हाद भक्तिभावें ऐकत । मदासुराचें सर्व कर्म अद्भुत । मदमोहयुक्त अत्यंत ॥१॥ऐसा काळ काही लोटत । दैत्य वीरांच्या समवेत । तेव्हां त्रिपुर मदासुरा म्हणत । ऐका प्रभू माझें वचन ॥२॥हितकारक जें दैत्यांप्रत । सुखद अखंड आनंदप्रत असत । पूर्वी त्रिभुवन जिंकून समस्त । दैत्य संतोष पावले ॥३॥वनांत गिरिगुहांत । देव सारे निवसत । ते शत्रू अमुचे निर्मित । नरसिंहासी गुप्तपणें ॥४॥हिरण्यकशिपु प्रभूस मारित । नृसिंह तेव्हां अकस्मात । ऐश्या क्रमें अन्यही संहत । दैत्याधीश तें झाले ॥५॥आता आपण ब्रह्मांडधिपति । झालात जरी निश्चिती । परी देवांस मुक्त सोडून शांति । कैसी लाभेल आपणासी ॥६॥आपुले नित्य शत्रू असत । देव ऐसे वर्णन वेदांत । ते आमुचे मित्र होत । हें कैसे शक्य होय? ॥७॥म्हणोनि त्यांच्या विनाशाप्रत । नृपसत्तमा व्हावें प्रसक्त । अन्यथा कालांतरें ओढवत । विनाश आपुले निःसंशय ॥८॥शस्त्रास्त्रें पीडित न मरती । म्हणोनी देवांसी अमर म्हणती । वेदांत त्यांची ऐसी ख्याती । घोररुप ते न संशय ॥९॥त्याचें मरण ओढवेल । जरी कर्मनाश होईल । कर्मान्नांशावर सबल । देवतांचे जीवन पूर्ण ॥१०॥म्हणोनी यज्ञयागादी कर्में करिती । ते ब्राह्मण ताडनीय जगती । आसुर कर्म जे करिती । सन्मान त्यांचा करावा ॥११॥अन्य वर्णाश्रम स्थित । असती कर्मनिष्ठ विप्र जे जगांत । विप्रजात होतां विनष्ट । तेही नष्ट होतील ॥१२॥म्हणोनी दैत्येंद्रा आज्ञा करावी । कर्मखंडनाची असुरां बरवी । सर्वत्र कर्मे असुरभावें व्हावीं । ऐसी घोषणा करावी ॥१३॥ऐसें विनवून शांत राहात । महादैत्य तो उत्सुक मनांत । तेव्हा मदासुर त्यासी म्हणत । योग्य सल्ला आहे तुझा ॥१४॥अरे त्रिपुरा बुद्धिमंता । जैसे आले तुझिया चित्ता । तैसेंचि तूं करी आतां । दैत्यवीरांसमवेत ॥१५॥ऐसी राजाज्ञा लाभत । त्रिपुरही तें मदोन्मत्त । दैत्य गणांसमवेत । निघाला कर्मखंडनार्थ ॥१६॥जेथ जेथ पृथ्वीवरी यज्ञ कर्म चालत । तेथ तेथ जाउनी असुरांसहित । तारक मुनिगणांसी पकडित । ताडन करी बहुविध त्यांना ॥१७॥काहींचा तेणें वध केला । तेव्हां अन्य मुनींसी कंप सुटला । कर्मदूषण करण्याला । कोणी जाहले तत्पर ॥१८॥कोणी त्या दुष्टा शरण जाती । त्याच्या आज्ञेंत वर्तती । ब्राह्मणधम ऐसे निवसती । कोणी पळाले वनांतरी ॥१९॥वनांत स्वधर्माचरण करिती । भयरहित ते स्वचित्तीं । सिंहादींचे भय त्यागिती । मरण्यासाठी उद्युक्त ते ॥२०॥सिंहादी हिंस्त्र पशू समीप राहत । ते स्वकर्मे आचरती धर्मरत । ते दैत्यांसी न ज्ञात । अन्य कर्मभ्रष्ट जाहले ॥२१॥दैत्यांचे हस्तक मंदिरें फोडिती । यज्ञांवा विध्वस करिती । तपोवन वृक्ष तोडिती । प्रल्हादा ते त्या वेळीं ॥२२॥आसुरकर्म सर्वत्र स्थापित । ब्राह्मणादी उत्तम वर्णांत । दुष्टसंकारादी कर्मे करवित । हाहाकार जगीं माजला ॥२३॥स्वधर्माविरहें जग पीडित । दुष्टांचा छळ सारे सोशित । स्वाहा वषट्कारादी बंद होत । स्वधादिकही विनष्ट झालें ॥२४॥तेव्हां देवगण सारे इच्छिती । दैत्यांचा वध करण्या त्वरिती । उपोषणें घडून ते होती । निस्तेज ते सपरिवार ॥२५॥सर्व देव सभा घेती । दैत्यांचा वध कवण्या रीती । करावा याचा विचार करिती । परी कांहीं उपाय सुचेना ॥२६॥सनत्कुमार महायोगी येत । देवांच्या भाग्ययोगें अकस्मात । सर्वांच्या हितकरणीं जो रत । देव त्यांचें स्वागत करिती ॥२७॥सर्व उपचारें त्यास पूजिती । परम आदरें प्रणाम करिती । कंदमूलादिक समर्पिती । भक्तिभावें तयासी ॥२८॥नंतर तयासी विनविती । मदासुरवध कोण्या रीती । शक्य होय ती युक्ति । सांगावी त्वरित आम्हांसी ॥२९॥धन्म तप ज्ञान । देह पूर्वज सारें पावन । तुमच्या अंध्रिमकमलांचे दर्शन । घडून कृतकृत्य सकल झाले ॥३०॥मदासुरें स्वबळे जिंकिलें । त्रिलोक्याचें स्वराज्य सगळें । त्याच्या वधार्थ काय केलें । पाहिजे तें सांगा त्वरित ॥३१॥महामते तुम्हा ज्ञात । जरी मदासुरवद्याचा उपाय निश्चित । तरी साधूंच्या रक्षणाप्रत । सांगावा तो आम्हांसी ॥३२॥सर्वज्ञा तुला नमन करित । आम्ही देवगण समस्त । साधू देवता विप्रगण पीडित । मदासुराच्या आज्ञेनें ॥३३॥कर्मनाश सर्वत्र झाला । सज्जनांचा वाली न उरला । आपण ब्रह्म साक्षात् अवतरला । समशील सर्व प्राण्यांसी ॥३४॥परी हया दोषयुक्ता एकास वधावें । अतिदुष्टा विलया न्यावें । जग सारें सुखी करावें । स्वतः न मारिता उपाय सांग ॥३५॥मार्गदर्शन करावें आम्हांप्रत । साधूजन सन्मार्ग दाखवित । दीनांचे अनाथांचे होत । संरक्षक धर्मनिष्ठांचे ॥३६॥महामुने सत्कर्मनिरत । प्राण्यांसी करिती जगतांत । विकर्माचा संहार करित । हिंसा तिला न म्हणती ॥३७॥महायोग्या जी हितकर्ती । विरुद्ध कर्मासी खंडिती । ती हिंसा न होय निश्चिती । अज्ञान दूर करिती साधू ॥३८॥म्हणोनी आम्हांसी उपाय । मदासुरनाशार्थ जो होय । सांगोनी करावी सोय । धर्मसंस्थापनें धर्मान्नाची ॥३९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते सनत्कुमारदेवसमागमो नामैकपंचाशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP