मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय २० खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय २० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत जडभरतरहुगणामिलनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । सिंधुदेशाधिपति जगांत । रहूगण नामें प्रख्यात । पूर्वसंस्कारयोगें होत । अंतर्निष्ठ तो जीवनीं ॥१॥शांति लाभावी म्हणून करित । प्रयत्न बहू परि न लाभत । गंगेजवळी कपिलाश्रमी जात । म्हणोनि आदरपूर्वक तो ॥२॥गौतमीच्या दक्षिण तीरीं असत । आश्रम तो ऐकून सुविख्यात । राजा शिबिकेत बसून जात । स्वनगराच्या बाहेरी ॥३॥मार्गक्रमण त्वरायुक्त । करी तेव्हां भोई श्रान्त । म्हणोनि पहिले बदलून आणित । दुसरे पालखीवाहक ॥४॥तेथ दैवयोगें महामुनीला । आंगिरसा जडभरता पकडून आणला । राजाच्या पालखीला । वाहूं लागला अन्यांसह ॥५॥तो महायोगी तें मानित । प्रारब्धाचे भोग मनांत । म्हणोनि दुःख न करिता पालखी वाहत । रहूगण राजाची त्या ॥६॥परी तो अहिंसा व्रतधारी असत । मार्गी जंतुनाश टाळित । प्राणिवर्जित स्थानीं टाकित । पाऊल आपुलें कटाक्षानें ॥७॥तेणें अन्य वाहकांची गति । मंदावली त्याच्यामुळें निश्चिती । पालखी हालून राजाप्रती । पीडा फार जाहली ॥८॥म्हणोनि क्रोधाविष्ट होत । रहूगण राजा वाहकां आज्ञापित । म्हणे नीट वाहून न्या पालखी त्वरित । लक्ष देऊन प्रयत्नें ॥९॥अन्य वाहक भयभीत । राजासी तेव्हां विनवीत । ही आमुची चूक नसत । विचारा नव्या वाहकासी ॥१०॥आपण कोण हा बोलाविला । तो दुरात्म वाटेत असला । दारुडयापरी चालतो त्याला । जाब विचारा मंदगतीचा ॥११॥तेव्हां राजा त्या महात्म्याप्रत । म्हणे शठा तूं उन्मत्त । दुष्टा मंदगति का चालत । माझ्या सन्मुख या वेळीं ॥१२॥जडभरत त्याला उत्तर देत । रहूगणासी जो योग इच्छित । अनादरें जाणून पात्रभूत । भविष्याच्या प्रभावें ॥१३॥मायामय हे सर्व असत । भरांतिरुप असत्य ज्यांत । तेथ राजजन कैसे पाहत । सामान्य जनासी या जगीं ॥१४॥आम्ही द्वद्वाचा त्याग करुन । समभावीं लाविलें आमुचें मन । आमुचा राजा महाबल असून । शिक्षाकर्ता न होईल ॥१५॥तेव्हां योगमार्ग सोडून सांप्रत । क्रोध कां करावा मनांत । त्याच्या अधीन व्हावें प्रशांत । अज्ञानें हा बोले म्हणुनी ॥१६॥इतुके बोलुन शिबिका वाहत । मौन धरुनी जडभरत । महायोगी तो हृदयांत । गणपतीचें चिंतन करी ॥१७॥परी त्याचें योगग्रथित । महावाक्य राजा जेव्हां ऐकत । तेव्हां मनीं तो भयभीत । होऊनि उतरला धरणीवरी ॥१८॥यज्ञोपवीत संयुत । मलिन विप्रा त्या पहात । चिंध्या अंगावरी दिसत । परी मुखीं ब्रह्मतेज ॥१९॥तत्काळ साष्टांग नमस्कार । घाली राजा जोडून कर । धर्मज्ञ रहूगण राजा थोर । भयविव्हल होऊनी ॥२०॥अज्ञानानें पाप घडलें । म्हणोनि तुम्हां दुःख दिधलें । दयानिधे क्षमा पाहिजे केले । अपराध माझे आपण ॥२१॥आपण कोण विप्र तें सांगावें । उपकृत मजसी करावें । अवधूत महात्मे योगभावे । संचरती कुठेही ॥२२॥तैसे तुम्ही यज्ञोपवीत धारक । मजसी वाटता निष्कलंक । कपिल नारद की पुलहक । अंगिरा ऋतु दत्त अथवा? ॥२३॥किंवा याज्ञवल्क्य आपण आहांत । ऐशा स्वरुपें फिरता जगांत । सांगावें मजसी अविलंबित । आपुलें नांव काय असे? ॥२४॥ब्राह्मणांचा अनादर होत । तेव्हा विप्रेंद्रा मी भयभीत । ब्राह्मणासम अन्य नसत । दैवत या चराचरीं ॥२५॥साक्षात् परमेश्वराचीं शरीरें । वेद ब्राह्मणां मानिती आदरें । कर्म ज्ञान ब्रह्म सारें । आधार त्यांचा ब्राह्मण ॥२६॥ब्राह्मणांच्या मुखांतून । जें ऐकिलें तें पावन । देवस्थानांत देवांसमान । वेदज्ञ ब्राह्मण जाणावे ॥२७॥ब्राह्मणांसी दिलें दान । तें अक्षय पदाचें साधन । उद्वरुन जाती जन । ब्राह्मणांच्या आशीर्वादें ॥२८॥मंत्राधीन देवगण असत । ते मंत्र विप्राधीन जगांत । म्हणोनि देवांचें जीवित । द्विजाधीन सर्व असे ॥२९॥मंत्रहीन तें कर्म निष्फळ । कर्माधीन जग सकळ । म्हणोनि ब्राह्मण असे सबळ । मंत्रज्ञाता सर्वमूळ ॥३०॥कर्मनिष्ठ तपोनिष्ठ । द्विजोत्तम ज्ञाननिष्ठ । योगीजन ऐसे वरिष्ठ । तारक सकळां जगतांत ॥३१॥सर्वांचे गुरु ब्राह्मण असत । म्हणोनि ज्ञानदाते ते प्रख्यात । साक्षात् ब्रह्मस्वरुप असत । ब्राह्मण जगतीं निःसंशय ॥३२॥त्यांची अवहेलना करित । ते शिवमुख्यादि देवही पतित । त्यांची सेवा करिता जगांत । लाभतें सारें इच्छित ॥३३॥ब्राह्मणांच्या शापानें पतित । विष्णु प्रमुख सुरेश्वर जगांत । त्यांचा उद्धार त्या अवतारांत । ब्राह्मणांनीच केला असे ॥३४॥विष्णू शिव आदि देवासीही न भीत । परी ब्राह्मणरोषें मी भयभीत । आता विप्रेशा सांगावें त्वरित । आपण कोण हें मजला ॥३५॥ऐसें बोलून चरण धरित । पुनःपुन्हा त्यासी वंदिते । चरणकमलावरी ठेवित । आपुलें शिर रहूगण ॥३६॥भयव्याकुळ रुदन करित । तेव्हां जडभरता करुणा येत । उठवून त्यासी मृदु स्वरें म्हणत । सांगतों सारें नृपशार्दूला ॥३७॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते जडभरतरहूगणमिलनोनाम विंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP