मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय १४ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय १४ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत ऊर्ध्वस्थलोकवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । ध्रुवाहून महर्लोक वरती । कोटि योजनें दूर वसती । कल्याधिकारी सुख भोगिती । तेथून वरती जनलोक ॥१॥कोटि योचनें दूर जनलोक असत । सनकादी तेथ राहत । ते विमानातून संचार करित । जनलोकावरी तपोलोक ॥२॥जनलोका हून कोटियोजनें दूर । तपोलोक तो सुंदर । वैराज देव भयरहित थोर । वसती तेथ श्रेष्ठ ते ॥३॥सत्यलोक तपोलोकापासून । दूर असे कोटियोजन । अनुनर्भरुप ब्राह्मण । तेथ निवास करताती ॥४॥तेथ लोकगुरुब्रह्मा । विश्वभाषण विश्वात्मा । योगामृतपान करी अभिरामा । योग्यांसहित सर्वदा ॥५॥यती नैष्ठिक ब्रह्मचारी राहती । तेथ वृत्ति तापस असती । सिद्धयानक परमेष्ठी । योगिजनांचे द्वार ॥६॥गणप श्रेष्ठाच्या लोकीं जाती । ते सत्यलोकातून प्रवेशती । ज्वालामाला समाकुल अती । वर्णन करण्या अशक्य ॥७॥त्यांहून वरती निरालंब असत । विश्वरुप विवर्जित । सत्य लोकाच्या अंती व्यक्त । वैराटरुप उत्तम ॥८॥पंचकोटियुत पूर्ण असत । त्याहून दशगुण मही वर्तन । ब्रह्माकारा ती ख्यात । पन्नास कोटी विस्तार युता ॥९॥विधि लोकाहून दूर । दोन कोटी योजने निराधार । शक्तिलोक ज्योतिर्मय अपार । विराजतो शोभन ॥१०॥तेजःपुंजमय त्या स्थानांत । महामाया समाश्रित । निष्काम शक्तिभक्त जात । योगीजन आनंदे ॥११॥दहा हजार योजनें विस्तारात । जन संकुल आसमंत । महाभागा शक्ति तेथ संस्थित । स्वज्ञेनें पुरुष निर्मिति ॥१२॥समरुपिणी त्या स्त्रीभावानें खेळती । जगन्मया पुरुष प्रीतीं । त्या स्थानाहून पुढती । चारकोटी योजनांवर ॥१३॥सूर्यलोक पुरातन । तेजःपुंज रुप महान । निराधार त्या जागीं कामहीन । तेथ जाती निष्काम ते ॥१४॥शुक्लकतीने महाभाग जात । अन्यही जे सूर्यभक्त । निष्काम भजनीरत । भानुतेज समप्रभ ॥१५॥तेथ ते जाती सूर्यलोकांत । विस्तार शक्ति लोकसम असत । तेथ खेळे पुरुषाकार संस्थित । भानू तो प्रकाशमान ॥१६॥आपुल्या वामांगातून निर्मिली । कर्ममयी माया प्रभूने भली । (संज्ञा) नाम ती लाभली । तिच्यासह रमला ब्रह्मपुरुष ॥१७॥त्या सूर्यलोकाहून दूर स्थित । योजनकोटी अनंत असत । विष्णुलोक जो अनंदमयमूर्त । वैकुंठ परम विस्तर ॥१८॥अयुत योजन विस्तार । ज्योतिरुपमय निराधार । तेथ जाती वैष्णव भक्तितत्पर । निष्कामं ते वैकुंठलोकीं ॥१९॥सदा आनंद समायुक्त । नित्य सुखांत जनरत । नरनारी स्वेच्छागति विहरत । विष्णुलोकांत वैकुंठी ॥२०॥वाम भागापासून । भोगलक्ष्मी निर्मून । दक्षिणांगापासून । मुक्तिलक्ष्मी निर्मिली ॥२१॥त्या दोघींसह क्रीडा करित । सदानंदमय विष्णु साक्षात । परमधर्मवेत्ता स्वेच्छया खेळत । द्विविध माया निर्मूनी ॥२२॥विष्णुलोकाहून सोळा कोटी योजनांवर । शंकरलोक कैलास दूर । परम अद्भुत जो निराधार । मोहहीन सुखप्रद ॥२३॥निष्काम शिवभक्त तेथ जात । ज्योतिर्मय कल्याणदायक असत । ऐश्या त्या लोकांत । स्वयं शंभू निवास करी ॥२४॥अयुत योजनांचा विस्तार । योगज्ञ तेथे क्रीडापर शंकर । वामांग त्याचें प्रकृति आकार । दक्षिणांग पुरुषाचें ॥२५॥त्या दोघांच्या संयोगे जन्मत । दक्षा आनंद तो परि कीर्तित । नारायणमयी शक्ति असत । अर्धनारी नर शिव ॥२६॥त्या देवाची ती शक्ति । त्रिधा केली शंकरें युक्ति । जगता आनंददायिनी ती । तिच्यासह खेळे महादेव ॥२७॥मायाधार स्वलोकग मोहहीन । क्रीडारत तो शंकर पावन । पुढें त्या शिवलोकाहून । ब्रह्म स्वानंदसंज्ञ असे ॥२८॥त्या ब्रह्म पदाहून पर । कांही नसे ह्या विश्वांत थोर । वेदादींत ख्यात अपार । स्वसंवेद्य तें ब्रह्म ॥२९॥ते चार विश्व झालें । संयोग मात्रें तन्मयत्व पावलें । अव्यक्त शिव ब्रह्म निर्मोह कथिलें । त्याच्या सम वैष्णव ब्रह्म ॥३०॥त्यापासून जें आत्मस्वरुप अमृत । तें सूर्याकार ख्यात । त्यापासून सन्मय होत । शक्तिरुपें संस्थित ॥३१॥त्यांची अभेद संप्राप्ति । त्याची स्वानंद ऐसी कीर्ति । ऐशिया परी सर्व तत्त्वांती । स्व स्व आनंद वर्णिती ॥३२॥ब्रह्मनानाविध वर्णितो । आकाशादी भेदें ख्याती । तेथ क्रमार्थ स्वमहिम्यांत स्थिति । आनंदाची जाहली ॥३३॥अंती पूर्णत्व संपन्न । साक्षात गणपति महान । स्वानंद सर्व संयोग पावून । समाधीपूर्वी म्हणतात ॥३४॥स्थानीं स्थानीं निजानंदांत । गणेश असे संस्थित । कलांशानें विहारार्थ वसत । सर्वांच्या सिद्धीसाठीं ॥३५॥ऐसे जे ऊर्ध्वलोक कथिले । अति संक्षेपमात्रें तुज भले । ते ऐकता पावतील सगळे । इच्छित काम जगतांत ॥३६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते ऊर्ध्वस्थलोकवर्णनं नाम चतुर्दशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP