मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ६० खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ६० मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत भ्रूशुण्डीब्राह्मणत्ववर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । कैवर्तक महादुष्ट पाहत । मुद्गला मुनिशार्दूला महावनांत । त्या मुनिवरा पाहून पापयुक्त । चित्त त्याचें पुनरपी ॥१॥खड्ग उगारुन मारण्या धांवत । हटाग्रह तो पापीं असत । समींप जाऊन खड्ग उगारित । तों तें खड्ग गळून पडलें ॥२॥धरणीतलावर तलवार । गळून पडतां अन्य शस्त्र । मुद्गल मारण्या अनिवार । जें जें उगारीं तें तें व्यर्थ ॥३॥अन्य शस्त्रें दृढबद्ध पडत । धरातलीं तें क्षणांत । जाहला कैवर्तक विस्मित । म्हणे काय हें अद्भुत ॥४॥मुद्गलाकडे दुष्ट तो पाहत । अहो आश्चर्य ऐसें म्हणत । अतिदारुण परी होत । निर्मलचित्त क्षणर्धांत ॥५॥महादुष्ट हात जोडित । मुद्गल मुनीस प्रार्थित । योगिदर्शनमात्रें होत । वर्तन तैसें वचन योग्य ॥६॥नामा म्हणे मुद्गलांप्रत । जन्मापासून आजपर्यंत । बुद्धि माझी पापनिश्चययुक्त । पापें अगणित मीं केलीं ॥७॥आतां कुंडांत स्नान केलें । निर्मलत्व बुद्धीस आले । पापांचें भय उत्पन्न झालें । तुझ्या दर्शनें संतोष ॥८॥संतुष्ट झाली मम मती । इच्छी मुक्ति । शस्त्रें पडली असती । पुनरपि तीं न घेईन ॥९॥संसारतारक उपदेश करावा । प्राज्ञा आताम मजसी बरवा । मुक्तीचा उपाय सांगावा । मुद्गल तें ऐकून म्हणती ॥१०॥आपुलीं शस्त्रें उचलून । घरीं जा तूं परतून । तेव्हां तो चोर प्रणाम करुन । पुनरपि प्रार्थी मुनीला ॥११॥डोळ्यांत पश्चात्ताप दाटत । अश्रुरुपें तो वाहत । महाखल नामा विनवीत । योगींद्रा मज शिष्य करी ॥१२॥अन्यथा मी देह त्यजीन । तुमच्या समक्ष उन्मन । महाभागा विषयांत मन । यापुढें माझें न रमेल ॥१३॥ऐसें त्याचें वचन आर्त । ऐकून म्हणे योगी भक्त । शरणागत वत्सल तो त्वरित । ‘गणेशाय नमः’ हा मंत्र जप ॥१४॥स्वतःमंत्रदीक्षा त्यास देत । आपुली काठी तेथ पुरित । म्हणे शुष्क काष्ठ असे पुढयांत । मंत्र अविरत जपत राही ॥१५॥महाखला जोपर्यत । हया काठीस अंकुर न फुटत । जप हा मंत्र सतत । शुद्ध तेणें तूं होशील ॥१६॥फळ जळ मूळ पर्णभक्षण । न करावें तूं सर्वक्षण । करावें केवळ वायुभक्षण । ऐसा तपें शुद्ध होशी ॥१७॥ऐसें सांगून गाणपाग्रणी । महादुष्टा त्या नाम्यासी झणीं । अंतर्धान योगप्रभावें करोनी । पावला नंतर काय झालें ॥१८॥नामा गणेशमंत्र जपत । वर्ष सहस्त्र अविरत । अंगावरी त्याच्या वाढत । वारुळही परी न हाले ॥१९॥गवत वृक्षादी वाढत । सभोवताली तो त्यांत संवृत । तथापि नाममंत्र जपत । दृढभक्तीनें सर्वकाळ ॥२०॥नाममंत्राच्या प्रभावें फुटत । अंकुर सुकल्या काष्ठाप्रत । पाप सर्व विलया जात । पुण्यराशी उभी ठेली ॥२१॥अति पुण्यें भक्तिभावानें फुटत । सोंड त्याच्या भरुमध्यांत । तेणें गजाननच दुसरा वाटत । नामा झाला महाशक्त ॥२२॥नंतर तेथ मुद्गल येत । महायश एकदा अकस्मात । शिष्याची त्या आठवण होत । साधुसत्तमा दैवयोगें ॥२३॥ज्या स्थळीं नामा जप करिते । बैसला होता अखंडित । तेथ जाऊन पाहत । शुष्ककाष्ठा अंकुर फुटले ॥२४॥तें पाहून विस्मित । म्हणे कुठें गेला शिष्य पुनीत । चंचल भाव सोडून कष्टवित । देह आपुला तपांत ॥२५॥महातप तो त्यासी न दिसत । परी वारुळ एका पुढयांत । त्यांतून ध्वनी ऐकू येत । गणेशाय नमः हा अविरत ॥२६॥त्या वारुळांतून चमकत । दोन डोळे तेजयुक्त । काठीने वारुळ फोडित । जल सिंचन करी नाम्यावर ॥२७॥त्यानें नामा सावधान । होऊनी उघडी आपुले नयन । गुरुस पाहून अभिवादन । साष्टांग घाली भक्तीनें ॥२८॥नंतर त्याचा करुन सन्मान । देउनी दृढ आलिंगन । म्हणे वारुळांतून उत्पन्न । पुत्र तूं माझा निःसंशय ॥२९॥ब्राह्मणमुख्य तूं होशील । भरुशुंडी नामें ख्यात अमल । नाममंत्रे सिद्ध विमल । सर्ववंद्य तूं होशील ॥३०॥तुझ्या दर्शनमात्रें लाभत । प्राणिमात्रां मुक्ति जगांत । लक्षकल्प काळ जीवित । राहशील तूं महामुने ॥३१॥प्रतिकल्पीं शिष्य जगांत । शिवादी होतील समस्त । ऐसा वर देऊन तयाप्रत । महामंत्र देई गणेशाचा ॥३२॥एकाक्षर मंत्र विधानपूर्वक देत । नंतर अन्तर्धान मुद्गल पावत । तो भरुशुंडी तप आचरित । वर्ष एक अतिउत्तम ॥३३॥त्याच्या तपानें प्रसन्न । प्रकटले प्रत्यक्ष गजानन । म्हणती महाभक्ता तुझें मन । कोणती वांछा सांग करिते ॥३४॥तेव्हां भरुशुंडी स्तुति स्तोत्रें गात । स्वानुभव त्यांत वर्णित । नमन गणनाथा तुजप्रत । ढुंढे सुशांतिप्रदा ॥३५॥शांतिपूर्तीसी अपारयोगासी । योगी भजती तयासी । प्रजापतींच्या विधात्यासी । गणनाथा विष्णूसी ॥३६॥तूं उत्पत्तिकर्त्यांत विधाता । तैसा पालकर्त्याचा पालनकर्ता । संहारकांत हर तूं तत्त्वतः । कलांश मात्रें विराजसी ॥३७॥क्रियात्मकांत जगदंबिका असत । प्रकाशकांत रवी साक्षात । यत्नप्रदात्यात गुणेश ख्यात । कलांशमात्रें तुज नमन ॥३८॥शरीरधारकांत तूं बिंदू अससी । सुबोधरुप स्वतः उत्थानकांसी । विदेहकांत सांख्यरुप दिससी । समाधिदात्यांत निजात्मक ॥३९॥निवृत्त योगांत अयोगधारक । कलांशमात्रें तूंच एक । गणनाथा तुझें हे गुण पावक । नमन तुजला पुनः पुन्हा ॥४०॥वेदादींत असती वर्णित । योगकीर्ते गण समस्त । सदा सुशांतिप्रद संस्थित । भक्तिप्रिया तूं भक्तेशा ॥४१॥‘ग’कार ही मोहदात्री सिद्धि । ‘ण’ कार मोहधात्री बुद्धि । त्यांचा विलासी पती सुद्धधी । गणेश्वरा तूं तुज नमन ॥४२॥गकाररुपें देवा गौण । णकाररुपें अतूं निर्गुण । त्यांच्या अभेदें गणनाथ सगुण । योगीशा तुज नमन असो ॥४३॥किती वर्णावें महिमान । अद्भुत जें अति पावन । वेदादीसही भरांत पडून । वर्णन करण्या असमर्थ ते ॥४४॥पतितांत मी श्रेष्ठ पतित । परी नामप्रभावें झालों मुक्त । ब्राह्मणोत्तम जगांत । मी संस्कारहीन चोर होतों ॥४५॥संस्कारयोगें विश्वामित्रादिक पावत । ब्राह्मणत्व जगांत । तैसा मीं होतों पापासक्त । तरी केलेंस मज तूं ब्राह्मण ॥४६॥ऐसें बोलून कर जोडित । भक्तिभावें पुढयांत । त्याच्या स्तवनें संतुष्ट चित्त । गजानन त्यास म्हणे ॥४७॥अरे विप्रा जें वांछिसी । तें तें देईन मीं तुजसी । तुजसम तेजस्वी भक्तासी । तुलना नसे जगांत ॥४८॥गणेशवचन ऐकून । डोळयांत आनंदाश्रू दाटून । महामुनी भरुशुंडी गद्गद वचन । बोले तया गजानना ॥४९॥तुझी भक्ति अतिदृढ चित्तांत । सर्वदा व्हावी प्रतिष्ठित । ऐसें वरदान मजप्रत । द्यावें देवा गजानना ॥५०॥तथास्तु म्हणे गजानन । क्षेत्र तुझें अति महान । होईल येथ एक पावन । अमलाश्रमक नांवाचें ॥५१॥जे जन येथ सेवा करिती । त्यांची अज्ञानज पापें हरतीं । त्यांसी होय ज्ञानप्राप्ति । अति निर्मळ मोक्षप्रद ॥५२॥ऐसा वर देऊन । गणेश पावले अन्तर्धान । भरुशुंडी भक्तिभावपूर्ण मन । भजे तयासी निरंतर ॥५३॥एकनिष्ठ तो महाभक्त । अन्य तीर्था न जात । अन्य देवा न मानित । गणेशाहून तो योगींद्र ॥५४॥ब्राह्मणनिष्ठ त्या महा क्षेत्रांत । आनंदानें नंतर जात । गणनाथाची भक्ति करित । सदैव प्रेमभक्तीनें ॥५५॥त्या भरुशूंडीचे जगांत । ब्रह्मर्षी अमल भक्त होत । क्षेत्रसंन्यासभावें सेवित । महामुनीस ते सारे ॥५६॥त्याच्या दर्शनाथ जाती । कश्यप शुकादी सर्व यती । गणनाथासी पूजिती । कृतार्थ मानिती स्वतःला ॥५७॥नंतर स्वस्थला परतती । शुंडाधर मुनीस प्रशंसिती । इंद्राई देव तेथ येती । दर्शनार्थ भरुशुंडीच्या ॥५८॥ब्रह्माविष्णू महेशादी ईश्वर । त्याच्या दर्शनोत्सुक घोर । संतुष्ट होऊन शुण्डाकर । अनुभव वर्णिती महामुनीचा ॥५९॥ऐसा तो चांडाळ चोर होत । नामा भरुशुंडी भक्त प्रख्यात । गणेश स्मरणाचा प्रभाव अद्भुत । अवर्णनीय सर्वथा ॥६०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीयेखण्डे एकदंतचरिते भरुशुंडिब्राह्मणत्ववर्णनं नाम षष्टितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP