मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ५३ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ५३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत मदासुरपराजयः Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । गृत्समद कथा सांगत । प्रल्हाद भक्तिभावें ऐकत । ऐसा वर देऊन देवमुनींप्रत । एकदंत स्वपुरा परतला ॥१॥नंतर एकदा दैत्येद्राप्रत । नारदमुनी भेटण्या जात । मदासुर महाक्रूर करी स्वागत । सन्मान करी तयांचा ॥२॥त्या महादैत्यातें म्हणत । हास्य करुन नारद क्षणांत । दैत्यपते माझ्या वचनाप्रत । ऐक सुखप्रदायकास तूं ॥३॥वनांत देवविप्रांनी आचरिलें । सुदारुन तप भलें । शंभर वर्षे तेणें तोषले । गणेश ब्रह्मनायक ॥४॥वर मागण्या तो सांगत । तेव्हां तुझा वध देव याचित । तो वर गणेशें त्वरित । दिधला असे तयांना ॥५॥तो गणेश तुज वधील । तुझें राज्य जाईल । असुरांचा विनाश ओढवेल । म्हणोनी सावध तूं रहा ॥६॥नारदांचे ऐकून वचन । क्रोधे आरक्त मदासुर होऊन । त्या मुनीस तेथ सोडून । एकांती दुःख करु लागे ॥७॥ब्रह्मांडवासी जे जे असत । त्यांपासून मृत्यू मज नसत । तरी कोण हा एकदन्त । मज मारण्या येणार? ॥८॥त्यासची मारीन मीं क्रोधयुक्त । मी देवांस सोडिलें दयायुक्त । आता ते शत्रुभाव धरित । त्यांसीही ठार करीन मी ॥९॥दैत्येंद्रे पूर्वी जे सांगितलें । तें तें सत्य आज झालें । असुरांचे सर्व देव ठरले । शत्रू वेदाधारें सदा ॥१०॥ऐसा विचार करुन । महा असुरांते बोलावून । देवनाशार्थ उत्सुकमन । सैन्यासहित निघाला ॥११॥तेवढयांत महादेव अकस्मात । देव एकदंत त्यापुढें प्रकटत । प्रतापी तो शक्तियुक्त । भयदायक असुरांसी ॥१२॥मूषकारुढ उग्र तो असत । नरनाग स्वरुप दिसत । शस्त्रपाणी चतुर्बाहुयुक्त । पाहून सुविस्मित दैत्य होती ॥१३॥नंतर ते कोलाहल माजवित । सर्वही त्या आसमंतात । म्हणती कोण हा उपस्थित । पहा हो महा कौतुक हें ॥१४॥त्यास पाहून भयभीत । झाले दैत्यवीर समस्त । तेथेच उभे राहून म्हणत । आपुल्या दूतासी वचन ते ॥१५॥अरे दूता तूं त्वरा करुन । जावें त्या पुरुषा सन्निध जपून । सर्व वृत्तांन्त जाणून । परत येई सामोपचारें ॥१६॥तेव्हां तो असुरदूत । एकदंता समीप जात । त्यांसी प्रणाम करुन म्हणत । देव नायका गणेशातें ॥१७॥स्वामी, मदासुराचा मी दूत । तो ब्रह्मांडांचा राजा असत । त्यानें मज पाठविले असत । आपणा पाहून विस्मित तो ॥१८॥आपण कोण कोठून आगमन । काय काम नाव काय पावन । आपण कोणाच्या पक्षाचे म्हणून । सर्वज्ञा सारें सांगावें ॥१९॥संशय असुरांचा दूर करावा । ऐसा कृपाप्रसाद द्यावा । ऐसें विचारता एकदंत बरवा । म्हणे हसून दैत्यदूतासी ॥२०॥अरे विचक्षण दूता सांप्रत । ऐक परिचय संक्षेपांत । मी स्वानंदवासी असत । स्वानंद लोकाहून आलों ॥२१॥मदासुरा मारण्यास । देवांची सुखवृद्धी करण्यास । माझें नाव एकदंत सुरस । ब्रह्मसुखात्मक अरे दूता ॥२२॥अरे दूतवर्या सांग जा त्वरित । त्या मूढा मदासुराप्रत । जरी जीवनेच्छा असेल मनांत । तरी शरण ये मजला ॥२३॥देवांचा द्वेष सोडून । आपल्या नगरांत जाऊन । तेथ सुखानें करी वसन । देवां हविर्भाग मिळू द्यावा ॥२४॥दैत्य पाताळींचे भोग जगांत । भोगतील अविरत । तेणें विश्व सारें सुखांत । होवो स्वधर्मपरायण ॥२५॥याचसाठी मीं अवतरलों । सत्यधर्माचा रक्षक झालों । आतां मनींचे सर्व वदलों । सविस्तर मी हेतू तुज ॥२६॥त्या मदासुरासी सविस्तर । सांग महाक्रूरास सत्वर । माझा संदेश सामपर । न ऐकतां मारीन क्षणीं ॥२७॥एकदंताचें वचन ऐकत । दैत्यदूत त्यासी प्रणाम करित । मदासुरासी वृत्तान्त । जाऊन त्यानें सांगितला ॥२८॥दूताचें वचन ऐकत । तेव्हा दैत्यपुंगव पडला मूर्च्छित । दैत्यांनी सावध करिता आर्त । तोही शोक करु लागे ॥२९॥नारदांनी जें सांगितलें । तें सर्व दैत्यां कथिलें । म्हणे तें सत्य जाहलें । माझा हाच तो शत्रू असे ॥३०॥त्या एकदंतासी मारीन । शस्त्रें अस्त्रें वापरुन । मज मृत्यूचें भय कोठून । काळाचा मी काळ असे ॥३१॥ऐसें बोलून पापी जात । मदासुर मदसमन्वित । एकदंतावरी सोडित । एक उग्र शस्त्र तेव्हां ॥३२॥अनिवार्य अमोघ शस्त्र पाहत । गजानन परशू तोलित । यमसंनिभ तो टाकित । मदासुरावरी तेव्हां ॥३३॥तेजयुक्त परशू पाहून । दैत्य पळाले भयभीत होऊन । दैत्यराजाचे अस्त्र तोडून । दैत्यहनन परशू करी ॥३४॥अरे प्रल्हादा त्रिपुरादि असुर । परशुभयें संत्रस्त समग्र । पळाले रणभूमीवरुन उग्र । मदासुर परी त्वेषें लढे ॥३५॥त्याने संहार नामक अस्त्र जोडून । धनुष्य सज्ज केलें उन्मन । परी तत्क्षणीं केलें हनन । हृदयावरी परशूनें ॥३६॥दैत्यपुंगव परशूने ताडित । धरापृष्ठी गळून पडत । वृक्ष जो जाहला वाताहत । जैसा उन्मळून पडतसे ॥३७॥प्रहारर्धानें सावध होत । दैत्येश परशुराज पाहत । यमसन्निध अस्त्रासहित । विस्मित हृदयीं जाहला ॥३८॥हा परशुराज मज न दिसत । तेजःपुंज जरी असत । हातांत धरी दैत्य उन्मत्त । परी आकाशसम शून्य भासे ॥३९॥तेव्हां मदासुर उमजे हृदयांत । म्हणे ब्रह्ममय हें शस्त्र असत । अवयवहीन परम अद्भुत । कोण हा एकदंत येथ आला ॥४०॥हा ब्रह्माकार निःसंशय असत । हयासवें लढणें कठिण दिसत । हा मज मारील निश्चित । हयात संशय काही नसे ॥४१॥ऐसें मनीं चिंतित । दैत्येश मदासुर क्षुब्ध होत । दैवयोगें आठवीत । वेदवाक्य सुखप्रद ॥४२॥एकदंताच्या रुपाचें ज्ञान । हृदयीं उमजला दैत्येश पावन । मदासुर विघ्नपाचें करी मनन । एकदंत नांवाचें ॥४३॥एक म्हणजे मायायुक्त । त्यापासून सर्व संजात । भ्रांतिप्रद मोहद नाना खेळयुक्त । संपूर्ण जग हें जाणावें ॥४४॥दन्त शब्द सत्तात्मक असत । माया चालक जो होत । बिंबाने होऊन मोहयुक्त । स्वयं स्वानंदग जाहला ॥४५॥माया भ्रांतिमयी वर्णिती । सत्ता चालक म्हणती । त्यांचा संयोग जगतीं । गणेश हा एकदंत ॥४६॥मदासुर म्हणे मनांत । माझे परम भाग्य असत । तेणें हा आला दुष्टिपथांत । विनासायास आज पाहिला ॥४७॥तेव्हां यासी जावें शरण । शुक मुख्यु मुनी करिती स्मरण । भक्तींने भजती सिद्धिरमण । ब्रह्मभूत महाभाग ॥४८॥ऐसा भक्तिभाव उपजून । मदासुर सोडी अभिमान । तेणें दोष निरसून । एकदंतासी शरण गेला ॥४९॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते मदासुरापराजयो नाम त्रिपंचाशत्तमोऽध्याय समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP