मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय १५ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय १५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत सप्तपाताकवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा पुढेती सांगती । सप्तपातालांची माहिती । अतल वितल सुतल तलातल असती । महातल रसातल पाताल ॥१॥अतल श्यामवर्ण असत । ते अधोभूमींत । अयुत योजनांचा प्रशस्त । लक्ष योजन विस्तार ॥२॥मयपुत्रानें संयुक्त । तैसाचि नमुचि तेथ राहत । अन्य नागांनी सुशोभित । विविध परींच्या अतल तें ॥३॥वितल श्वेतवर्ण असे । अतलाच्या खाली विलसे । अयुत योजनें विवर मात्र दिसे । तेथ नागासुर सुखें राहती ॥४॥कंबल शंकुकर्ण हयग्रीव । जृंभक ख्यात नाम सर्व । सुतल पीतवर्ण अभिनव । वितलाखाली विसावलें ॥५॥तेथें वैतनेतायादी पक्षी राहत । दैत्याधिप बळी निवसत । काळनेमी आदी दैत्य स्थित । नागही निर्भय करिती ॥६॥त्या सुतलाखाली तलातल । शार्करं तें अमल । मयासुर बाण अंधक सबल । राहती तेथे सुखानें ॥७॥अन्यही नाग विगतज्वर । काळकेय महादेह् थोर । निवातकवचादी नाग उग्र । तेथ राहती आनंदे ॥८॥महातल कृष्णवर्ण असत । तेथ तक्षक पन्नगादी नाग वसत । सुखभोग ते भोगित । हिरण्यपुरधिष्ण्या दैत्य तसा ॥९॥अन्य हजारो दैत्य निवसत । देवांचें भय त्या येथ नसत । प्रजापते महातलाखाली स्थित । रसातल पाताल ॥१०॥रसातल शैलमय स्थित । वासुकि प्रमुख नाग राहत । तैसेचि नानाविध दैत्य नांदत । सर्व शोभाढय विवरांत ॥११॥नाना सौख्यप्रद त्या स्थानांत । तेजस्वी तीक्ष्ण विषयुक्त । ऐसे ते नाग विहरत । सातवें तें पाताल ॥१२॥पाताल निळे त्या खालती । शेषनागाची तेथ वसती । दैत्यसुर नाग सेविती । नागराजासी तेथे ॥१३॥भक्तियुक्त ते विवेकयुक्त । नानाविध घरें पाताळ विवरांत । वनें ग्रामें नगरें असत । विचित्र भोगयुक्त सारीं ॥१४॥नानापरींचे वृक्ष खग असती । प्रभायुक्त मंदिरें तळीं विलसती । त्यात कमळें सदैव फुलती । स्वर्ग समभोग भोगिती ॥१५॥हृष्ट पुष्ट सर्वजन । नियुत वर्षे जीवनमान । अपार आयु महातेजस्वी असून । देवादीस दुर्जय ॥१६॥त्याच्याखालीं तीस सहस्त्रे योजनें । शेष राहतो आनंदाने । गणेशभक्ति संयुक्त मनें । गणेशअंश समुद्भव तो ॥१७॥विष्णूचा कलावतार । तैसाचि स्मृत जो काळरुद्र । सहस्त्र आननेंयुक्त उदार । महाभाग महाबल ॥१८॥त्याच्या विषाच्या ज्वाला । जाळतील जगा सकळा । मृत्यूवर्जित तो आगळा । एकला अनंत प्रख्यात ॥१९॥ब्रह्याच्या दिवसांनी लय करुन । राही तो तेथ स्थिरमन । वासुकीप्रमुख नागराजे उत्सुक मन । सेवा करिती तयाची ॥२०॥असुर प्रल्हाद प्रमुख सेविती । नागयोषिता त्यास पुजिती । कामना पुर्तीसाठी भजती । भक्तितत्पर सारे जन ॥२१॥त्याच्याखालीं कच्छप स्थान । विष्णूचा जो अवतार महान । एक सहस्त्र योजनें स्थान । पसरले जें विशेषयुत ॥२२॥तेथ त्यास वरुणादी सेविती । नारायण कूर्मरुप महामती । अन्तमय तेजस्वी द्युती । ऐसे तें कच्छप स्थान ॥२३॥त्या स्थानापासून खालती । सहस्त्र योजनें होय स्थितीत । वराहरुपधर विष्णूची प्रचीति । शत्रुपुर विजेत्याची ॥२४॥धरित्रीमुख सारे सेविती । भक्तितत्पर विनमरप्रगति । महादेव जो करालमुख ख्याती । स्वभक्तांसी अभयप्रद ॥२५॥शेषास आधार हें सर्व । तैसेचि कूर्माचा आधार । वराहरुपाच्या आधरें देव । राहती अन्य विश्वांत ॥२६॥वराह निराधार स्मरत । गणेशासी स्वहृदयांत । त्याच्या प्रभावें सर्वाधार स्मृत । ऐसे वराहाचें हें स्थान॥२७॥त्या वराहस्थानाखालती । रौरवादी नरक असती । यातनामय जे करिती । पापीजनांचे शुद्धिकरण ॥२८॥रौरवतामिस्त्र महारौरव । अंधतामिस्त्र सूचीमुख अपर । लोहदंड तप्तवालुक खङगपत्र । लालास्य कृमिभक्ष्यादी ॥२९॥ऐश्या बहुविध नरकांत । पापकारी पीडा भोगित । त्या ब्रह्मगोलाचा इतिहास अद्भुत । संक्षेपे तुला निरुपिला ॥३०॥विस्तारें अशक्य कथन । प्रजापते दक्षा हे रहस्य महान । शापमोहें भरांतियुक्त मन । जाहले तुझे म्हणोनी ॥३१॥गणेशाची आरधना करशील । तरी भरांति नाश होईल । तेव्हां तत्वतः सर्व जाणशील । यांत संशय काहीं नसे ॥३२॥ऐसे सर्वांत सामान्य असत । ब्रह्मांडांत हें जगत । अष्टावरण युक्तांत । गुणेश आधारें सारें ॥३३॥हें गणपतीचें रुप स्थित । ब्रह्माण्डा व्यापून अद्भुत । संक्षेपें कथिलें तुजप्रत । सर्व सिद्धिप्रद हें असे ॥३४॥जो नर हे भक्तीनें वाचित । किंवा आदरें ऐकत । त्यास भुक्तिमुक्ति लाभत । पाप कंचुक नष्ट होय ॥३५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते सप्तपातालवर्णन नाम पंचदंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP