मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय ५ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय ५ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत स्वायंभुववरप्रदानम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल कथा पुढें सांगती । ब्रह्मसुत नऊ ख्यात जगतीं । ते परम तप आचरती । दिव्यवर्ष सहस्त्रकाळ ॥१॥गणेशातें मनीं ध्याती । एकाक्षरविधानें पूजिती । वायुभक्षण करुन राहती । तोषविती त्या आदरें ॥२॥तेव्हा त्यांवरी प्रसन्न होत । गणेश भक्तवत्सल त्वरित । मूषकवाहन तेथ येत । वर देण्याला तत्काळ ॥३॥अनंत सूर्यसम तेज पाहती । तेव्हा ते ब्रह्मपुत्र त्यां नमिती । हर्शसंयुत चित्तीं । सौम्यरुपासी कर जोडुनी ॥४॥दक्षमुख्यक ते स्तविती । परमात्म्या गणेशाची प्रीति । त्याच्या दर्शनमात्रें रहस्य जाणती । भक्तीनें मान वाकविती ॥५॥ते नऊ प्रजापति । गणेशाची स्तुति करीती । विघ्ननाथा वंदन तुजप्रती । सर्वसाक्षी नमन तुला ॥६॥सर्वात्म्यासी योगासी । स्वसंवेद्यरुपा ब्रह्मदात्यासी । योग्यांसी गम्यरुपासी । शांतियोगप्रदा नमन असो ॥७॥स्त्रष्टयासी पालकासी । संहाकारासी अव्यक्तासी । नाना रुपधारकासी । व्यक्तरुपा नमन तुला ॥८॥ब्रह्मविष्णु शिवरुपासी । भानू शक्ति इंद्रस्वरुपासी । नमन तुज तुज अग्नि अससी । तूं नैऋति वरुण कुबेर ॥९॥वायु रुद्रशेष असत । ग्रहणक्षत्र रुपांत । सिद्ध साध्यमय तूं विलसत । अन्न फळ रसरुपांनी ॥१०॥पशुरुपासी नररुपासी । वृक्षाकारासी पर्वतासी । समुद्रासी नदीनदरुपासी । दैत्यनाथा तुज नमन ॥११॥राक्षसासी पंचभूतमयासी । सर्वाकारासी चिद्रूपासी । बोधासी विदेहासी । असत्या सत्या तुज नमन ॥१२॥समरुपासी साधूसी । स्वानंदासी अयोगासी । योगासी गणधारकासी । सर्वशांतिप्रदा तुज वंदन ॥१३॥गणेश चिंतामणे तुझी स्तुति । कोण संपूर्ण करुन शके जगतीं । तुझ्यामुळें चित्तवृत्तिं प्रकाशती । प्रमाण तुज भक्तिभावें ॥१४॥मुद्गल म्हणती विधीचे नऊ सुत गणेशाची स्तुति करीत । तेणें गणधीश संतुष्ट । विविध वरदान त्यांसि देई ॥१५॥तुमचें हें स्तोत्र मज प्रिय । जो वाचील ऐकेल वा सदस्य । त्यासी पुत्रपौत्रकलत्रादी प्राप्त होय । वंध्यत्वादी दोष नष्ट ॥१६॥भुक्तिमुक्तिप्रद मनेप्सितद । ब्रह्मभूयकर हें सुखद । वरदान ऐकून मोदप्रद । महाभक्तीनें पुन्हा नमिती ॥१७॥ते म्हणती तदनंतर । जरी प्रसन्न तू जर दे हा वर । तुझी भक्ति चित्तीं स्थिर । राहून मोह नष्ट व्हावा ॥१८॥सृष्टिरचनेचें सामर्थ्य अतुल । विनायका देई आम्हां बल । आम्ही जें जें इच्छूं सर्वकाळ । तें तें सिद्ध व्हावें सर्वदा ॥१९॥‘तथास्तु’ म्हणोन गणाधीश । अन्तर्धान पावला सर्वेश । नवपुत्र विधीचे ध्यात त्यास । आपापल्या स्थानी’ गेले ॥२०॥नंतर ब्रह्मा दक्षनामक सुतासी । म्हणे तू करी शक्तिजपासी । जेणें तुझी सुता होऊन तुजसी । वरदान अपूर्व देईल ॥२१॥दक्ष करी शक्तीची उपासना । शतवर्षे तिची आराधना । तेव्हां तिने प्रकटून साधना । सफल केली विधिपुत्राची ॥२२॥दक्ष प्रणाम करुनी स्तवित । शक्तिरुपा माया तूं असत । मोहस्वरुपा जगाचें धारण करित । जगन्माते नमन तुला ॥२३॥सर्वांना प्राणदात्री सर्वरुपिणी । अनादी आदिभूता पार्वती भवानी । गायत्रिका सावित्री प्रकृतिरुपिणी । पुरुषाख्ये तुज नमन ॥२४॥नामरुप्रकाशिनीसी । निर्गुणेसी गुणधारिके तुजसी । दाक्षायणि प्रसन्न हो मजसी । माझी तूं पुत्री होई ॥२५॥तेव्हां पार्वती दक्ष प्रजापतीप्रत । म्हणे होईन सुता निश्चित । नानारुपधरा मी जगांत । निर्मिन बहुविध पुत्र सुतां ॥२६॥तूं केलें हे माझें स्तोत्र । वाचील ऐकेल जो पवित्र । त्याचें सर्वकाम चित्रविचित्र । पूर्ण होतील निःसंशय ॥२७॥तदनंतर देवी होत अन्तर्धान । तूं सांडिलें गणेशस्मरण । त्याचा मंत्र विसरुन । तिरस्कार केलास मुलीचा ॥२८॥ती सती भस्म जाहली । तुझी यज्ञसत्रें नष्ट झालीं । शोकसंतप्तता चित्ता आली । विघ्नेश्वराच्या कोपानें ॥२९॥परी पूर्व संस्कारयोगें होत । विघ्नेश्वराची स्मृति जागृत । आतां तूं गणेशभक्तियुत । ऐक कथामृत अवीट हें ॥३०॥राज्यलक्ष्मी होतां प्राप्त । मदांध होतो मानव त्वरित । म्हणोनी न वांछिती साधुसंत । लक्ष्मी ज्ञान विनाशिनी ॥३१॥स्वायंभुव मनू पत्नीसहित । जाऊनिया प्रशांत वनांत । अष्टाक्षर विधाने तोषवित । विघ्नपा गजाननादेवा ॥३२॥दिव्यवर्षे सहस्त्र घोर तप करित । गणेश तेव्हां प्रसन्न होत । त्याच्या पुढयांत प्रकटत । वरदान देणय तयासी ॥३३॥त्यासी पाहून प्रणाम करित । परम भक्तीनें पूजित । नंतर स्तुतिस्तोत्र गात । मनु स्वायंभुव गणेशाचे ॥३४॥गजवक्त्रासी हेरंबासी । ओंकारकृतिरुपासी सगुणांसी । गजरुपासी । सदा ब्रह्मसुखात्म्यासी नमन ॥३५॥गणेशांची भक्तपोषकासी । नरकुंजररुपा योग अभेदासी । चतुर्बाहुधरा पुरुषार्थ प्रसिद्धासी । विघ्नराजासी नमन असो ॥३६॥नानाभोग्धारकासी । अनंत लीलास्वरुपा तुजसी । भक्तांची विघ्नें विदारणारासी । सत्यासत्यमाया तुज नमन ॥३७॥अव्यक्तभेदात्म्यासी स्वानंदपतीसी । सदा स्वानंददात्यासी । मूषकारुढा सर्वांतर सुभगा तुजसी । सिद्धिबुद्धिपते नमन ॥३८॥नाना अमृतसमुद्री क्रीदाकरासी । द्विधा माया प्रसारकासी । भक्तांसी योगदात्यांसी । योगकारासी नमन असो ॥३९॥वेदोपनिषदां लभ्यासी । महावाक्यमयासी । ब्रह्मभूता ब्रह्मराशे तुजसी । नमस्कार पुनः पुन्हा ॥४०॥जेथे वेद जाहले विस्मित । योगी शेषमुख्य शंकरादि अशक्त । तेथ तुझी स्तुति मजप्रत । संपूर्ण करणें संभव नसे ॥४१॥तथापि गजानना तव दर्शनें । स्फूर्ति लाभून मुदितमनें । मी स्तविले तुज भक्तीनें यथामति यथाशक्ति ॥४२॥अहो माझे भाग्य थोर । म्हणोनि पाहिला वेदांतगोचर । गजनान लंबोदर । धन्य माझी माता पिता ॥४३॥धन्य माझे तप ज्ञान । विद्या व्रतादिक जीवन । लाभलें तव चरणांचे दर्शन । धन्य धन्य जीवित माझें ॥४४॥ऐसें गणाधीशा स्तवित । परमभक्तियुत रोमांचसहित । विनयादरें त्यास वंदित । साष्टांग नमस्कार घालूनी ॥४५॥त्यास उठवून गणाधीश सांगत । तूं माझा उत्तम भक्त । महाभागा वर मग त्वरित । मनोवांच्छित या वेळीं ॥४६॥तूं रचिलेलें स्तोत्र उत्तम । तें वाचिता पुरतील काम । धनधान्यप्रद शोकविनाशन । पुत्रपौत्रादी लाभपर ॥४७॥धर्म अर्थ काम मोक्षकर । ब्रह्मदायक दृढ भक्तिकर । हा माझा तुजसी वर । ऐसें बोले विघेन्श ॥४८॥तयासी म्हणे मनुसत्तम । भक्तिभावें हात जोडून । तुमची भक्ति दृढ राहून । सृष्टिरचना सामर्थ्य द्यावें ॥४९॥उत्तम धर्माचें पालन । व्हावें प्रजेचें संरक्षण । मनूच्या सर्व इच्छा सफल करुन । निजलोकी गणेश गेले ॥५०॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते स्वायंभुववरप्रदानं नाम पंचमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP