मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड २| अध्याय १२ खंड २ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ५८ अध्याय ५९ अध्याय ६० अध्याय ६१ अध्याय ६२ अध्याय ६३ अध्याय ६४ अध्याय ६५ अध्याय ६६ अध्याय ६७ अध्याय ६८ अध्याय ६९ अध्याय ७० अध्याय ७१ अध्याय ७२ अध्याय ७३ अध्याय ७४ खंड २ - अध्याय १२ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत सूर्यमण्डलवर्णनम् Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः । मुद्गल म्हणती प्रसंगोपात्त । सर्व लोकांचे वर्णन करित । स्वर्गांचेंही संक्षेपांत । वर्णन दक्षा तुज सांगेन ॥१॥भूलोक भुवर्लोक । स्वर्लोक महाजन लोक । तपोलोक सत्यलोक । सप्तलोक हे अंडोद्भव ॥२॥अर्यमा चन्द्रमा जोवर । स्वकिरणें प्रकाशवितो भूभाग समग्र । तोपर्यंत भूलोक ख्यात नश्वर । पुराणांत प्रजापते ॥३॥लोकां पायीं चालण्या गम्य । भूलोक शास्त्र संमत सुरम्य । दक्षा सप्तद्वीपात्मक काम्य । त्यावरती भुवर्लोक ॥४॥भूलोकापासून सूर्यापर्यत । भुवर्लोक प्रकीर्तीत । त्या भुवर्लोकापासून धरुवापर्यत । स्वर्लोक पंडित वर्णिती ॥५॥तेथ वायूच्या आठ नेमि ख्यात । आवह प्रवह अन्नवह असत । संवह विवह परावह त्या अतीत । परिवह तैसा वह नेमी ॥६॥भूमीपासून लक्ष योजनें दूर । भानूचे दूर । भानूचे मंडळ तेजोग्र । त्यापासून लक्ष योजनें सुदूर । चंद्रमंडळ उपस्थित ॥७॥त्यापासून लक्ष योजनें दूर । नक्षत्रमंडळ अपार । दोन लक्ष योजनांतर । त्यापासून ग्रहमंडळ ॥८॥त्यापासून लक्षयोजनें अतीत । ऋषि मंडळ प्रकाशत । त्यापासून वरती लक्षयोजन स्थित । धरुव जो केंद्र ज्योतिचक्राचें ॥९॥वायु किरणधर तो फिरवित । ज्योतिर्गण विश्वांत । दशयोजन सहस्त्र विस्तारात । भास्कर मंडळ अजस्त्र ॥१०॥तैसें बारा सहस्त्र योजन । चंद्राचें मंडळ महान । सूर्याच्या खालीं दशसहस्त्र योजन । राहू संस्थित विश्वांत ॥११॥तेरा हजार योजनें त्याचें मंडळ । तमोमय तमःस्थान सबल । गतीनें पर्वी धावे खल । सूर्यचन्द्रा झाकी छायेनें ॥१२॥तेच ग्रहण दक्षा म्हणती । शास्त्रवादी ते जगतीं । रविचंद्राचें अखिल मंडळ त्वरिती । व्यापितो राहू अंधकारें ॥१३॥चंद्रमंडळाचा सोळावा भाग । भार्गव म्हणजे शुक्रमंडळ योग । शुक्र मंडळाहोन पावभाव । न्यून बृहस्पति गुरुचें मंडळ ॥१४॥बृहस्पति मंडळाहून न्यून । पावभाव बुध सौम्य मंडळ मान । तारा नक्षत्ररुपें योजन हीन । चोपन्नशेंवर तीन दोन ॥१५॥सर्वांहून निकृष्ट असत । तारामंडळें जगतांत । योजनार्ध मात्र त्याहून नसत । न्यून कांहीं विश्वांत ॥१६॥त्याच्या वरती ग्रह तीन । सौर अंगिरा भौम असून । दूर संचारी मंदगतिमान । त्यांच्या खालती महाग्रह ॥१७॥सूर्य सोम बुध भार्गव । हे शीघ्र गती ग्रह अभिनव । सूर्य संचार करी देव । दोन अयनें वर्षांत ॥१८॥तो सव ग्रहांचा प्रभू असत । सर्वांच्या खालती संचार करित । ऐसे भूगोलज्ञ सांगत । त्याच्या वरी फिरतो चंद्र ॥१९॥चंद्राचें विस्तीर्ण मंडळ । त्याच्यावरी सर्व नक्षत्र मंडळ । नक्षत्रांहून उंच विमल । शुक्र अथवा कविग्रह ॥२०॥त्याच्या वरती बुध ग्रह असत । मंगळ त्याच्या अतीत दिसत । बृहस्पति त्याच्या वरी विलसत । शनि ग्रह त्या परता ॥२१॥शनी ग्रहाच्या वरती । सप्तर्षी मंडळाची स्थिति । त्या सात ऋषींच्या वरती । ध्रुव तारा विराजमान ॥२२॥नवयोजन सहस्त्र विस्तार । ऐशा रथांत भास्कर स्वार । ध्रुवाच्या आधारे अक्ष थोर । संस्थित झाला रथांत ॥२३॥द्वितीय अक्षांत ते चक्र संस्थित । मानसाचलीं द्वादशार कीर्तित । गायत्री मुख्यक सप्त छंदोमय असत । घोडे जुंपिले रथासी ॥२४॥दक्षिणायनीं संचार करित । सूर्य तेव्हां जलद जात । परी जेव्हां जाय उत्तरेप्रत । तेव्हा मंद गति त्याची ॥२५॥पूर्व दिशेला महेंद्राची महापुरी । दक्षिणेस धर्मराजाची नगरी । पश्चिम दिशेंत वरुन राज्य करी । उत्तरेस कुबेर ॥२६॥पूर्वेस ती अमरावती । दक्षिण दिशेला संयमनीची कीर्ति । पश्चिमेस सुखा नगरी जगती । उत्तरेस विभा नगरी असे ॥२७॥ज्योतिष चक्रीं स्वार होऊन । देव देव प्रजापति प्रकाशमान । महेन्द्राच्या नगरीत विराजमान । उदयकाळीं तो होत असे ॥२८॥यमपुरींत माध्यान्हय काळीं । वरुण नगरींत सायंकाळी । कुबेर नगरींत निशाकाळी । संचरतो भास्कर ॥२९॥उदयास्तसमयीं सर्वकाल समान । सर्व दिशांत विदिशांत पावन । कुंभाराच्या चक्रापरी भ्रमण । दिनेश्वर करी अविरत ॥३०॥भिन्न काळाचें प्रकाशन । रात्रिं दिवसांचे दर्शन । भुवनत्रय टाकी भरुन । आपुल्या किरणें दिवाकर ॥३१॥जळ स्थळ नभ जगांत । लोकांचे स्थान उत्तम असत । हे त्रिविध आदित्य मूल निश्चित । आदित्यापासून सर्व जग ॥३२॥देव असुर मनुष्यादि सर्वांसी । मध्यभागीं शेवटी आश्रयासी । तोच भास्कर अती विशेषी । आधार मूल सर्वांचा ॥३३॥ब्रह्मा विष्णु महेशांचे । इंद्र चंद्र तारकांचे । अग्नी नाग लता उदकांचे । जें तेज तें रविसंभव ॥३४॥द्युतिमतांची द्युति असत । सार्वलौकिक जें तेज प्रकाशत । आपुलेंच तेज विभागून जगांत । खेळतो दिवाकर त्या रुपीं ॥३५॥सर्वात्मा सर्व लोकेश । प्रभाकर हा गणेशाचा अंश । त्रिभुवनाचें मूळ विश्वेश । कर्मरुपी दैवत ॥३६॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते सूर्यमंडलवर्णन नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननर्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP