Dictionaries | References

सांड

   
Script: Devanagari

सांड     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : साँड़

सांड     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  जाका चेंचूंक ना अशें   Ex. चेंचूंक नाशिल्ल्या बैलाक सांड म्हणटात
MODIFIES NOUN:
जीव
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
चेंचूंक नाशिल्लें
Wordnet:
bdखासि खालामि
benঅণ্ডকোষযুক্ত
gujખૂંટિયો
hinअँडुआ
kanಎತ್ತು
malവന്ധീകരിക്കാത്ത
nepखसि नपारेको अँडुआ
oriମୁଷ୍କଯୁକ୍ତ
sanअण्डकोशयुक्त
tamவிரையடிக்காத
telవిత్తు కొట్టని
urdناآختہ
noun  जाका चेंचूंक ना असो बैल   Ex. सांडाची बळी दितात
ONTOLOGY:
स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
मांगर बैल
Wordnet:
gujઆંડુ
kanಎತ್ತು
panਅਣਖੱਸੀ
tamவிதையடிக்கப்படாத
telఆబోతు
urdآنڈوسانڈ

सांड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A big and burly man.
A female camel.
. 2 To reject or cast away. Ex. बाह्य कुटुंबा करी सांड.

सांड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A female camel. A flood-vent. A habit of dropping and losing.

सांड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वळू

सांड     

 स्त्री. १ उपेक्षा ; विस्मरण . ( क्रि० करणें ). सांड कर माझी दोन दिवस स्वस्थ निजल्यानें । - प्रला १६३ . २ सोडणें ; टाकणें ; त्याग ( विषयी - करणें ). पुत्राविषयी संसाराविषयी - कामाविषयी सांड केली . ३ हरविण्याची , गमविण्याची खोड . ( क्रि० . लागणें ). काय हो , तुमच्या भावाला रुपयांची सांड लागली . ४ नांव सोडणें ; वाटेल ते करण्याची मुभा देणें . ५ टाकलेली बायको . ६ - न . हरवलेली , सांडलेली वस्तु . ७ इष्ट , बाधा इ० साठी ओंवाळून टाकावयाचा पदार्थ . म्हणती लेकरें आली भिओन । सांडी ओंवाळून सांडणें । - ह १३ . १६० . - वि . रस्तांत पडलेली ; बेवारसी ( वस्तु ). [ सं . शद् ‍ - शन्न ? सं . छर्द ; प्रा . छडड ; हिं . छांड ]
 पु. १ देवाच्या , धर्माच्या नांवानें मोकळा सोडलेला बैल ; पोळ . २ वळू ; उत्पत्तीचा बैल . ३ ( ल . ) नुसता पोसलेला गलेलठठ माणूस ; उनाड , रिकामटेकडा मुलगा ( निंदार्थी ). घरोघरी दूध लुटी । झाला सांड तुझ्या पोटी । - अमॄत २३ . [ सं . षंड प्रा . संड ; हिं सांढ ]
 स्त्री. उंटीण ; उंटांतील मादी . [ दे . प्रा संढी ] सांडण , सांडणस्वार - सांडणी , सांडणीस्वार पहा . सांडणी - स्त्री . उंटीण ; सांड . सांडणी दररोज ३०।४० कोस चालतात . - मराठी ३ रे पु . आवृ . ४ . १२८ . [ हिं . सांठनी ]
 स्त्री. १ जास्त झालेलें पाणी काढून देण्याचा मार्ग ( बांध , भिंत इ० तून ). २ पाण्याचा दरवाजा ; उघडी ; सांडवा . ३ ( राजा . ) बांध फुटून पडणारी फट . [ सांडणें ] सांडवा , सांडोवा - पु . १ धरणाचे दार ; सांड . २ पाण्य़ाचा निकाल ; जास्त पाणी काढून देण्याची वाट . ३ कालवा ; पाट . ४ धरणाची वाट ( यावरून पावसाळ्यांत पाणी वाहते ); नदीवरला पायरस्ता .[ दे . प्रा . संदेह = पाण्यांतील पाय ठेवण्यासाठी असलेला दगड ] सांडावा - पु . सांडवा पहा .
 स्त्री. कोपरा ; सांध . सागरुही सांडी पडे । - ज्ञा १४ . २३५ .. सांडी पडणे पहा . [ सं . संधि ; म . सांध ]
०जाणें   शेंतांतील पाणी जाण्यासाठी ठेवलेल्या सांडीची खिंड वाहून जाणें . - कृषि २०९ .
०बातमी  स्त्री. सांडणीस्वाराने आणलेली बातमी . सांडणी बातमी आली । - ऐपो २३४ .
०स्वार  पु. सांडणीस्वार बसून डांक , बातमी इ० पोचविण्याचें काम करणारा शिपाई . घोडयापेक्षां उंट , उंटापेक्षां उंटीण फार जलद चालते म्हणून पूर्वी टपालाचें जासूदाचें काम असे स्वार करीत . सांडरूं - न . ( तिरस्कारार्थी ) सांड ; उंटीण .
०देणें   करणें - १ ( अमक्यास - ला ) जाऊं देणें ; जाण्य़ास परवानगी देणें . मग टाकी सांड देऊनि त्यासी । पाठवी मजपासी सत्वर । - भावि ५६ . ७७ . २ दुर्लक्ष , कानाडोळा करणें ( दोषाकडे ). ३ टाकून देणें ; फेकणें . बाह्य कुटुंबा करी सांड । - सामाशब्द .
०उपड   उघड - स्त्री . ( ना . ) सांडलवंड ; नासधूस .
०खत   , चिठठी , पत्र - नस्त्री . सोडचिठठी ( बायकोस , गुलामास , घरादारास इ० ). सोडचिठठी पहा . घर - वि . घर सोडून जाणारी , नवरा सोडणारी ( स्त्री . ) सांडवर पहा .
०पाणी  न. धुणें , भांडी घासणें इ० केल्यामुळे सांडलेलें पाणी ; मोरीचें पाणी . सांडपाण्याचा निकाल होण्यासाठी गटारे व मोर्‍या बांधतात . - आरोशा १ . १ . १ .
०भोळा वि.  विसरभोळा पहा .
०रांड  स्त्री. नवरानें टाकलेली बाई ; सांडरूं . लवंड , सांडासांड - स्त्री . सांडणें , पालथे करणें , नासणें याअर्थी व्यापक शब्द ; नासधूस ; उधळमाधळ .
०वर वि.  नवरा टाललेली ; घर सोडून गेलेली ( स्त्री . ) सांडवर कोणी न धरिती टाकलेली हाती । प्रारब्धाची गति भोगू आतां । - तुगा ३१७ . [ वर = नवरा ]
०सूट  स्त्री. कोणाकडून यावयाचा पैसा , माल इ० त दिलेली सूट . सांडण , सांडणी , सांडणें - नस्त्री . १ ओंवाळून टाकलेला जिन्नस ; बळी ( दृष्ट , भूतबाधा काढण्यासाठी ). ( क्रि० टाकणें ). साक्षात पिशाच येऊन । घेऊनि गेलें जैसे सांडण । - भावि ९ . १०० . अगणित तिज हाती सांडणी टाकविती । - सारुह २ . ८७ . - ज्ञा ८ . २६० . २ भूतबाधा ; दृष्ट काढणें ; ओंवाळणी . ३ कुरवंडी ; ओंवाळून टाकणें ; तुच्छ , क : पदार्थ असणें . अष्टभोग मूर्तिमंत । सांडणें करित तुजवरून नित्य । - मुआदि १६ . ३१ . सांडणी - स्त्री . १ सांडण्याची क्रिया ; त्याग . तेवी अविद्या सांडणी । - एभा १२ . २२५ . २ उपेक्षा . केली प्रपंचाची सांडणी । - एभा १० . २५१ . ३ बिरणें ; लय . सांडणीस टाकणें , सांडणीस घालणें , सांडणीस पाडणें - मनांतून घालविणें ; विसरणें . सांडणीस पडणें - विसरलें जाणें . सांडणें - उक्रि . १ बाहेर पडणें , पाडणें ; लवंडणें ; उपडे होणें . २ हरवणें ; गहाळ करणें ; होणें . भक्ति पांघरूण तें माझें सांडलें । - नवनीत पृ १५३ . ३ सोडणें ; टाकणें ; त्याग करणें . - ज्ञा ४ . १२९ . भीम म्हणें सांडिता मूढा । शिखा उपटीन । - मुसभा ९ . ९० . सांडरा - वि . १ उधळ्या ; उडव्या . २ हरव्या ; नेहमी सांडणारा . ३ ( ल . ) निष्काळजी ; विसरभोळा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP