Dictionaries | References स सांडरू Script: Devanagari Meaning Related Words सांडरू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. नवर्याने टाकलेली ; घरदार सोडलेली ( स्त्री . शिवीप्रमाणें उपयोग ). सांडवणें - अक्रि . १ क्षीण , जर्जर होणें ; खंगणें . सांडवला भला माणूस याची कोणी कुमक करिनात . - भाव ८३ . २ मुकणें ; आंचवणें . सग्रीव स्त्रीराज्यें सांडवला । बंधूच्या रोषें मज शरण रिघाला । - स्नानु १२ . ३११ . सांडाव , सांडावा - पु . सांडणी ; सांडण्याची क्रिया ; सांड पहा . असे सांडाव देत आले अटक उतरून नऊ कोशांवर । - ऐपो १२१ . सांडी - स्त्री . त्याग ; अव्हेर . समर्था मनी सांडि माझी नसावी । - राक ( करुणाष्टक ); - तुगा ५७३ . सांडी , पडणें , धरणें - हार खाणें ; मागें राहणें . पदोपदी त्वां धरिजेत सांडी । - सारुह ७ . ११९ . सांडी मांडी - स्त्री . १ घेण्या - टाकण्याचा व्यापार . मग हें सांडीमांडी नलगे तुज । २ यातायात त्रास ; धरसोड . सांडिमांडी मागें केल्या भरोवरी । अधिकचि परी दुःखचिया । - तुगा ३०८ . सांडीविखुरी - क्रिवि . सांडण्यालवंडण्यांत ; इकडेतिकडे . मुडाहुनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमी पेरिलें । तरि तें सांडीविखुरी गेलें । म्हणों ये काजी । - ज्ञा ९ . ३९ . सांडोर - वि . ( जुन्नरी ) पोरं न पाजणारी ( मेंढी ). सांडोवा - पु . कुरवंडी ; सांडणें ; उतारा . यालागी शरीर सांडोवा कीजे । सकळ गुणांचें लोण उतरिजे । - ज्ञा ९ . ३८१ . सांडोसांड - क्रिवि . कांठोकांठ ; भरून वाहिल अशा रितीनें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP