|
स्त्री. ( व .) सापाची कात .' साप कोस टाकतो .' ( सं . कोश ) पु. अंतर दाखविनारें रस्ता मोजणीचें माप ; साधारणत ; दोन मैल . इंग्रजी ४५५८ . यार्ड . एक चतुर्थीश योजन . ( यांचें निरनिराल्या ठिकाणीं गजाच्या लांबीप्रमाणें अंतर निरनिराळें असतें .) साधारणपणें चार हजार हातांचा कोस धरतात . ( सं . क्रोध ; प्रा . कोस ) पु. चतुष्कोण , त्रिकोण , इ० विवक्षित आकार तंतोतंत नसुन त्यांत वांकडेपणा आल्यमुळें होणारा न्युनाधिक भाव ; कोच ( ताणलेलेंक कापड , हातरुमाल , शेत , भिंत , रस्ता , कुंपण इ० . ना येणारा ) आधिक्य , वाढ . ( क्रि० येणें , असणें , होणें , जाणें , निघणें , काढणें , जिरणें , जिरवणें ). ' या जागेला फार कोस आहे .' ( का . कोशे = वांकण , वळण ) स्त्री. कूस ; फायद्याची मर्यादा . ' कोणत्या कापडीत किती कोस आहे हें पाहून तसलें कापड येथें तयार करण्याची धडपड .' - जप्रशि १०२ .
|