|
पुन . १ वस्तीचें ठिकाण ; ग्राम ; मौजा ; खेडें . २ ( व्यापक ) नगर ; शहर . ३ गांवांतील वस्ती ; समाज . यंदा दंग्यामुळें कितीक गांव पळून गेले . ४ आश्रय . ५ ( दोन गांवांमधील अंतरावरून ) चार कोस ; योजन ; चार ते नऊ मैल अंतर . मारीचातें प्रभु शत गावें पुंखसमीरें उडवी - मोरा १ . १९९ . हा शब्द कोंकण आणि देशांत पुल्लिंगी व सामान्यपणें नपुसकलिंगी योजतात . समासांत - गांव - कुलकर्णी - चांभार - न्हावी - भट इ० याप्रमाणें बारा बलुत्यांच्या नांवापूर्वीं गांव हा शब्द लागून सामासिक शब्द होतात व त्या शब्दावरून त्या त्या बलुतेदाराच्या एक वर्षाच्या कामगिरीवरील हक्काचा बोध होतो . [ सं . ग्राम ; प्रा . गाम ; हिं . गु . गाम ; सिं . गांउ ; फ्रेंजि . गांव पोर्तुजि . गाऊ ] ( वाप्र . ) ( त्या ) गांवचा नसणें - दुसर्यावर लोटणें ; टाळणें ( काम ); ( त्या ) कामाशीं आपला कांहीं अर्थाअर्थी संबंध नाहीं असें दर्शविणें . ०मारणें लुटणें ; खंडणी बसविणें . दौड करून गांव मारूं लागले - पया १८८ . गांवानांवाची हरकी देणें , गांवानांवाची हरकी सांगणें - ( तूं कोठून आलास , तुझें नांव काय आहे सांग इ० ) ज्याच्या अंगांत भूतसंचार झाला आहे अशा मनुष्यास ( भुतास , किंवा झाडास ) विचारतात . यावरून पाहुण्यास आपण कोठून आलांत इ० नम्रपणें विचारणें . गांवाला जाणें - १ जवळ नसणें . २ ( ल . ) निरुपयोगी असणें . जसें - माझे हात कांहीं गांवाला गेले नाहींत ( जवळच आहेत , वेळ आली तर तुला रट्टा मारतील ). गांवीं नसणें - पूर्ण अभाव असणें ; अज्ञानी असणें ; दरकार नसणें ; खिजगणतींत नसणें . सामाशब्द - ०आकार आकारणी - पुस्त्री . गांवचा हिशेब ; हिशेबाचा तक्ता . ०आखरी क्रिवि . ( व . ) गांवालगत - शेवटीं - लागून . गांवई - स्त्री . सरकारी जुलुमामुळें आपलें गांव सोडून दुसर्या गांवी केलेली वस्ती ; सरकारी हुकुमाची अमान्यता ; सरकारी अटींना प्रतिरोध ( सार्यांत सूट , तहकुबी इ० मिळविण्यासाठीं गांवचे सर्व लोक हा उपाय अंमलांत आणतात ). ०कंटक वि. गांवाची पीडा ; गांवाला त्रास देणारा . [ सं . ग्राम + कंटक ] ०कबुलात स्त्री. १ ( कों . ) वहिवाटदार खोतानें गांवांतील जमीनीचा सारा भरण्याबाबत दिलेली कबुली . २ गांवांतील गावकर्यांनीं वहीत किंवा पडित जमीन कोणती ठेवावी याबद्दल केलेला निश्चय , ठराव . ०कर पु. १ गांवांतील वृत्तिवंत . - कोंकणी इतिहाससाहित्य लेख ४०० . २ ( राजा . ) गांवच्या शूद्रांतील देवस्कीच्या मानपानासंबंधांतील एक अधिकारी . ३ भूतबाधा नाहींशी करणारा , देवस्की करणारा माणूस ; धाडी . - झां , ऊ १०२ . ४ गांवचे लोक ; रहिवासी ; गांवांत घरदार शेतभात असणारा . गांवकर म्हणती हो पेटली आग । - दावि ३५० . ५ ( कु . कों . ) पाटील ; खोत ; पुढारी . ६ ( रत्नागिरी ) कुणबीवाडयाचा व्यवस्थापक ; कुणबी . ०करी पु. १ एखाद्या गांवांत ज्याचें घरदार आहे तो त्या गांवचा रहिवासी ; गांवांत राहणारा . त्या गांवचे सर्व गांवकरी आज देवळाजवळ मिळाले होते . २ शेतकरी . गांवकी - स्त्री . १ गांवाच्या संबंधीचा हरयेक अधिकार ( अंमल इ० ); गांवचा कारभार . २ गांवसभा ; तींत झालेले ठराव . ३ गांवचा विचार ; गांवकरी व पुढारी यानीं एकत्र जमून केलेला विचारविनिमय . ४ वतनदारांचा गांवासंबंधाचा परस्पर संबंध व त्यांचा समाईक अंतर्बाह्य व्यवहार . - गांगा १६७ . [ सं . ग्रामिक ] गांवकुटाळ - वि . गांवकुचाळ ; गांवांतील निंदक ; टवाळ ; लोकांची निंदा करणारा . ०कुठार वि. १ गांवांतील लोकांवर संकट आणणारा ( चहाडी , वाईट कर्म इ० करून ); गांवभेद्या ; कुर्हाडीचा दांडा . २ गांवांतील सामान्य लोक . दिल्लींतील वाणी , बकाल , बायका देखील गांवकुठार ( हे ) लश्करच्या लोकांस मारूं लागले . - भाब १६० . ०कुंप कुसूं कोस - नपु . १ गावाच्या भोंवतालचा तट . २ ( ल . ) वस्त्राचा ( रंगीत ) कांठ ( धोतरजोडा , शेला इ० चा रेशमी , कलाबतूचा ). ०कुळकर्णी पु. गावचा वतनदार पिढीजात हिशेबनीस ; याच्या उलट देशकुळकर्णी ( जिल्हा , प्रांत , यांचा कुळकरणी ). ०खर न. गांवाची सीमा , हद्द ; सीमाप्रदेश ; परिकर . [ गांव + आखर ] ०खर्च पु. ( जमीनमहसुली ) गांवचा ( धार्मिक समारंभ , करमणूक इ० चा ) खर्च ; पंडित , गोसावी , फकीर इ० स द्रव्य , शिधासामुग्री इ० देतात त्याचा खर्च . ०खातें न. १ ( पोलीस ; कुळकर्णी वगैरे गांवकामगार लोक . २ गावचा हिशेब . ०खिडकी स्त्री. गावकुसवाची दिंडी ; हिच्या उलट गांववेस ( दरवाजा ). ०खुरास क्रिवि . गांवाकडून - गणिक - पासून . गांवगन्ना चार रुपये करून द्यावे . गावगन्ना ताकीद करून सर्व लोक बोलावून आणा . ०गरॉ वि. ( गो . ) गावठी . ०गाडा पु. गांवांतील सर्व प्रकारचे ( तटे , प्रकरणें , बाबी इ० ) कामकाज ; गांवचा कारभार ; गांवकी . ( क्रि० हांकणें ; चालविणें ; संभाळणें ). ०गाय स्त्री. आळशी व गप्पिष्ट स्त्री ; नगरभवानी . ०गांवढें न. गांवें ; खेडीं ( व्यापक अर्थी ). ०गिरी वि. गांवांत उत्पन्न झालेलें , तयार केलेलें ; गांवराणी ; गांवठी ; याच्या उलट घाटी ; तरवटी ; बंदरी इ० . ०गुंड गुंडा - पु . १ गांवचा म्होरक्या . २ विद्वानांस आपल्या हुशारीनें ( वास्तविक विद्या नसतां ) कुंठित करणारा गांवढळ . ३ जादुगारांची मात्रा चालूं न देणारा पंचाक्षरी ; गारुडयास त्याच्याच विद्येनें जिंकणारा . जेवी गारुडीयाचें चेटक उदंड । क्षणें निवारीत गांवगुंड । - जै २४ . ९ . ४ गांवांत रिकाम्या उठाठेवी करणारा ; त्रासदायक माणूस ; मवाली ; सोकाजी ; फुकट फौजदार ; ढंगबाजव्यक्ति ; खेळया . ०गुंडकी स्त्री. १ गांवगुंडाचा कारभार ; गांवकी . २ ( ल . ) फसवेगिरी ; लबाडी . गुंडांचा खेळ - पु . पंचाक्षरी किंवा जादूगार यांच्याशीं गांवगुंडांचा चढाओढीचा सामना ; मुठीचा खेळ . ०गोहन पु. ( व . ) संबंध गांवांतील गाई एकत्र असलेला कळप . ०गौर स्त्री. सबंध गांवांत भटकणारी स्त्री ; गांवभवानी . पोरीबाळीसुध्दां हिणवून पुरेसें करतील कीं , या गांवगौरीला हें भिकेचें वाण कुणी वाहिलें म्हणुन ? - पुण्यप्रभाव ०घेणी स्त्री. दरवडा ; हल्ला . समुद्राचें पाणी सातवा दिसीं करील गांवघेणी । - भाए ६९ . ०चलण चलणी गांव चलनी - वि . गांवांत चालणारें ( नाणें ). ०चा पु. गांवचा वेसकर , महार , जागल्या . डोळा पु. गांवचा वेसकर , महार , जागल्या . ०चा पु. गांवांतील कोणी तरी ; कोणास ठाऊक नसलेला ; परका ; अनोळखी . लोक पु. गांवांतील कोणी तरी ; कोणास ठाऊक नसलेला ; परका ; अनोळखी . ०चावडी स्त्री. गांवांतील सरकारी कामकाजाची जागा ; चौकी . ०जाण्या वि. गांवदेवतेस वाहिलेलें ( मूल ). ०जेवण जेवणावळ भोजन - स्त्रीन . १ गांवांतील सर्व जातींना घातलेलें जेवण . २ गावांतील स्वजातीस दिलेली मेजवानी . म्ह० हें गांवजेवण नव्हे कीं घेतला थाळातांब्या चालला जेवायला ( महत्त्वाच्या गोष्टीची थट्टा करणारास उपरोधिकपणें म्हणतात ). ०जोशी पु. गांवांतील वृत्तिवंत जोसपण करणारा . ०झाडा पु. गावांतील ( शेत इ० ) जमीनींचा कुळकर्ण्यानें तयार केलेला वर्णनपर तक्ता ; कुळकर्णीदप्तर . ०झोंड पु. १ सर्व गांवापासून कर्ज काढून नागविणारा . २ गांवांतील खटयाळ , खाष्ट माणूस ; गांवास त्रास देणारा माणूस . ०ठण ठाण - न . स्त्री . गांवांतील वस्तीची जागा ( अस्तित्वांत असलेली किंवा उजाड झालेली ); आईपांढर . [ सं . ग्राम + स्थान = म . गांव + ठाण ] गांवठा - पु . १ गांवचा एक वतनदार . म्ह० गांवचा गावठा गांवीं बळी . २ खेडवळ ; गांवढळ गांवठी गांवठू - वि . १ गांवचें ; स्थानिक . गावगिरी अर्थ १ पहा . बाजारी तुपापेक्षां गांवठी तूप नामी . २ गांवढळ ; खेडवळ . ३ ( विशेषत : गांवठू ) रानटी ; खेडवळ ( माणूस , चालरीत ). गांवठी वकील - पु . देशी भाषेत वकिलीची परीक्षा दिलेला माणूस . इंग्रजी न जाणणारा किंवा वकिलीची मोठी परीक्षा न दिलेला साधा मुखत्यार वकील .
|