Dictionaries | References

चालणें

   
Script: Devanagari

चालणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
To move, go, get on, walk, march, travel. Ex. मी दिवसास पंधरा कोस चालतों. 2 To proceed or make progress; to be in process or under performance. Ex. त्या वकिलाचे हाता- मध्यें माझें काम यथायोग्य चालतें; कोश चालला, घर चाललें &c. 3 To flow, pass, have a course--days, life: to continue on; to pass through successive ages--an estate, a fashion. Ex. ही माझी वृत्ति पांचशें वर्षें चालली. 4 To have effect, influence, prevalence. Ex. त्या मनुष्याचें कोठेंही चालत नाहीं. 5 To have currency; to be received, suffered, permitted--a coin, a tale, a statement, a course of conduct. Ex. हें नाणें ही गोष्ट तुझी चेष्टा त्याची उनाडकी एथें चालणार नाहीं. 6 To demean or conduct one's self; to behave. Ex. गुरु जसें सांग- तात तसें चालावें. 7 To pass with; to serve, satisfy, content. Ex. ओलें कोरडें जसें मिळेल तसें मला चालेल. 8 To act, work, be in action--a machine &c. 9 To walk or move with a particular air, gait, pace. 10 To suit, serve, answer, do; to be adapted or adequate to a purpose. 11 The applications of this verb are manifold; but of farther particularity the tediousness might be thought to overbalance the advantage. Be it borne in mind that its general import is progression or motion; and its slighter diversifications of sense in popular phraseology will give no perplexity. चालता घेणें To let pass; to make shift with. 2 To proceed; to go on. चालून जाणें To fall upon; to attack.

चालणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Move, walk; proceed. Flow. Have effect. Have currency. Behave. Pass with. Work. Suit.
चालून जाणें   Fall upon; attack.
चालता घेणें   To let pass.

चालणें     

उ.क्रि.  १ गमन करणें ; जाणें ; मार्ग क्रमण करणें ; रस्ता क्रमणें ; जाण्यासाठीं पावलें टाकणें . मी दिवसास पंधरा कोस चालतों . २ पुढें जाणें ; प्रगति होणें ; चालू असणें ; सुरू असणें . त्या वकिलाचे हातामध्यें माझें काम यथायोग्य चालतें . कोश चालला . घर चाललें . ३ जाणें ; लोटणें ; गतींत असणें ; कंठिला जाणें ( दिवस , भरभराट , आयुष्य ); चालू राहणें ; वर्षानुवर्ष अस्तित्वांत असणें ( जिंदगी , रीतरिवाज ). ही माझी वृत्ति पांचशें वर्षे चालली . ४ अधिकार , वर्चस्व असणें ; प्राधान्य असणें ; पटणें ; यश येणें . त्या मनुष्याचें कोठेंही चालत नाहीं . ५ मान्य केलें जाणें ; पसंत पडणें ; उपयोगांत असणें ; चालू देणें ; बाजारांत , व्यवहारांत घेणें , स्वीकारणें ( नाणें , गोष्ट , वागणूक , हकीकत ). हें नाणें , ही गोष्ट , तुझी चेष्टा , त्याची उनाडकी एथें चालणार नाहीं . तूं दिलेला रुपाया आमच्या मुलखांत चालत नाही . - गुजा ३७ . ६ वागणें ; वर्तणें ; ऐकणें ( आज्ञा , हुकूम ). गुरू जसें सांगतील तसें चालावें . वैद्य सांगेल तसें चालावें . ७ कामास , उपयोगास पडणें ; पुरवणें ; समाधान करणें ; भागणें . ओलेंकोरडें जसें मिळेल तसें मला चालेल . चालला तर गाडा नाहीं तर वाडा . = उपयोगी असला तर सोय नाहीं तर अडचण . ८ चालू असणें ; सुरू असणें ( काम , यंत्र ). ९ विवक्षित , विशिष्ट गतीनें , ढबीनें , नेकीनें , गमन करणें , चालण्याची क्रिया करणें . १० योग्य होणें ; उपयोगी पडणें ; उतरणें ; जमणें ; हेतूला , उद्देशालां योग्य असणें . ११ लिहिण्यास धजणें ( लेखणी वगैरे ). १२ दरवळणें ; भरून जाणें ( सुवास वगैरेनीं ). १३ उपाय , युक्ति असणें . आलें देवाजीच्या मना । तेथें कोणाचें चालेना । ( या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ गमन किंवा गति असा आहे ). [ सं . चल = हलणें , चलन ; प्रा . चल्लइ ; फा . चरिदन ; झेंद चर ; फ्रेंजि . चलव ] ( वाप्र . ) चमकून चालणें - ऐटींत चालणें . चाले चुकावुनि पुढें चमकोनि घोषा । - आकं ३ . चालता घेणें - चालवून घेणें ; गुजारा करणें ; चालू होणें . चालून जाणें - हल्ला करणें ; चढाई करणें ; स्वारी करणें . हिंदुस्थान सरकाराचें लष्करी धोरण जरी रशिया संबंधानें बचावाचें असलें तथापि एकंदरीनें चालून जाण्याचेंच आहे . - टि २ . ३५७ . चालून देणें , चालों न देणें - न . ऐकणें . चालों न देचि मत , करि मन तैशाचेंहि वश्य पाप तिचें - मोमंभा ३ . ५२ .

चालणें     

चमकून चालणें
भीत भीत पाऊल टाकणें
हळूहळू सावधपणें पावले टाकीत जाणें. ‘चाले चुकावुनि पुढे चमकोनि घोषा।’ -आकं ३.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP