Dictionaries | References

तडक

   
Script: Devanagari

तडक     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : सरळ

तडक     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Smartly, sharply, briskly, crackingly, swimmingly. Ex. हें काम त0 चाललें. 2 Readily, freely, unobstructedly. Ex. अकबरी मोहोर सर्वत्र त0 चालती. 3 Completely, full, good. Ex. तो गांव एथून त0 वीस कोस आहे. 4 Straight, right, directly. Ex. हा मार्ग त0 पुण्यास जातो. 5 Copiously, lavishly, exuberantly. It is used freely in enhancement of words expressing animated and unobstructed action or boundless profusion.
v मार. Ex. तेथून जी त0 मारिली तों एथें उभा राहिलों.

तडक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
ad   Smartly. Readily. Straight.

तडक     

क्रि.वि.  एकदम , झपाटयाने , तडाख्याने , थेट न थांबता , नीट .

तडक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : थेट

तडक     

 पु. १ मोठा आवाज . - शर . २ विजेचा कडकडाट ; वीज . तडके बुजाली खेचरे । - मुविराट ६ . १६ . [ ध्व . तड ]
 स्त्री. एकसारखा नेटाचा , आवेशाचा , जोराचा प्रयत्न ( विशेषतः पळण्यातील ); नेट ; जोर . ( क्रि० मारणे ). तेथून जी तडक मारली तो येथे उभा राहिलो . - क्रिवि . १ जोराने ; तडाख्याने ; नेटाने ; एकदम ; झपाट्याने ; धडकून . गर्जत मेघ गडगडीती । अवचीते तडक पडती । - उषा १५४ . १७४९ . असंख्यात तडागोदरे । फुटती एकसरे । - मुविराट ६ . ११३ . २ अप्रतिहतपणे ; सुरळित ; कांही अडथळा न होतां ; बिनहरकत . अकबरी मोहोर सर्वत्र तडक चालते . ३ पुरेपूर ; पूर्णपणे ; पुरतेपणी ; तब्बल तो गांव येथून तडक वीस कोस आहे . ४ थेट ; नीट ; कोठेहि न थांबतां ; सरळ मार्गाने . भ्याली सकळेहि बळे तडक पळाली न राहिली पळ ती । - मोभीष्म ९ . ४१ . ५ भरपूरपणे ; विपुलतेने ; रेलचेलीने ( एखाद्या क्रियेचा अतिरेक , उद्रेक , जोर दर्शविण्यासाठी या शब्दाची योजना करतात ). [ ध्व . ] सामाशब्द -
०फडक वि.  १ चपळाईचे ; तांतडीने केलेले ; उत्साहपूर्ण ( काम , उपाय ); उत्साही ; चलाख ; निश्चयी ( मनुष्य ); खरमरीत ; खरपूस ; कडक ; स्पष्ट ( भाषण ).
०सार वि.  चपळ ; उत्साही ; चलाख आणि तरतरीत अशी लहान स्त्री ; मुलगी [ तडक + सावित्री ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP