Dictionaries | References

तारे

   
Script: Devanagari

तारे     

 न. वादळाचा , सोसाट्याचा वारा ; जवळवारा . हा वारा गलबतास वाईट असतो . [ तार ] - वारे - न . १ ( राजा . ) गलबताला अनुकूल किंवा प्रतिकूल असा वारा , वार्‍याची स्थिति . गलबत उद्यां येईल की परवा येईल हे न कळे ; तारेवारे ह्याच्या स्वाधीन आहे . २ लहरीपणा ; चाळेखोरपणा ; नखरा ; मिजासखोरी . तारेवारे दोन दिवसाचे . चंचलपणाची लहर ; जसेः - रोजगाराचे - व्यापाराचे - चाकरीचे - तारेवारे . ( क्रि० येणे ; चढणे ). ३ मोठे अवसान , आवेश ; उन्माद . कोंकणात सांपड जेव्हा घालतात तेव्हा कामकर्‍यांस दारु पिऊन भले भले ओरडून तारेवारे चढले म्हणजे काम तडक चालते . [ तार = उन्माद + वारा ]
 न. १ हुषार ; चलाख , धूर्त , मनुष्य , मूल इ० . तारा अर्थ ६ पहा . २ ( उप . विरु ) वेडगळ , अर्धवट मनुष्य , मुलगा . ३ वेड ; वेडेपण ; पिसे ; म्हातारपणामुळे बुद्धीस होणारा चळ . [ तारा ] म्ह ० आधीच तारे आणि त्यांत शिरले वारे = आधीच वेडगळ आणि त्यात भूतबाधा झाल्यास त्या वेड्या माणसाच्या चेष्टा किती वर्णाव्या . तुल० आधीच मर्कट तशांतहि मद्य प्याला . आधीच उल्हास त्यांत आला फाल्गुनमास .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP