Dictionaries | References

म्हातारा

   
Script: Devanagari

म्हातारा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
We ought always to have some senior with us as our counselor.

म्हातारा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Old, aged; the old fellow.

म्हातारा     

वि.  जरठ , बुढ्ढा , वयस्क , वयातीत , वयोवृद्ध , वृद्ध .

म्हातारा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वृद्ध, वृद्ध

म्हातारा     

वि.  
वृद्ध ; वयोवृद्ध ; वयस्क . म्हातार्‍यानें केलें नांव .
पुनर्वसु नक्षत्राबद्दल शेतकरी लोक म्हणतात . तसेंच पुष्य नक्षत्राला तरणा अशी संज्ञा देतात .
एक प्रकारचें गवत . - बदलापूर १६१ . [ सं . महत्तर ] म्हातार्‍यास पिपांत ठेविलें पाहिजे किवा पेटींत अगर कंठाळीत घालून नेलें पाहिजे - आपणाला सल्ला देण्यासाठीं आपणाबरोबर नेहमी वयोवृद्ध माणसें असावयास पाहिजेत . म्हातारपणीं ढोवळा मणी - ( व . ) म्हातारपणीं कशाला शृंगार हवा . म्हातार्‍याबगर काणी जायना - ( गो . ) म्हातारा मनुष्य असल्याशिवाय कहाणीसारख्या ठराविक गोष्टी पार पडत नाहींत . म्हातार्‍याच्या बायकोस तांबटाच्या रोट्या - म्हातारील धड खाण्यास अन्न व नेसण्यास वस्त्र मिळत नाहीं . तिला उरलेंसुरेंलच खावें लागतें . म्हातार्‍या माणसाचें लोणचें घालून ठेवावें - सदुपदेश पाहिजे असेल तर म्हातार्‍या माणसाचा सल्ला घ्यावा . म्हातारखंड - न . म्हातारा शब्दाचें तुच्छतेचें रुप ; निंदेनें म्हातार्‍यास म्हणतात . म्हातारचळ - पु . म्हातारपणीं बुद्धीस होणारी विकृति ; म्हातारपणीं होणारा बुद्धिभ्रंश ; साठी बुद्धि नाठी ; पिसें ; चाळे ; तारे ; म्हातारपणीं बुद्धि बावचळणें . म्हातारडा , म्हातारडुक - वि . थेरडा ; मूर्ख म्हातारा अशा अर्थी ; तुच्छतादर्शक म्हातारा या अर्थी ( स्त्री , पुरुष या दोहोंबद्दल उपयोग ); म्हातारखंड . म्हाताराकोतारा - वि . म्हातारा ( द्विरुक्तीनें ); वृद्ध आणि वयस्क ; म्हातारा आणि अशाचसारखा . म्हातारी - स्त्री .
वृद्ध स्त्री ; वृद्ध आई ; जरठ स्त्री .
बोडकी ; केस भादरलेली विधवा स्त्री ( तरुण किंवा म्हातारी कशीहि असो इजबद्दल उपहासार्थी योजावयाचा शब्द )
कापसाचा हलका पुंजा किंवा हलकें पीस ( हवेंत उडणारें ) याजबद्दल योजावयाचा शब्द . रुईच्या फळांतील तंतुसमुदाय . ( वाप्र . ) मुलें खेळतांना म्हातार्‍या उडवितात . - मराठी ६ वें पुस्तक पु . २४३ . म्हातारी मेलीसें होणें - ( ल . ) अतिशय दुःख होणें . म्हातारीनें कोंबडें झांकून ठेवलें म्हणून उजेडावयाचें रहात नाहीं - कोंबडा उजेडण्याचे अगोदर आरवतो . यावरुन कोंबड्याच्या आरवण्याचा आणि उजेडण्याचा कांहीं कार्यकारणभाव आहे असें मात्र नाहीं . उजाडूं नये म्हणून म्हातारीनें कोंबडें झांकून ठेविलें तरी उजाडावयाचें तें उजाडतेंच . सृष्टिक्रमाप्रमाणेंग गोष्टी होऊं नयेत म्हणून कितीहि प्रयत्न केला तरी त्या गोष्टी थांबावयाच्या नाहींत .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP