१७२
राजाज्ञा, हें प्रधानपद शिवाजीच्या वेळीं नव्हतें. मागाहून संभाजीच्या वेळीं
निर्माण झालें असावे. शब्दार्थानें राजाच्या हुकुमाची नोंद ठेवणारा अधिकारी,
फारसी पर्याय हुकमत पन्हा. उद्धव यागदेव राजाज्ञा शाहू बरोबर बादशाही केदेंत
होता. तो येसूबाईवरोबर दिल्लीस गेला म्हणून त्याचा पुत्र रंगराव उद्धव यास
शाहनें राजाज्ञा नेमिलें. पुढे या पदावर अनेक व्यक्ति आल्या.
(२) इसं. अंक७-९फेब्रुवारी-एप्रिल
(१) त्रै. व . ६ ले. ८पृ ७७ व पृ. ८२
१९१६ पं. द. ३३६-३३७ :
(३) भा. व पु .२ (४) म. मं. व. राजाज्ञा पहा.
नारोराम राजाज्ञा ता. २७ ऑगस्ट १७१२
चिमणाजी दामोदर राजाज्ञा स. १७१६-१७ पासून १७२७पर्यंत. पुढे हा
ता०३० जुलई १७२६ ( शा. रो. २८) रोजीं दूर झाला. पंताजी शिवदेव सोमण
राजाज्ञा ६ ऑक्टोबर १७२७.
पासून शंकराजी नारायण सचिवाचा सहायक होता. हा स. १७२०त राजाज्ञा
असल्याची उल्लेख आढळतो. (सोमण घ०इ०) याचा मृत्यु ता. २६ नोव्हेंबर १७३०
चा आहे. मोरो जिवाजीनें उदाजी चव्हाणाचें पारिपत्य केलें म्हणून शाहूनें
त्याला राजाज्ञा पद दिलें. ते त्या घराण्यांत कायम चाललें. त्याचा वंश निराळ्या
ठिकाणीं दिला आहे.
हा पंताजी शिवदेव कों. ब्रा. गोत्र शांडिल्य सन १६९४