४
हिंदुमुस्लीम वंश, त्याच धरतीचा दोहींकडे संधान ठेवणारा पेठचा लक्षधीर दलपतराय,
बेगम समरू, ज्योतिषी भास्कराचार्य, आधुनिक युगांतील बाळशास्त्री जांभेकर, कवि
मोरोपंत, घर्म सिंधुकार काशीनाथ पाध्ये, अरणी वा जागीरदार वेदो भास्कर अशा
भिन्न व्यवसायी व्यक्तींचा संग्रह मी या नामभावळींत मुहाम केला आहे, तेणेंकरून
मराठेशाहीच्या त्या अल्पकालांत देखील राष्ट्राचे पूर्वज सर्वागीण प्रगतींत कसे खपत
होते हैं साकल्यानें अजमावतां येईल. संतकवि वगैरे कित्येक घेतलेही नाहींत.
कांहीं समग्र राष्ट्राचा ज्ञानकोश नव्हे, हेंही विसरून चालणार नाहीं. विविधता
साधतांना माझें लक्ष मुख्यतः दोनशें वर्षांच्या मराठी इतिहासांत केंद्रित आहे हें वाचकांनी
मनांत बाळगावें. अनेक थोर वंश नजरेंतुन सूटलेही असतील.
हा
मोठी अडचण उद्भवली ती प्रत्येक घराण्याच्या विशिष्ट नांवाची घोरपडे,
निबाळकर, भोसले अशा पुष्कळ कुटुंबांत अनेक व्यक्ती नामांकित बनल्या. कित्येकांची
उपनांवें प्रसिद्ध तर कित्येकांच्या व्यक्तीच प्रचारांत प्रमुख. संताजी घोरपड़े किया
धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ भट पेशवा किवा त्याचा पूत्र बाजीराव यांचा
निर्देश, पेशवे, भट किंवा व्यक्ति यांपैकीं कोणत्या प्रकारानें थोडक्यांत करावा, भोरच्या
सचिवांचा सूचीत समावेश करितांना पंत, भोर, सचिव म्हणून करावा कीं शंकराजी
नारायण या प्रमुख नांवानें करावा. देशमुख, देशपांडे, जोशी, चिटणीस यांचे इतके
भेद इतिहासांत आढळतात कीं हवें असलेलें नांव वाचकांस चटकन सांपडण्याची सोय
कशी करावी ही मोठी अडचण लक्षांत आली.
णार तर प्रत्येक वाचक हवा असलेला संदर्भ भलत्याच नावाखालीं हुडकणार ही अडचण
दूर करण्याचा उपाय एकच की सूचीत शक्य तितक्या भिन्न नांवाचा समावेश करून
अनेक नांवांखालीं मुख्य विषयाचा हवाला देत जावा. याकरितां वंशावळीची मांडणी
करतांना प्रथम आडनांवें, जिथें आडनांवें उपलब्ध नसतील तिथें व्यक्तींचीं नांवें
आणि नबाब व राज्यें यांच्या बाबतींत त्या त्या राज्यांची नांवें विचारांत घेऊन अनुक्रम
लाविला आहे.
मी आपल्या मालिकेंत एक नांव योज-
उत्तरेंतील राजपूत घराण्यांच्या वंशावळी व त्यांतील राजकत्याचे काल आपल्या
इतिहासास लागू पडणारे बहुतेक मी यांत दाखल केले आहेत. त्यांचा मुख्य आधार
The ruling Princes, ch'efs and Lending personages in Reip:tena and
Ajmer हैं स. १९२४ त हिंदुस्थान सरकारनें सुधारून प्रसिद्ध केलेलें पुस्तक
असून त्यांतहि मी मराठी कागदांतील तपशील आढळला तो दिला आहे. विजयनगर,
म्हैसर वगैरे दक्षिण हिंदमधील सत्ताधीशचे वंश Sow. 1) H' stor 'cnl Inseription8
in South Iad a (1932) यावर आधारले आहेत. तथापि संशोधन सारखें चालूच
असल्यामुळें हे आधारही आतां अपुरे पडतील. इतिहाससंग्रहाचे ग्रंथ ही एक भरपूर