५
माहितीची मोठी खाण आहे. तिच्या जोडीस राजवाडघांचें व भारत इतिहास सं.
मंडळाचें ग्रंथ अवश्य उपयोगी पडतात.
आणलेले सांपडतील.
भाझ्या रियासतींतही पुष्कळ तपशील एकशर
शिंदेशाहीत सारस्वतांनीं प्रचंड कामगिरी केलेली नजरेस येते. त्यांचीं अनेक
घराणीं उदयास आलीं पण त्यांचा भरपूर छडा लागलेला नाही. तो विषय स्वतंत्र-
तेनेंच होतकरू अभ्यासकांनी पूर्ण करण्याजोगा आहे. राजाध्यक्ष यांनीं जिवबा
बक्षीच्या चरित्रांत पृ. २८२ वर एक भली मोठी सारस्वत धुरीणांची यादी दिली आहे.
ती जमेस धरून त्यांतील ठळक वंश स्वतंत्रतेने बनविण्याजोगे आहेत. चां. का. प्र .
संबंधांचें हेंच काम श्री. य. रा. गुप्ते यांनीं केले असून प्रस्तुत कामांतही त्यांचा हातभार
मोठा आहे. सुमारे तीसएक वंशावळी त्यांनीं परिश्रमानें जमवृन चितळ्यांचें हवालीं
केल्या.
त्यांचा समावेश मी या संग्रहांत केला आहे. मात्र त्यांतला पुष्कळसा
विस्तार गाळावा लागला त्यास इलाज नाहीं. त्यांचेही मी जाहीर आभार मानतों.
अलीकडे शुलवृत्तान्तही पुष्कळसे प्रसिद्ध झाले असून अशांची संख्या आज पत्नासाचे
षरांत जाईल असें मला वाटतें. त्या सर्वांचा मला उपयोग करतां आला असें नाहीं.
पणे कारणपरत्वें त्यांचाही मी उपयोग करण्यास विसरलो नाहीं.
चितळे एकाएकी गेले ही या विषयाची मोठी हानि होय. हे प्रचंड काम त्यांचें
साह्यानें मला पुष्कळसे जास्त भरीव करतां आलें असतें यांत संशय नाहीं. विषयच
सर्वव्यापी असल्यामुळें तो अनेकांनीं हातभार लावल्याशिवाय निर्दोष होणार नाहीं.
एकंदरींत या पुस्तकानें मराठ्यांसंबंधीं जे अपग्रह प्रचलित आहेत ते दुरुस्त होण्यास
मदत होईल असें मला वाटतें. मराठयांची विशिष्ट संस्कृति कारय होती आणि त्यांचें
राज्य संपलें तरी चिरंतन संचय त्यांनीं भागें काय ठेथला हा विषय मोठा जिव्हाळयाचः
असून त्याचीं साधनें या पुस्तकाच्या द्वारा वाचकांस उपलब्ध होतील असें मी समजतो.
याचा थोडासा रूक्ष्म त्रिचार तरै व. २, अ. २, पृ. १४६ वर के. काशीनाथ कृष्ण लेले
यांनीं केलेला आहे तो वाचकांस उपयुक्त वाटेल त्याच धर्तीवर जास्त परिश्रम
ब्हावयास पाहिजेत.
इतकें सांगून मी है माझ्या ह्यातींतलें शेवटचें महत्त्वाचें काम वाचकांचें ह्वालीं
करतों.
गो. स. सरदेसाईं,