सर्व लिहून एक कच्चे टांचण तयार केलें. आम्ही दोघांनीं वारंवार एकत्र बसून
विचक्षणा केली आणि दोन वार वर्षांत सुमारें चारशें वंशावळी सिद्ध झाल्या.
अशी उमेदीची परिस्थिति जमून आली तरी प्रसिद्धीचा खर्च अंगावर घेण्यास
प्रकाशक कोणी मिळेना. तितक्यांत रा. चितळे ता. २३ डिसेंबर स. १९५३ रोजीं
एकाएकी कालवश झाल्यानें मी निराश बनलों अ। णि पुढील फेब्रुवारींत हैद्राबाद येथें
इं. हि. रे. कमिशन ची बैठक भरली तेथें मुंबईचे डायरेक्टर ऑफ् आक्काइव्हज डॉ. जोशी
भेटले. त्यांनीं एक सूचना करून मला एका संकटांतून ताबडतोब सोडविलें. मुंबई
Sti to Brd for H stor cal Records ard An ie t konrments
ने मलेले असून त्या बोर्डाने हघा ऐतिहासिक वंशावळी प्रसिद्ध करण्याचें मान्य
केले तर मुंबई सरकारांतून त्या प्रसिद्ध होऊ शकतील अशी डॉ. जोशी यांनीं सूचना
केली. त्या सूचनेनुसार मी ताबडतोब अर्ज केला आणि गेल्या मार्च महिन्यांत मुंबई
सरकारची मंजुरी पण हातीं आली. डॉ. जोशी व हें बोर्ड यांनीं या वंशावळी
सरकारांतून छापण्याचें मान्य करून ऐन अडचणींतून भाझी सुटका केली याबद्दल
मी मुंबई सरकारचा व या बोर्डाचा अत्यंत आभारी आहे. श्रम मी केले, छापणें
सरकारने स्वीकारलें असा योगायोग जमू न आला.
छापण्याची तजवीज झाली पण हस्तलिखित कोठें तयार आहे ?
असा कीं चितळ्यांजवळ सर्व कागद सिद्ध आहेत. त्यांचे घरीं तपास करतां कांहीं
कच्च्या वंशावळींचीं बाडें हातीं आलीं. आणून पाहतों तों सर्व काम अपूर्ण स्थितींत.
पुनः सर्व लिहून आणि एकूण एक पडताळे घेऊन पूर्ण करावें तरच तें छापण्यालायक
माझा समज
बनणार.
श्रम पंडणार पण त्याला इलाज काय ?
सरकारने छापण्याचें जोखीम
स्वीकारलें हें काय थोडें झालें असे समाधान मानून मी कामास लागलों.
गेल्या चारपांच महिन्यांत माझी प्रकृति विघडून एकदम शक्तिपात झाला . मुंबईस
डॉक्टरी इलाज करून परत आलों तेव्हां अलीकडे थोडी सुधारणा वाटत आहे. पुनः
श्रम करून सर्व वंशावळींची नवीन प्रत तयार केली ती आतां छापखान्यांत जात आहे.
डोळघांदेखत सर्व छापून वाचकांचें हातीं हें काम पडेल अशी उमेद वाटत आहे.
दरम्यान
काम करूं लागल्यावर अनेक अडचणी आल्या. पुष्कळशा वंशावळी मूळ पुरुषा-
पासून प्रस्तुत कालपर्यंत सर्व नामावळी दाखल केलेल्या असून त्या सर्वच स्वीकार-
ल्यास काम फार वाढेल. म्हणून एकदां मराठी राज्य संपल्यावर इतिहासाचा
धागा तुटला है लक्षांत घेऊन फक्त दोन अडीचशें वर्षांच्या कालखंडाला
लागू
पडेल
एवढाच वंशांश मी स्वीकारला. नाहींतर वाढत्या लोकसंख्येची दखल मला घ्यावी
लागली असती ती शक्य कोटींतील नव्हती. वंशावळींत तपशील भरपूर देण्याचा
विचार होता, प्रसिद्ध व अप्रसिद्ध अशा समस्त स्त्रीवर्गाचा निर्देश करण्याची माझी