इच्छा होती, पण असे तपशील फारसे उपलब्ध होईनात, नुसतीं नांवें तेवढीं समजच्यांत
फायदी काय, ज्यांची संतति नमूद आहे त्यांस बायका होत्या है सिद्ध आहे. तथापि
कांहीं ठळक व्यक्तीसंबंधानें मिळाले तेवढे स्त्रयांचेही तपशील मी मुद्दाम दाखल
केले आहेत. त्यांवरून पुरुषांच्या बरोवरीनेंच स्वराज्याचे कामांत स्त्रीवर्गानेंही
महत्त्वाची कामगिरी केली आहे हें कळून येईल आणि पुष्कळ नामांकित स्त्रियांचीं
बोधप्रद चरित्रें नवीन लिहितांही येतील. ज्या आधारांवरून वंशावळी बनल्या
ते बहुतेक मी आरंभी नमूद केले आहेत, त्यांवरून जास्त माहिती वाचकांस मिळूं शकेल.
जितके मिळाले तितके जन्ममृत्यूंचे कालही मीं दिले आहेत. जन्म फार थोडयांचे
गिळाले, तथापि मृत्यू समजल्यानें इतिहासाचें उद्दिष्ट बरेंचसे सिद्धीस जातें. मृत्यु-
काळाचा आधार मात्र ज्या त्या ठिकाणीं दर्शविण शक्य झालें नाहीं, शिवाय जितकें
खोलांत शिरावें तितका प्रमाद संभव वाढत जातो. तथापि प्रत्येक व्यक्तीची कर्तब-
गारी शक्य तितकी कळून यावी असे वर्णन मी ठिकठिकाणीं केलें असल्यानें सामान्य
वाचकांना नुसत्या या वंशावळी नजरेखालीं घातल्यानें एकंदर राष्ट्राचा मुख्य इतिहास
सहरजीं नजरेस आल्याशिवाय राहाणार नाहीं. किंबहुना चरितेरें, नाटक, पोवाडे,
संवाद अशा विविध साहित्याची नवीन रचना करणारांस या वंशावळीपासून स्फूरति
उत्पन्न होईल असें क्षेत्र यांत मिळूं शकेल. यास्तव माझ्या विनंतीस मान देऊन ज्यांनीं
माहिती पुरवली त्यांचे आभार मानावे तितके थोडे होतील. पाठविलेली सर्वच
माहिती मी स्वीकारूं शकलों नाहीं याची त्यांनीं मला क्षमा करावी. अनेकांनी
कळकळीने माहिती कळविली त्या सर्वांची नांवनिशी न देतां अंतःकरणपूर्वक मी
त्यांचे जाहीर आभार मानतो.
वंशावळी देतांना कित्येक घराण्यांचा व ततुशाखांचा विस्तार मोठा तर कित्येकांची
नांवनिशी एखादे दुसऱ्या व्यक्तीपुरतीच संपुष्टांत आलेली, असा प्रकार नजरेस आला.
बाजी प्रभू देशपांडे, नेताजी पालकर, जिवा महाला हे एकेकच पुरुष त्यांच्या कुले-
तिहासांत नमूद आहेत. उलटपक्षीं घोरपडे, निबाळकर, भोसले, पटवर्धन अशा कित्येक
घराण्यांचा विस्तार एवढा निदर्शनास येतों कीं त्यांच्या शाखांची बिनचूक नांवनिशी
कागदावर वठविणें पुष्कळसें अवघड पडतें. वंश एका पुरुषाचा असो की मोठा विस्तृत
असो, इतिहासास दोघेही सारखेच मोलवान हें लक्षांत घेऊन शक्य तितक्या व्यक्तींचा
समावेश मी येथें स्वीकारला आहे. त्यांत धर्माचा, जातीचा, व्यवसायाचा कोणताहि
भेद मी मनांत बाळगिला नाहीं. उत्तरदक्षिणेचे स्थानिक नवाब, मुसलमान बादशहांचे
व नवावांचे वंश, राजपुतान्यांतले अर्वाचीन राजवंश, देवगडचे गोंड राजे, राघवगडचे
खेची, सुरापुरचे बेरड, पंजाबचे शीख, जंजिरऱ्याचे सिद्दी, ज्यांचा म्हणून महाराष्ट्राच्या
इतिहासास उपयोग आहे असे विविध बंश मी मुद्दाम स्वीकारले आहेत. कवि
भास्करराय, राजव्यवहारकोशक्ता धुंडीराज लक्ष्मण व्यास, प्रतापराव गुजराच