२१
कंक, येसाजी, वेलवंडखोऱ्याचा प्रतिष्ठित देशमुख, नेताजी पालकरासारखाच
शिवाजीचा एकनिष्ठ सहाय्यक, पुढें संभाजीची सेवाही मनोभावानें करणारा.
[(१) म. इ. सा. खं. १५, ले. ३६५, पहा संभाजीचें सांत्वन पत्र
(२) शि. च. सा. २, ले. २९).]
येसाजी
कृष्णाजी
कृष्णजी
१ फोंडयाच्या स्वारींत जखमी (१६८५)
२ फोंड्याच्या लढाईत मू. स. १६८५.
३ संभाजी छत्रपतीनें लहान मुला दिलेलें नांव.
सूर्याजी कंक म्हणून एक नाव शिवाजीच्या कामांत येतें, त्याचा कौटुंबिक संबंध कळत नाहीं.
खटावकर, कृष्णरा, दे० ब्रा०, संस्कृत विद्येचा पंडित. औरंगजेबानें यास खटावची
जागीर देऊन आपल्या पक्षास वळविलें. तेथें तो कोट बांधून बचावाच्या बंदोबस्तानें
राहूं लागला. तो शाहूचा अंमल बसू देईना. त्यानें खटाव येथें दत्तमंदिर बांधलें. तें
पुढें अहल्याबाईनें विस्तृत केलें.
लौकिकांत चालतात. [(१) इ.सं. पे.द.स. मा. अंक ४-६ नोव्हेंबर १९१४-जाने
१९१५, पू. १३, ले. १८; (२) पे.द. ३३.१५२; (३) भा.व. पु.२, जु. ऐ. गो. ४.]
या खटावेकर घराण्यास राजे व महाराज हे किताब
मंबाजी उर्फ नारोपंत
राघवपंडित
कृष्णाजी
भगवंतराव
कृष्णराव
* (याचा वडील मुलगा ता. २ डिसें. १७११ रोजीं मारला गल्यावर हा शाहूस शरण
येऊन त्याचे पदरीं राहिला. तो पुढें १० जानेवारी स. १७३४ रोजीं रायगडचे लढाईत
मारला गेला. याच्या वंशाकडे वतन चालू आहे).
खत्री, आयामल्ल, जयपूर दिवाणांचं घराणें [ पे.द. २७.२४, ३०].
राजा आयामल्ल उ. राजामल्ल (प्रचारांत मलजी मू. ८ फेब्रु. १७४७)
केशवदास (विषप्रयोग १७५०)
हरखराय
गुरुसहाय.