१६०
हेबळीकर, आपाजी सुरो-रा० करकंब, माध्वसांप्रदायी ऋ०दे०ब्रा० गोत्र भारद्वाज,
राजाराम छत्रपतीचे अमदानींत प्रसिद्धीस आला. रामदुर्ग व नरगुंद येथील भावे
सत्ताधीशांच्या पदरीं राहिला. त्यास हेबळीची जागीर मिळाली. ( शि० च०
सा०५ पृ० ३१)
आपाजी सुरो (मू. १७३७)
बळवंतराव (दत्तक)
हेमाडपंत ऊ० हमाद्रिपंडित, उपनांव सोडवीकर, श्रीकरणाधिप, महादेव व रामदव
या देवगिरीकर यादवनृपांचा, य्जुरेदी ब्रा०, वत्सगोत्री, पंचप्रवर. (पाध्ये हे. च. )
वामन
वासुदेव
कामदेव
हेमाद्रि हयात स. १२७३त.
हा कर्तृत्ववान पूरुष तेराव्या शतकांत प्रसिद्धि पावला, ज्ञानदेव व चक्रधर यांचा समकालीन,
चतुर्वर्गचितामणि व इतर ग्रंथांचा कर्ता कालिदासाच्या रघुवंशावर याची टीका आहे. विशिष्ट
बावणीच्या दगडी इमारती, मराठीची लेखन प्रश स्ति, मं. डी लिपी, हिशेब ठेवण्याची मांडणी, बाज री-
नामक धान्याची उत्पत्ति अशा अनेक विद्वत्तेच्या व व्यवहाराच्या विषयांत नवीन प्रगति गांठणारा
सर्वागीग कर्तृत्वाचा असामान्य पुरुष. हा महादेवाचा व कृष्ण यादवाचा श्रीकरणाधिप होता.
याचा साहयकृत्ता बोपदेव पंडित (अन्यत्र दिला. आहे) .