लावणी १३४ वी - आम्ही राजहौंस पक्षी सहज आ...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
आम्ही राजहौंस पक्षी सहज आलों मुंबई शहरासी ॥धृ०॥
पाहिलें स्वरूप मनोहर आंगावर ज्वार फार सजली । कोण्य़ा राजींद्राची नार बत्तीसलक्षणी कनकपुतळी ? । कशी ठुमकत चाले जपुन, गांठ आड अकस्मात पडली । चाल । सखे मर्जी आमुची आहे । त्वां धरावा आमुचा स्नेहे । मनीं नको धंरू सौंशय । सांग रंगमहालीं कधीं नेशी ? ॥१॥
तुं अगदींच दिसतीस लहान नहाण आलें वरुषा-महिन्यांत । आंगीं विषयबाण चेतला त्वरीत ते आपुल्या महालांत चाल । जीव तुजवर झाला खुशी । लागलें लक्ष तुजपाशीं । आहे ईश्वर याला साक्षी । देखिली रंभा तुज जैशी ॥२॥
या दों दिवसांचा भर निघोणी जाइल आतां सखये । भ्रंशिली मती कां तूझी ? गांठ एकांतामधीं पडु दे । जोबन खुब आले भरून नवतीचा रंग खुलुंदे । चाल । आम्ही रोखून तुजशीं थाट । नव्या रस्त्यामधीं पडली गांठ । गळ्यामधीं कंठा दुहेरी थाट । मिठी मारावी सखे तुजशीं ॥३॥
बोध जाला, चित्तापासून सखा रंगमहलीं तिनें नेला । उभतांची जाली खुशी, आनंदें विडया देती त्याला । म्हणे सखाराम राघो मुशाफर पंची समजावीला ।
चाल । ठेवावी ममता बरी । अशी माझी विनंती स्मरी । कुशा छंद गातो तरा खासी ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP