मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
“नवीच रांड गळां पडली कोण ...

लावणी ७८ वी - “नवीच रांड गळां पडली कोण ...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


“नवीच रांड गळां पडली कोण ? ।
खरें सांग मजप्रती ? नाहींतर देइन प्राण ॥धृ०॥
कोण्या स्थळीं आज विलास केला ? ।
‘मागें येतों परतुनी’ बरीच भुलथाप देउनी गेला ।
केवळ तुम्ही पुष्पाचा झेला ।
मुखचुंबन सवतीचें रुतलें एकदंत झाला ।
सख्या मशिं सत्यवचन बोला ।
नेत्र दिसती आरक्त, कोठें कैफांत धुंद झाला ? ।
हा ऐसा इष्क राव तुम्हां लागला कुठून ? ।
नित नवीच रांड एक रोज पाह्तां उठून ।
मी असतांना परकीवर पडतां झटून ।
हटून दूर बसा कीं मजींत ।
नष्ट जात पुरुषाची कळून आली पुरतीच बेइमान” ॥१॥
“ऐक नारी, खरी आमची गोष्ट ।
बाळपणींचा मैत्र, त्याची कधीं नव्हती झाली भेट ।
काल अवचित पडली गांठ ।
त्यानें नेलें घराप्रत, नारी, तूं नको मानूं खोटं ।
वाढिलें पंचामृत ताट ।
भोजन झाल्यावर डाव मांडिला सारीपाट ।
असे खेळ खेळतां रात्र झाली चार प्रहर ।
जागृतीमुळें नेत्रावर चढलें जहर ।
दे पलंग टाकून, येते झोपेची लहर ।
लहरीवर येती लहरी जाण ।
नको छळूं मजप्रति, घडीभर होऊं दे निद्राशयन” ॥२॥
“बराच करूं शिकलासी मनधरणी ।
बोलणें मानभावाचें, कळून आली कसाबाची करणी ।
काल सवत पाहिली म्या दुरुनी ।
जात होती पाण्याला घागर उदकाची भरूनी ।
चल हो, दाविते मनगट धरुनी ।
मग पहाल खालीं, हात जोडूं लागला तिच्या चरणीं ।
अशी रांड तुम्हांला कोण मिळाली मुढ ? ।
तिच्यापुढें राव करितां लई गोष्टीची गडबड ।
हे रंगढंग चालणार नाहींत माझ्यापुढं ।
वोढे सवतीचे आज घेइन ।
भल्या बापाची लेक कधीं न मी उगीच राहीन ” ॥३॥
“नको करूं झाला बोभाट ।
तमासगिर मिळतील बरे जनलोकाचा थाट ।
समजलीस मजला तूं रागीट ।
तुझी आण आजपासून जाईना परकीच्या इथं ।”
वस्ताद सगनभाऊ म्हणे गुणीजन ।
उभयतां रंग मिळालें मन, लक्ष लावूनी ऐका ध्यान ।
सदा गात भजनांत बजाबा गातो अज्ञान ॥४॥


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP