लावणी ५५ वी - जन्म जाइ तों आतां तुझीच म...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
जन्म जाइ तों आतां तुझीच म्हणविते ।
प्रीतिचे मेघराज, धनि माझे महाराज ! मी
दासी तुमची भाज, आज विनविते ॥धृ०॥
तुम्ही न बोलतांच मशि हंबरते गाय जशी
हशि खुषी दिशिं निशीं हनुवटीसी हात लाविते ॥१॥
कर सख्या विषयहरण, मग येउं दे मरण तरण
शरण तुझें धरून चरणतीर्थ सेविते ॥२॥
नको तुझी तनसोडी मला, प्राण वाहिला रे तुला
रोज घरिं येत चला, मी बलाविते ॥३॥
मी लबाड, द्वाड, ख्वाड, तुझी मर्जि अति कडाड
तरि कुर्हाड शस्त्र काढ, शिर फोड आपल्या हातें ॥४॥
होनाजी बाळा करि छंद रसिक चालीवरी, श्रीहरिचे
पाय धरी, शिरीं लाविते ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP