मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
किती लाजुन पळतेस अम्हांला...

लावणी ६२ वी - किती लाजुन पळतेस अम्हांला...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


किती लाजुन पळतेस अम्हांला ? कां म्हणशी तूं नका नका ? ।
घडेल तेव्हा संग घडो, पर तूर्त तुझा घेउं दे मुका ॥धृ०॥

गौरवर्ण मृदु अंग सुंदरी पाहुन मन तुजवर झुकलें ।
हास्यवदन सर्वदा टवटवित, गाल जसें केळें पिकलें ।
दोन्ही स्तन गटगटित चोळिच्या आंत कसे जाउन लिकले ।
क्षणक्षणा वरखालीं पहातां पापि नेत्र अमचे थकले ।
अम्ही शहाण्याचे वेडे जाहलों, भुल पडली अमच्या अकले ।
त्यजुन बायका घरच्या प्राणी कितिक प्रपंचाला मुकले ।
मोठे मोठे धनवान तुसाठीं यत्न करुन पाहुन चुकले ।
बहुतांनीं ठेविली अशा पर नाहिं कोणाचे गडे विकले ।
हा बहर गेल्यावरी सुंदर घरी बसून मारशील हाका ॥१॥

स्वयंभ रत्नाचीच खाण तूं, अशी दुसरी विरळा न दिसे ।
धन्य पित्याचा गर्भ प्रसवली माय तुला तशी राजसे ।
मुखडयावर नौतीचा तजेला, कहर पाचव्या दिशीं दिसे ।
तेव्हां निरखुन पाहतां अमचें वीर्य गळेल वाटतें असें ।
तुझा समागम नित्य असावा, हें दैवी अमच्या नाहीं कसें ? ।
घे कागद गडे लिहुन तुझ्या धरीं अम्ही राहतों चाकर जसे ।
तें तर फारच दूर, येव्हांशी काय तुला सांगून फुका ? ॥२॥

भुजा तुझ्या गोंडाळ, हतामधें गोटपाटल्या झळकती ।
अखुड पाउलें टाकी तशा (?) निघाली चालशी गजाकृती ।
नेसुन लुगडें साफ, स्वच्छता तुझी सांगावी किती ? ।
कवळुन धरल्यावर सोडावी असें वाटेना अम्हांप्रती ।
विषयमदाचें मोहळ सखे तूं, नाहिं तुला तुजयोग्य पती ।
काय करावें ? अम्हि चरफडतों, तूं पडलिस भोळसरा हतीं ।
मर्यादेचा सागर भरलिस, नाहिं कमी गुण यावरतीं ।
हें लक्षण पहावें या बायका तुझ्या घरिं येउन राहती ।
तुझे वदन चुंबितां गोड किती, जसा श्रीखंडाचा भुरका ॥३॥

उष्ण काळीं मार्गानें चालतां जिव करितो पाणी पाणी ।
तशी तुझेवर प्रीत असे गडे, तूं आतां अमची राणी ।
प्रेमाचा पुर अला अम्हांला, गत झाली वेडयावाणी ।
पुढें अतां नको पाहुं, आसपास नाहीं कोणी ।
यापाइ कांघाइ करशील, तरी न सोडूं निर्वाणी ।
हे नलगे सांगावें, मुळचि तूं आहेस पक्की, शहाणी ।
बळ पुरुषाचें पाहून पडली मग त्याच्यापुढें उताणी ।
मन धालें उभयतां मिळालीं तीं जैशी साखरलोणी ।
होनाजी बाळा म्हणे, बरें जाहलें पार नाहीं अमुच्या सुखा ।
दिली सोडुन, मग गेली घरामधे, पदर लाविला तिनें मुखा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP