लावणी १०३ वी - हाका मारू मारु जीव त्रासल...
लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.
हाका मारू मारु जीव त्रासला गे ।
सखा बाहेरी कां बैसला गे ? ॥धृ०॥
रात्र करमिली कुठें जागलासी ? ।
शीण चढला मोठा, भागलासी ।
बरें कपट हें करूं लागलासी ।
कां रे नारू मोठा भासला गे ? ॥१॥
पूर्वीं लिहिलें होतें सटवीनं ।
तींच अक्षरें ह्रदयीं सांठवीन ।
तुज प्रीतीची निशा पटवीन ।
लुटवीन लई माल साठविला गे ॥२॥
खुशी रंगबहार रंग खेळलासी ।
नूतन स्त्रिया तूं नखर्या मेळवीशी ।
बस्त्र अलंकार देउनी बोळवीसी ।
दुजा नाहीं असा कुठें भासला गे ॥३॥
एक आज्ञा तुं हे राजहंसा ।
रात्रीं नको येऊं, स्वस्थ यावें दिवसा ।
सगनभाऊ म्हणे हें जगणें वाशा ।
सत्यवृत्तांत आसभास लागे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP