मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
श्लोकपंचक

पदसंग्रह - श्लोकपंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[वसंततिलका.]

झाली प्रभात उठ सत्वर साधकार रे ॥ देतील हें न कळतां रिपु सा धका रे ॥
याकारणें जप निरंतर वैखरी रे ॥ हा मंत्र राम निजमूर्ति षडक्षरी रे ॥१॥
संसार दुस्तर समुद्र तरावयासी ॥ तूं बुद्धिमंद नर भाव धरावयासी ॥
प्रात:रमरामि तरि लौकरि तूं करी ते ॥ हा मंत्र राम० ॥२॥
बुद्धयादिकें सबळ इंद्रियवृंद पाही ॥ झाला असे विषय सन्मुख सर्वदांही ॥
त्यांलागुनी शमदमें नियमें धरीं रे ॥ हा मंत्र राम० ॥३॥
पावोनि दुर्लभ अशी तनु मानवी रे ॥ झाली असे तुज कशी दिवसी निशी रे ॥
आत्मप्रकाश करुनी जिव उद्धरीं रे ॥ हा मंत्र राम० ॥४॥
आतां तरी त्वरित सावध या प्रसगें ॥ होऊनि तूं सहज पूर्णपदींच रगें ॥
सायुज्य मोक्षपदवी स्मरणें वरी रे ॥ हा मंत्र राम० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP