मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३३६ ते ३४०

पदसंग्रह - पदे ३३६ ते ३४०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३३६. (चा. सदर.)
तुजविण राघवा सुख नाहीं ॥धृ०॥
द्दश्य मृषा दिसतांही ॥ न बुडें मृगजळ-डोहीं ॥१॥
तुजविण आणिक न गमे कांहीं ॥२॥
निजात्म रंगें दाहाहीं ॥ लावीं भजनप्रवाहीं ॥३॥

पद ३३७. (गुरु देव देवा या चा.)
रघुवीरा देवराया ॥ दुस्तर संसारसिंधू तराया ॥धृ०॥
सच्छास्त्रीं आवडि लागो ॥ स्वहितीं मानस हें जागो ॥ सज्जन सेविति जें तें सुख मागों ॥१॥
आवडी लावुनियां नामीं ॥ विरक्तिच्या वसवीं ग्रामीं ॥ यश दे षड्‌रिपुंच्या संग्रामीं ॥२॥
वारुनि संसृतीचा धोका ॥ मारुनि कळिकाळ बोका ॥ निजरंगें रंगुनि तरवीं लोका ॥३॥

पद ३३८. (चा. सदर.)
हरिचि मी दासी अंकिलि ॥ प्रज्ञा प्रतिज्ञा बोलें बोली ॥धृ०॥
नीति न सांडिं तेणें ॥ राहिलें सकळ भेणें ॥ कीजे आमुचें काय कोणं ॥१॥
नवविधा चतुर्विधा ॥ बोधं बोधली मेधा ॥ आलें साम्राज्य आत्म बोधा ॥२॥
यद्यपि जन निंदी वंदी ॥ न पडे त्यांचिये छंदीं ॥ अंतर रंगलें निजानंदीं ॥३॥

पद ३३९. (चाल-अभाग्याचे घरीं बाबा०)
एक राम त्यासि काम येर सर्व वाव ॥ निर्भय त्रिभुवनीं सौरी गुरुपदीं भाव ॥धृ०॥
भाव दावुं काय कौतुक वाटे बाई ॥ चारी साहा विशद हेचि वाजविति घाई ॥१॥
दोनि तिनीचि चारी पांच सारोनियां अंगें ॥ एकी एकपण टाकुनि मीच पुढें मागें ॥२॥
तुटला बंद लगला छंद एक निजानंद ॥ नाना रंग सहजचि नाहीं राहिलें आतां द्वंद्व ॥३॥

पद ३४०. (चाल-अभंगाची)
देउनियां चित्त आदरीजे व्रत ॥ हित कीं अहित झालें माझें ॥१॥
परिसावो साजणी संसाराची काहाणी ॥ काय लाजिरवाणी बोलों आतां ॥२॥
नाहीं नाम रूप पडिला तो कपाळीं ॥ कर्म धर्मा टाळी पिटियली ॥३॥
आजन्माचें माझ्या झालें हेंचि फळ ॥ याती गेली कूळ शुन्य झालें ॥४॥
कांहीं नाहीं तें करावें तें काय ॥ सर्वापरी माय ऐसें झालें ॥५॥
सासुरें माहेर दोन्ही निराकार ॥ कोठें येरझार करूं आतां ॥६॥
आतां हा निर्धार माझी मीच थार ॥ अवघा व्यवहार पूर्ण झाला ॥७॥
एक रंग बाई नाहीं माझे ठायीं ॥ निजानंदें काई केलें नेणें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP