मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २९६ ते ३००

पदसंग्रह - पदे २९६ ते ३००

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २९६. (अष्टपदी. चा प्रिये चारुशीले)
सये कैं मनोरथ जगन्नाथ पुरवी ॥ देऊनि अभय भवसिंधु तरवी ॥धृ०॥
लेश विश्रांतिचा प्राप्त नाहीं भवभ्रांति दिग्मंडळीं व्यर्थ फिरवी ॥
शीण बहु वाटतो आटवीता पुनर्जननमरणावळी कोण सखी ॥१॥
साधुसंगें अभिप्राय सच्छास्रिंचें शोधितां साधली युक्ति बरवी ॥
भक्तिविरक्ति भगवत्प्रबोधामृतीं मातली बुद्धि संकल्प नुरवी ॥२॥
ब्रह्मसाम्राज्य स्वानंदयोगें असंभावना शांति निर्द्वंद्व करवी ॥
रंगला पूर्ण निजानंद जनिं वनीं सायुज्य संपदा छत्र धरवी ॥३॥

पद २९७. (चा.अ सदर. राग भूप)
जगीं साधु विरळा जगीं साधु विरळा ॥ व्कचित्‌ डोळस इतर लोक तिरळा ॥
हंस कोकिळ शुका काक उलुका क्बका सरि काय माणिका आणि हरळा ॥धृ०॥
नाचरे वेदोक्त मूढ विषयासक यातना दु:ख दुर्वार भोगी ॥
सुजन सद्नक्त साधन चतुष्टय युक्त गुरुमुखें उपनिषत्सार भोगी ॥१॥
ज्ञानानळें अहंमम पाश जाळिले वाळिले षड्‌वर्ग श्वपच जैसे ॥
वारणाचा प्राणहरण तो केसरी संहरी छेदभेदादि तैसे ॥२॥
निज सुखें निराजतो संपूर्ण सहज तो ब्रह्मबोधेंचि गंभीर जाहला ॥
रामरूपें सदानंद चिद्धन तनू श्रीगुरूदत्त संप्राप्त त्याला ॥३॥
असा ईश तो रंगला सर्व रंगीं ॥ जसा शोभताहे क्षिराब्धीतरंगीं ॥धृ०॥

पद २९९. (चा. सदर)
हरे धांव रामा हरे पाव रामा ॥
तव पदीं मन रमो विषयांसि उपरमो जनकजाजिवन कल्यणधामा ॥धृ०॥
वारितां दुरित करें चित्त विषयीं भरे नावरे वावरे दु:ख सदनीं ॥
याचि लागुनि वदें पतितपावन-व्रिदें अट्टहासें तुतें वदत वदनीं ॥१॥
षड्‌रिपू ये कळीमाजि पैं आकळीसा नसे रे बळी तुज हि परता ॥
धांव पावें जिवें ग्रासिलों या भवें त्वरित घे तुजमाजि करुनि सरता ॥२॥
अखिल निज शांति दे. भ्रांति नासुनि पुरी, वातिच्या परि मतें विषय गमवीं ॥
अंत्यजाचें परी वृत्ति सारुनि दुरी श्रुति नेति वदती मन तेथ रमवीं ॥३॥
शेष प्रारब्ध नि:शेष न शे जंव तंव जिवन्मुक्त सुख देईं मजला ॥
स्वामी निजानंद चरणकमळीं चित्त रंगवीं इतर न मागोंचि तुजला ॥४॥

पद ३००. (चा. संत दयाळ)
हरिजन हरिसम रे भावुनी पद भजनीं रम रे ॥ भवसागर मृगतोय विभासे ॥ मग कैचा श्रम रे ॥धृ०॥
धरितां भावार्था येणें साधिसि परमार्था ॥ सर्व अनर्था चुकवुनि आपुल्या जोडिसि निजस्वार्था ॥१॥
वरितां हे चाली माया ममता मृत झाली ॥ वानिति वेद पराकम हरुषें पूर्ण दशा आली ॥२॥
जन्म अनंताचा झालों अंकित संतांचा ॥ निज रंगें नाचतसे गर्जत पावन त्निवाचा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP