मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[इंद्रवह्ज्रा. गण त, त, ज, ग, ग.]

निवृत्तियोगें जड वत्ति झाली ॥ सौख्यार्णवीं हे स्मृति ते बुडाली ॥
मी कोण हे विस्मृति जाण देहीं ॥ सत्कर्म राहे तरि दोष नाहीं ॥१॥
पव्कीं फळें पादप तो धरीना ॥ कीं बाळ सर्पादिक आवरीना ॥
ऐशी दशा वर्तत जाण देहीं ॥ सत्कर्म० ॥२॥
तापत्नयें कुंठित देह झाला ॥ किंवा समाधि स्वसुखेंचि ठेला ॥
बार्धक्यकाळीं विगतेंद्रियें हीं ॥ सत्कर्म० ॥३॥
प्रारब्धयोगें सुनिपात झाला ॥ बुद्धीसही विभ्रम पूर्ण ठेला ॥
प्रेमें हरिच्या रत कीर्तनीं ही ॥ सत्कर्म० ॥४॥
सिद्धांत आचार्यमुखें कळेना ॥ निष्कर्म-दीक्षा तब आकळेसा ॥
सचित्सुखें रंगुनियां विदेही ॥ सत्कर्म० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP