मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५८६ ते ५९०

पदसंग्रह - पदे ५८६ ते ५९०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५८६.
विश्वपटीं तंतू राम ॥ वेष्टी-समेष्टी राम ॥
व्याप्य व्यापक श्रीराम ॥ स्थूळ सूक्ष्मीं राम ॥१॥
पिंडीं ब्रह्मांडीं राम ॥ पंचभूतीं अवघा राम ॥
जनीं विजनीं श्रीराम ॥ देह विदेह राम ॥२॥
प्रकृति पुरुष दोन्ही राम ॥ सगुण निर्गुण राम ॥
गुणी गुणातीत श्रीराम ॥ अंतर्बाह्म राम ॥३॥
नाना अळंकारीं हेम ॥ तैसा विश्वीं हा श्रीराम ॥
छेद भेद विरहित राम ॥ आदीं अंतीं राम ॥४॥
सहजीं सहज पूर्णकाम ॥ मुनिजन-विश्रामधाम ॥
रंगातीत निजमूर्ति राम ॥ सर्वहि राम ॥५॥

पद ५८७.
सद्नुरु सद्वैद्यराज ॥ पद्महस्ती तेज:पुंज ॥
तत्वमसी सांगे निज गुज ॥ बीजमंत्र कानीं ॥१॥
देउनि विचार ढाळ ॥ वारिला अनित्य मळ ॥
जाहलें अंतर निर्मळ ॥ शुद्ध सत्वात्मक ॥२॥
पूर्ण मात्रा तयावरी ॥ ह्र्दयीं भेदली बरी ॥
स्वधर्म अनुपानें साजिरीं ॥ रूपासी आली ॥३॥
भजनपथ्य नवविध ॥ साधुसमागमें शुद्ध ॥
चालवावें तरीच औषध ॥ करील रूप ॥४॥
निर्वातीं एकांतवास ॥ लौकिकीं असावा त्रास ॥
सद्नुरुच्या भजनीं विश्वास ॥ द्दढ निश्वयेंशीं ॥५॥
भवरोग मग त्रिभुवनीं ॥ न दिसे कल्पांतीं स्वप्नीं ॥
सहज पूर्ण रंग जनिं वनीं ॥ निजानंद होय ॥६॥

पद ५८८.
कृष्णा रामा गोविंदा नारायणा हरी ॥ अच्युतानंत केशव माधव मुकुंदा मुरारी ॥ध्रु०॥
ऐसीं सहस्र नामें वाचे दीर्घस्वरें उच्चारी ॥ तरोनि तारक झाला कोटि कुळांतें उद्धरी ॥१॥
नामें तरले अगणित महा पापी दुराचारी ॥ जळचर वनवर खेचर भूचर चराचर नर नारी ॥२॥
नामस्मरणें रंगला तो कळिकाळा आकळी ॥ मुखें रामनाम हातें वाजवावी टाळी ॥३॥

पद ५८९.
श्रीहरी सच्चिदानंदा येरे गोविंदा मुकुंदा ॥ सांडुनि सर्वही मायिक धंदा वंदीन पादारविंदा ॥ध्रु०॥
नाना साधन करिती त्यांसी सहसा न कळसी ह्रषिकेशी ॥ दुर्लभ ब्रह्मादिक देवांसी तो तूं गोकुळवासी ॥१॥
संसारार्णव दुस्तर पाहीं तारवेना बाहीं बुडतों डोहीं ॥ धांवुनि येउनि तूं लवलाहीं ॥ लावीं भजनप्रवाहीं ॥२॥
निर्गुणा तूं नित्य नि:संगा मुनिमानसभृंगा अभंगा ॥ चित्‌-उदधी तूं विश्वतरंगा ॥ सहज पूर्ण निररंगा ॥३॥

पद ५९०.
समपद सुंदर रे इटेवरी ॥ध्रु०॥
चंद्रभागातीरीं हस्त कटावरी मद्ननमनोहर रे ॥१॥
पुंडरीक-वरद भक्तवत्सल ब्रीद गर्जती सुरवरें ॥२॥
त्रिभुवननायक निजसुखदायक रखुमादेवीवर रे ॥३॥
सनक सनंदन ध्याती गाती नारद तुंबर रे ॥४॥
सहज पूर्ण रंग निजानंद अभंग ब्रह्म परात्पर रे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP