मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५६१ ते ५६५

पदसंग्रह - पदे ५६१ ते ५६५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५६१.
रातला रे हरी अंतर प्रतितीसीं ॥ध्रु०॥
चिदचिद्‌ग्रंथी हे ह्रदयीं ची सोडुनी ॥ आवरण विक्षेप वास हें फेडुनी ॥१॥
नि:संग शेजे निजीं निजवुनी सम्मुख ॥ परापारुषली काय सांगों वैखरीनें सुख ॥२॥
ज्याचें तेचि जाणे ज्याचें तेचि जाणें ॥ अंतरींची खुण अंतरीं बाणें ॥३॥
वर्ण व्यक्ति शून्य नामरूपातीत ॥ न बोलवे बोलीं ब्रह्म सदोदित ॥४॥
निजानंदीं पूर्ण रंगला साजणी ॥ बोलों जातां मौन धरियलें साजणी ॥५॥

पद ५६२. [आत्यास्वामीकृत.]
मातला रे रामरस हा सेवुनि ॥ध्रु०॥
निजानंदें डुल्लत द्दष्टि दुजें नाणी ॥ देहीं देहातीत सदोदित होउनी ॥१॥
अनावर नि:संग निर्लज्ज निर्भय ॥ स्मरण विस्मरण तिळांजुलि देउनी ॥२॥
वर्णाश्रम कर्माकर्म न विचारी धर्माधर्म ॥ पूर्ण रंग रंगला येउनी जाउनी ॥४॥

पद ५६३.
आठवा. चित्तीं राम निजमूर्ति ॥ चुकती निश्चतीं संसृति आवृत्ति ॥ध्रु०॥
सार या साराचें छेदक संसाराचें ॥ पार्वतीवराचें ध्येय ध्यान साचें ॥१॥
पूर्व पुण्यें होती सफल या प्रतापें ॥ नासती अनुतापें स्थूल सूक्ष्म पापें ॥२॥
अधिष्ठात्रि देव फलद होती सर्व ॥ पालटती स्वभाव इंद्रियांचे पूर्व ॥३॥
वैराग्येंशीं ज्ञान होय तें विज्ञान ॥ क्षीण होय अज्ञान बोलती सज्ञान ॥४॥
मी माझें हा संग भंगुनि नि:संग ॥ निजानंदें रंग रंगला अभंग ॥५॥

पद ५६४.
ऐसें काय जिणें हरिविणें वो ॥ उदरभण करित नाहीं काय शूनें वो ॥ध्रु०॥
मन मुरडेना संतसंगतीं जडेना ॥ श्रवण घडेना देहबुद्धि बुडेना ॥१॥
संदेह जळेना गळेना ॥ सारासार कळेना समाधान मिळेना ॥२॥
प्रवृत्ति अंगना तिळतुल्य खंगेना ॥ संग भंगेना निजानंद रंगेना ॥३॥

पद ५६५. [चाल-अंभग]
मी कोण हें काय कर्ता याचा कोण ॥ आहे उपादान काय याचें ॥ध्रु०॥
या नांव विचार विचार विचार ॥ ब्रह्म साक्षात्कार होय जेणें ॥१॥
मी आत्माराम शुद्ध बुद्ध मुक्त ॥ सर्वीं सर्वातीत पूर्ण ब्रह्म ॥२॥
हें काय विवर्त रज्जु-सर्प-न्याय ॥ बागुलाचें भय बाळकासी ॥३॥
कर्ता हा संकल्प करितसें घडमोडी ॥ ब्रह्मांड उतरडी उतरी रची ॥४॥
जगदाभास मिथ्या माया आवरण ॥ अज्ञान कारण मूळ याचें ॥५॥
बह्म सहज पूर्ण कैंचें छेद भेद ॥ अवघा निजानंद रंगलासे ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP