मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[द्रुतविलंबित. गण न, भ, भ, र.]

जन समानचि भासति संत हो ॥ नसति मानव तेचि अनंत हो ॥
वचरें तुलती सम केसरी ॥ तरिच साधुजना सरिसी परी ॥१॥
जन मनीं ममता द्दढ भाविती ॥ घन जनार्दन सज्जन दाविती ॥
उलुक वायस हंस घडे सरी ॥ तरिच० ॥२॥
जन विमोहित जात अधोगती ॥ विदित वेद महंत विराजती ॥
उडुगणें सम साम्य दिवाकरीं ॥ तरिच० ॥३॥
जन पदार्थलयीं श्रम मानिती ॥ विगत शोक महत्सुख पावती ॥
वनतरूसन कल्पतरू जरी ॥ तरिच० ॥४॥
जलनिधीसम थिल्लर जैं घडे ॥ मशक तो खगपा सम जैं उडे ॥
अखिल रंग तुळे विषयीं जरी ॥ तरि० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP