मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे २२१ ते २२५

पदसंग्रह - पदे २२१ ते २२५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद २२१.
दुर्लभतर नरदेह पावुनि काय केलें ॥धृ०॥
हरिभजनेंविण विषयविलासीं ॥ गुंतुनि वायां वय गेलें ॥१॥
चिंतामणि टाकुनि कांचवटी ॥ घेती तैसें तुज झालें ॥२॥
ज्ञानचक्षुवरि भवभ्रांतीचें ॥ मायापडळ हें कां आलें ॥३॥
अंजुळिचें जळ तेविं पळें पळ ॥ आयुष्य कळीकाळें नेलें ॥४॥
निजरंगें हरिभजनीं रमसी ॥ मग तुज कांहीं न मी बोलें ॥५॥

पद २२२.
हरिनमामृतपान करिती सुरवर तो ॥धृ०॥
नित्य मुक्त इहलोकीं नामें ॥ भगवज्जन अजरामर ते ॥१॥
हरिभजनें निजनिश्वळ स्वरुपीं ॥ नेणति गुज हें पामर ते ॥२॥
निजरंगें रंगुनियां ठेले ॥ हरिजन पूर्ण पराप्तर ते ॥३॥

पद २२३.
केवळ नरहरि तो नरहरि तो ॥ भजतां भवभय हरितो ॥धृ०॥
वाचा हरि-गुरुस्मरणीं-स्वरुपीं ॥ सावध अंत:करणीं ॥१॥
गुळ गुळाची गोडी ॥ मुळिंच्या ऐक्यत्वासि न सोडी ॥२॥
निजरंगें रंगला ॥ सहजें दुष्टसंग भंगला ॥३॥

पद २२४.
ज्ञानदेव ज्ञानदेव ह्यणतां ज्ञान देव द्तो ॥ वासुदेवचि होतो अखंड वदनिं वदे तो ॥धृ०॥
ज्ञानदेव चतुरक्षरी जप हा करितां सर्वज्ञा ॥ ज्ञानाज्ञानविरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ॥
ज्ञाता ज्ञेय निजांगें होय हे ज्याची प्रज्ञा ॥ ज्ञानाग्नीनें पापें जळती हे याची आज्ञा ॥१॥
नररूपें श्रीविष्णू अवतरला श्री हा भगवान ॥ नद नदि वापी कूप पाहातां उदक नव्हे भिन्न ॥
नवल हेंचि पशु ह्मैसा परि तो करि वेदाध्ययन ॥ नमन करुनि सद्भावें जपतां होय विज्ञान ॥२॥
देवादि देव तो हा भगवद्भक्तांप्रति वर दे ॥ देतां वर ब्रह्मांडीं ब्रह्मानंदचि हा कोंदे ॥
देशिकराज दयानिधि आलंकापुरीं जो नांदे ॥ देशभाषां ज्ञानदेवी गीता ग्रंथ वदे ॥३॥
वक्ते श्रोते पठणें श्रवणें पावति सम भाव ॥ वर्णूं जातां अगणित महिमा होती जिव शीव ॥
वंदुनि अनन्य भावें गाऊं गीतीं जानदेव ॥ वर्षति निज रंगें ते पूर्ण जाणति स्वानुभव ॥४॥

पद २२५.
हरि नारायण बोल ॥ वाचे ॥धृ०॥
हरिस्मरणेंविण वावुगा शीण ॥ जाणुनि सर्वहि फोल ॥१॥
वाळुवेचा घाणा व्यर्थचि करकरी ॥ बडबडि तैसे ढोल ॥२॥
हरिस्मरणें पूर्ण रंगें रंगुनी ॥ निजानंदें डोल ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP