मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६४१ ते ६४५

पदसंग्रह - पदे ६४१ ते ६४५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६४१. [चाल-बोलणें फोल झालें डोलण.]
धन्य धन्य धन्य धन्य ते ज्ञानी रे ॥ध्रु०॥
परब्रह्म अणुभविलें ज्यांसीं ॥ परब्रह्म तें निश्चपेंसीं ॥
कळलें हें मानसीं ॥ तेंही ब्रह्मरूप ॥१॥
येविषयीं संशय तें पाप ॥ हो कां तो ब्रह्मयाचा बाप ॥
याकरितां या अर्थाचा लोप ॥ वाचा ठपणें ॥२॥
ब्रह्मविद ते ब्रह्मरूप ॥ ऐसा हा श्रतिवाक्यदीप ॥
त्रिभुवनीं अनूप ॥ सशवत नाशक साक्षी ॥३॥
नलगें याती कूळ कर्म ॥ नलगे वर्णाश्रमधर्म ॥
येयें एकावे आहे वर्म ॥ तें पडावें ठायीं ॥४॥
ज्याचिये अनुभवद्दष्टीं ॥ कैंची माया कैंची सुष्टी ॥
वेष्टि समेष्टि  हे गोष्टी ॥ नोलोंचि नये ॥५॥
कल्पांतीं जळ केवळ तुंबळ ॥ तयामातीं हे कल्लोळ ॥
ब्रह्मादिक अवतार सकळ ॥ बुद्धुद तरंग ॥६॥
अनंत ब्रह्मांडें पंक्ती ॥ परब्रह्मीं होती जाती ॥
जैशा हेमीं नाना व्यक्ती ॥ अलंकारांच्या ॥७॥
परि भिन्न भेदाचा लेश ॥ ठावा नाहीं ज्याचा त्यास ॥
सायंप्रातरीविविंबास ॥ शिवला नाहीं ॥८॥
ऐशिया अनुभवीं संत आत्मलाभें नित्य तृप्त ॥
प्रकट गुप्त असंख्यात ॥ लीलाविग्रही ॥९॥
हरि होउनियां हरिनामें ॥ गर्जति नाचती प्रेमें ॥
हरिभजनसंभ्रमें ॥ न समावती कोठें ॥१०॥
दर्शनें संसारसार ॥ दीक्षाग्रहणीं जगदुद्धार ॥
दुस्तरतर मायेचा पार ॥ पावती प्राणी ॥११॥
सहजीं सहज पूर्ण रंग ॥ निजानंद निसंग ॥
अनिर्वाच्य अभंग ॥ विद्वद्वर्य ते ॥१२॥

पद ६४२. [राग कल्याण.]
ध्यावा देव गजानन रे ॥ध्रु०॥
सिद्धिविनायक निजसुखदायक ॥ त्निभुवननायक पतीतपावन रे ॥१॥
मंगळकारक निजजनतारक ॥ स्मरणें दहन करी भवकानन रे ॥२॥
नित्य निरंजन सज्जनरंजन ॥ सहज पूर्ण निजरंग सनातन रे ॥४॥

पद ६४३.
माझी रंगमूर्ती मज कोणि दावा हो ॥ माउली कृपाळू मनीं भावा हो ॥ध्रु०॥
वत्सासी जैसी गाय ॥ बाळकासी तैसी माय ॥
हरिणी पाडसा ऐशा भावें हो ॥ माझी० ॥१॥
वापही माय ॥ बंधु सखा होय ॥
त्याविण मज कोण आहे हो ॥ माझी० ॥२॥
सहज पूर्ण निजरंगा स्वामी ॥
पाळितसे लडि भाविकांची हो ॥माझी ॥३॥

पद ६४४.
भक्तपराधिन मी निरंतर ॥ध्रु०॥
कोणासहि हें वर्म कळेना ॥ काय कथूं अधमीं ॥ निरंतर० ॥१॥
नानारूपें त्याजमुळें ते ॥ बुडती शुद्ध तमीं ॥ निरंतर० ॥२॥
जरि पापी मद्भक्तिपरायण ॥ त्यासहि प्राणद मी ॥ निरंतर० ॥३॥
सहज पूर्ण निजरंगीं रंगले ॥ निजदासां, नत मी ॥ नि०॥४॥

पद ६४५.
निरवधि अवडती ते मज निरवधि आवडती ॥ भक्त महा सुकृती ॥ध्रु०॥
दोंवरी दोन भुजा घेउनियां आलों या काजा ॥ कीं कवळावें अंग जयाचें ह्रदयीं चौहातीं ॥ ते मन० ॥१॥
ज्यांच्या पादरजें मद्नत ब्रह्मांडें विरजे ॥ धांवे यास्तव मागें मागें सत्वर पादगतीं ॥ ते मज० ॥२॥
सहज निजानंदें रंगें रंगुनियां छंदें ॥ पूर्णानंदें समाधी ज्याची ह्रदयीं सांठविती ॥ ते मन० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP