मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४८६ ते ४९०

पदसंग्रह - पदे ४८६ ते ४९०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४८६.
कामीं कां मीं प्रीति धरूं ॥ध्रु०॥
दु:खरुप जड द्दश्य विकारी ॥ विषवत्‌ विषय कसा स्विकरूं ॥१॥
ब्रह्म सनातन आंगें असतां ॥ जन्मुनिजन्मुनी व्यर्थ मरूं ॥२॥
सहज पूर्ण अज शाश्वत अव्यय ॥ अद्वय रंग विरंग करुं ॥३॥

पद ४८७.
हर हर हर महादेव ह्रणा ॥ध्रु०॥
भक्ति विरक्ति पबोधेंकरुनी ॥ तत्पर होउनि क्षणक्षणा ॥१॥
सप्रेमें शिव स्मरतां वाचें ॥ काळिकाळाचें भय कोणा ॥२॥
भवगजपंचानन करुणाघन ॥ भयकृद्नयनाशन जाणा ॥३॥
जन्ममरणसंसरणनिवारण ॥ नामस्मरण हें कां नेणा ॥४॥
सहज पूर्ण निज रंग अभंग ॥ नित्य निरामय गुरुराणा ॥५॥

पद ४८८.
राज नमो गुरुराज नमो ॥ध्रु०॥
तापलों तापें अति अनुतापें ॥ शरण मी तुज भवतापशमो ॥१॥
तुझिये कृपाद्दष्टि वेष्टी समेष्टी ॥ मृगजळवत्‌ भवसिंधु गमो ॥२॥
सत्य ज्ञानानंत प्रबोधीं ॥ इंद्रियवृंद समूळ रमो ॥३॥
कामादिक दुर्जय षड्वर्गीं ॥ आत्मानात्मविवेक दमो ॥४॥
सहज पूर्ण निजरंगपदाब्जीं ॥ मानस षट्‌पद नित्य भ्रमो ॥५॥

पद ४८९.
आतुर चतुर पण काय असे ॥ध्रु०॥
स्वात्मसुखामृत त्यागुनियां अज्ञ ॥ तृप्त ह्मणे मीं विषयरसें ॥१॥
शाखारुढ होउनि मुळ छेदी ॥ सुज्ञ म्हणावें त्यासि कसें ॥२॥
सहज पूर्ण निजरंग उपेक्षुनि ॥ भ्रमत स्मशानिं जेविं पिसें ॥३॥

पद ४९०.
जग मृगनीर राम रवी ॥ध्रु०॥
भासे तुंबळ सोज्वळ जळापरी ॥ काय तृषा पुरवी ॥१॥
चित्सूर्यातें नेणुनियां अज्ञ ॥ मृग आपणां फिरवी ॥२॥
सहज पूर्ण निजरंगें रंगुनी ॥ दिनरजनी नुरवी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP