मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[इंद्रवज्रा, गण त, त, ज, त, ग.]

मी कोण झालें जग कासयाचें ॥ याचें असे कारण काय साचें ॥
विचार साचार असा न केला ॥ तो इंद्रयार्थीं जन हा भुकेला ॥१॥
शास्त्रार्थ आचार्य स्वमत प्रमाणें ॥ त्रि प्रत्ययें युक्त बरीं प्रमाणें ॥
विचार साचार असा न केला ॥ तो इंद्रि० ॥२॥
मृगांबु जें केवळ विश्व आहे ॥ पूर्वीं नसे शेवटिंहीं न राहे ॥
विचार साचार असा न केला ॥ तो इंद्रि० ॥३॥
विवेक हा दीपक न प्रकाशे ॥ न:शेष माया तम तों न नाशे ॥
विचार साचार असा न केला ॥ तो इंदि० ॥४॥
आराधिल्या सद्नुरु अंतरंगें ॥ मानस तैंच भंगे ॥
तत्त्वज्ञ तो होउनि अद्वयांगें ॥ डोले निजानंद सुखैक रंगें ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP