मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४१६ ते ४२०

पदसंग्रह - पदे ४१६ ते ४२०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४१६. [उत्तम जन्मा येउनि रमा गेलों उगा वाया या चा.]
कांहीं नरदेहीं या झालें हित जिवाचें रे ॥
नाहीं जाळियलें मी माझें बीज भवाचें रे ॥धृ०॥
वायां धरियला कां वाळुवेचा घाणा वो ॥
मथिलें तोय वृथा नवनीत कैंचें जाणा वो ॥१॥
सकळ कळाही अष्टादश चार्‍ही साही वो ॥
मीपण योगें पाडीती वादप्रवाहीं वो ॥२॥
विरक्त वनवासी तापसी मुनि संन्यासी वो ॥
मीपण-दोषें राग द्वेषें झालें क्लेशी वो ॥३॥
छळिलें षड्वर्गीं विर्दळिलें मोह-शोकें वो ॥
झाली क्षीण विराली दैवी संपत्ति धाकें वो ॥४॥
शोधुनि पाहतां श्रीगुरुवीण नाहीं त्राता वो ॥
अहंमती नुरवी चरणांबुज त्याचें ध्यातां वो ॥५॥
मुमुक्षु गाती सत्कीर्ति छंदें छंदें वो ॥
सत्ता फावली रंगली निजानंदें वो ॥६॥

पद ४१७. [हिंदुस्थानी]
तुझें तूं गमाया धड रे ॥
देख दिवे ते राती किई है गाफिल तर मुंड रे ॥धृ०॥
नंगा आना नंगा जाना धागा बिनहि रहता रे ॥
गैर हुषार गुन्हेगार मेरा मेरा कहता गंव्हार ॥१॥
झुटी माया झुटा भाई बाप पूत सब झुटे रे ॥
जबलग तन धन साबुत है तबलग लगते मीठे रे ॥२॥
छांडीं दिन दुनियां की भंग खाकर हुवा दंग रे ॥
निजानंदमे रंग दिवाने छोडीं मना मनीं संग रे ॥३॥

पद ४१८.
स्वहित विचारीं रे कैंचें सुख संसारीं रे ॥धृ०॥
क्रियमाण. बहु जन्मांतरिंचें झालें संचित भारी ॥
स्थावरांत कीटक पशु योनी कोण तुझ्या परिहारी ॥१॥
देह गेह धन पशु सुत दारा सर्वहि अनर्थकारी ॥
श्रवंण नयन रसना परि बधिर अंध मूर्ख अविचारी ॥२॥
शुक सनकादिक नारद कवि हरि अंतरिक्ष निर्धारी ॥
पूर्ण सुखें निजपदीं रंगले झाले जगदुद्धारी ॥३॥

पद ४१९.
मानवि जन्मा तो आला विरक्त विषयीं द्दढ झाला ॥
साधुसमागम सुखसदनीं रमतां धणी न पुरे ज्याला ॥धृ०॥
विवेक जिवलग सांगाती वेद जयाचे गुण गाती ॥
आज्ञाधारक रिपु साही शांती वरिली सुखदाती ॥२॥
इंद्रजाळ जसें लटिकें अथवा रवप्निंचीं कटकें ॥
देहादि भास असा भावी मृन्मय पात्र जसें फुटकें ॥२॥
नवधिध भजनें रत दाहाही जीवन श्रीगुरुचे पायीं ॥
सर्व रंगीं एकपणें रंगुनि क्रीडे निजानद-डोहीं ॥३॥

पद ४२०.
शिव भजतां काय धोका कां न कळे लोकां ॥धृ०॥
मोह रजनी सर्व त्यजुनीज सजनिं विजनीं ऐक्य भजनीं ॥ भक्त विराजित वारुनि शोका ॥१॥
शिव पाहतां पाहतां नुरे शिवपण उरे ॥ सत्समागम शास्त्रसंगम जैं हरे ॥ भ्रम द्वैत संभ्रत भवसागरिं हे तारक नौका ॥२॥
शिव सच्चित्सौख्यसिंधु शिव अनाथबंधु ॥ शेष शिणला वेद श्रमला परि नाकळला ॥ अनिर्वाच्य निजरग भरला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP