मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पंचक

पदसंग्रह - पंचक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


[इंद्रवज्रा गण त, त, ज, ग, ग.]

तीर्थाटणींही मन हें भरेना ॥ निवृत्तिशास्त्रीं परि बावरेना ॥
स्थिरेना जरि लावियेलें ॥ त्वां सद्नुरू लाघव थोर केलें ॥१॥
व्रतें वरीना जप तो करीना ॥ तपादि निश्वितचि आदरीना ॥
यज्ञक्रियेचें व्रत शून्य झालें ॥ त्वां सद्नरू० ॥२॥
वर्णाश्रमाचा अभिमान गेला ॥ दिग्मंडळाबाहिर शोक ठेला ॥
ब्रह्मार्पणीं कर्म सुखें निजेलें ॥ त्वां सद्नरू० ॥३॥
द्रष्ठा तया दर्णन रूप नामें ॥ झालीं स्वरूपीं सहजीं अनामें ॥
तें बोलतां करी नयेचि बोलें ॥ त्वां सद्नुरू ॥४॥
मिथ्या प्रतीती जगतीतळाची ॥ चित्सौख्यरगें गति निष्फळाची ॥
संदेह-कारागृह दु:ख गेलें ॥ त्वां० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP