मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
स्फुटश्लोक

पदसंग्रह - स्फुटश्लोक

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


उदासीन चित्तीं असोनी स्वदेहीं ॥ प्रपंचीं तया नाठवें द्वैत कांहीं ॥
विचारी विवेकें निवारी भवातें ॥ जिवन्मुक्त साधू ह्मणावें तयातें ॥४॥
जनाचार चाले विधीयुक्त बोले ॥ सदां सर्वदां सर्वसाक्षी निवाले ॥
न बाधे कदां कल्पना काम जेथें ॥ जिवन्मुक्त साधू म्हणावें तयातें ॥५॥
भजे मत्त मतांत्तरीं एक पाहे ॥ नव्हे खड आखंडता द्दढता हे ॥
न मोडे तदाकार वृत्ती मनातें ॥ जिवन्मुक्त० ॥६॥
ने घे वैभव दु:खदायक नको बोलावया व्युत्पती ॥ ने घे पंडित मार्ग गायनकळा तेही नको श्रीपती ॥
नाहो मारुत धारणा श्रम बहू सिद्धी न मागे तुतें ॥ ज्या सौख्यें मुनि बोधले विचरती ते दे दयाळा मतें ॥७॥
ने घे मायिक साधनें मजप्रती सीतापती वस्तुता ॥ ने घे बाधक साधकांप्रति सदां मोहीत हे मान्यता ॥
न घे इंद्रपदा विरोधचि सदां सर्वापरी हीन तें ॥ ज्या सौख्यें मुनि ॥८॥
नाना साधन बाह्म वेश न करा सारांश शोधा पुरा ॥ देहादीक चराचरास विसरा सच्चित्स्वरूपीं भरा ॥
हा जाणूनि मृषा प्रपंच विसरा सारूनि काष्ठा परा ॥ माथां ठेवुनि पाणि पावन करी त्याचीं पदाब्जें धरा ॥९॥
शोधूनि सारांश असार सारा ॥ सारा न लक्षी तरि तो विषारा ॥
पारा न जाणे श्रुति तर्कवारा ॥ तें जाणणें तूं निज निर्विकारा ॥१०॥
गुणानिर्गुणातीत जो नांदताहे ॥ गुणानिर्गणांतीत होऊनि राहे ॥
सदां पूर्ण जें पूर्ण जो पूर्ण पोह ॥ तया वर्णितां शब्द निशेष पाहे ॥११॥
रवी दाखवी तें कवी पूर्ण जाणे ॥ कवी दाखवी तें रवी तो न जाणे ॥
कवी तोचि रे जो रवीतें प्रकाशी ॥ रवी लोपला पूर्ण ज्याचे प्रकाशीं ॥१२॥
भाबी पाही उपेक्षी तुजजकळि नसें काम तैं तुच्छ लक्षी ॥ गेली लक्ष्मी परिक्षीं तदुपरि सहसा बंधु गेहीं न रक्षी ॥
ऐसे जे पूर्वपक्षी कळत निदसुरें जे तयां काळ भक्षी ॥ तैसा माझा नुपेक्षी दशरथकुळ चिद्भानु जो सर्वसाक्षी ॥१३॥
परहित निवटाया वेश केला नटाया ॥ करिसि किति धिटाया देह आला विष्टाया ॥
स्वहित करि सुटाया काळ आला कुटाया ॥ भज सुरमुकुटा या कर्मबंधा सुटाया ॥१४॥
दे देवा क्षीर मातें म्हणवुनि निरुतें बोलिलें वाक्य बाळें ॥ दीनानाथें दयाळें क्षिरनिधि दिधला त्यासि त्रैलोक्यपाळें ॥
ऐशा सांडूनि लोकांप्रति मुखकमळें मागसी पोटजाळें ॥ नाहीं अद्यापि तृप्ती मर मर मनुजा छी: तुझें तोंड काळें ॥१५॥
जज्मोनियां जन्मकथा न जाणे ॥ जन्मोनिया जन्मविनाश नेणें ॥
जन्मोनियां सार्थक जन्म त्याचा ॥ जन्मोनि झाला निजरूप साचा ॥१६॥
स्वसंकल्पयोगें अहं देह मानी ॥ नसे कल्पना तैं शिवत्वा न मानी ॥
असे स्वर्ग नर्कासि तो पात्र झाला ॥ स्वतवेद्य शस्त्रें करीं छेद याला ॥१७॥
अहो बोलिजे बोल त्याहूनि पांहो ॥ निराळेंचि तें कासया बोलताहो ॥
आतां सूति सांडा उगे मौन राहा ॥ आह्मी मौन आहों त्यजा भावही हा ॥१८॥
जया मौन ना बोलणें ही असेना असें एक आहे हाणाया दिसेना ॥
मनें कल्पिजे त्यासिही जाणताहे ॥ ह्मणे जाण तें त्यासि ग्रासुनि राहे ॥१९॥
तंववरि भव जाची बुद्धि जैं भेदवाची ॥ विविध मति विराली तैं गमे मुक्ति कांची ॥
सहज विचरतांही सा निजानंद डोहीं ॥ विदित विशद संतां जाणणें तेंचि पाही ॥२०॥
जो रंगीं निजरंग रंगुनि महा रंगातितें शोभला ॥ ओसंगीं विलसोनि संगरहितद्भद्रीं असें बैसला ॥
जो विश्वीं वसतो अतेंद्रियपणें सर्वेंद्रियें चेष्ठला ॥ तो हा पूर्णपणीं धरूनि सगुणी रंगेविना रंगला ॥२१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP