मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४५६ ते ४६०

पदसंग्रह - पदे ४५६ ते ४६०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४५६. [उद्धवा शांतवन कर जा या चालीवर]
ते धन्य जगदुद्धारी विद्वज्जन विजनविहारी ॥ध्रु०॥
भक्तांसी भगवद्भजनें भवसागर मृग-जलवत्‌ रे ॥ चिद्विलांस जग नग हेमीं वस्तुत्वें भेदातित रे ॥
अस्तिभाति प्रियरुप आत्मा तो नामरुपाविरहित रे ॥ होउनियां अनुभव ऐसा हरिभजनीं अत्यद्भुत रे ॥१॥
जाळिलें संचित समुळीं ज्ञानाग्निमाजिं निगृती ॥ क्रियमाण पूर्वप्रवाहें विधिपूर्वक कर्में घडती ॥
निर्हेतुक निरहंकारें ब्रह्मार्पण सहजचि होती ॥ प्रारब्ध कलेवर भोगी साक्षी हा ईश्वरमूर्ती ॥२॥
अहि कुंडलवत्‌ तनु पाहतां संतोष विस्मय न वसे ॥ तैसें या विद्वद्वर्या स्वरुपाहुनि आन न भासे ॥
मुत्तिकेवरी कुल्लाळें घट कोठुनि आणविलासे ॥ रंगला या निजरंगीं निरतीशय सदनिं विलासे ॥३॥

पद ४५७. [चला सदर.]
भगवंत भक्त उभयतां समसाम्य ऐक्यस्वरुपीं ॥ध्रु०॥
निरुपमासि उपमा देणें अघटित हें न घडे कदापी ॥ तन्न तन्न ह्मणवुनि ठेलीं श्रुतिशास्त्रें पूर्ण प्रतापी ॥
अनुभवें अनुभविती त्यां परब्रह्म सर्वहि व्यापी ॥ सिंधोदक मेघ वदनें वर्षलें सहज स्वभावें ॥
भागिरथी गंगा यमुना पावल्या विविध धामें ॥ स्वस्वरुपीं मिळतां निळणी ते पुनरपिही मिळतचि जावें ॥
शिव होउनियां शिवभजनीं वर्तती अनुदिन विभवें ॥१॥
लव पळ जळ स्थीर न राहे चालले भजनप्रवाहीं ॥ सत्यंतर पाहतां द्दष्टी अणुमात्र दुसरें नाहीं ॥
देवभक्त सिंधू सरिता दो नामीं एकचि पाहीं ॥ दर्शनें स्नानें पानें पावन जन विजन सदांही ॥२॥
जिवजंतू जड मूढ प्राणी वापिका कूप तडागें ॥ देहबुद्धि कोडुनि ठेली नेणति मीं कवण निजांगें ॥
ह्मणवुनि ते विभक्त झाली या अहं-ममतेच्या योगें ॥ भक्त मुक्त जगदुद्धारी रंगला या निजरंगें ॥३॥

पद ४५८. [राग कलंगडा-राम गोसावि कीं झाला या चा. का. रा. कृ.]
जा जा रे सद्नुरुराज भजा रे ॥ सद्भावें करुनि पूजा रे ॥ न धरुनि भाव दुजा रे ॥
उपदेशिल नीज गुजा रे ॥ तें स्वानुभवें उमजा रे ॥ वाच्यांश समुळ वरजा रे ॥
हा विषवत्‌ विषय त्यजा रे ॥ लावुनि भजन ध्वजा रे ॥ध्रु०॥
परब्रह्म मानवलोकीं ॥ हें अवतरलें अवलोकीं ॥ रविबिंब जैसे उदकीं ॥
बिंबलें एक अनेकीं ॥ परि अलिप्त सर्वहि षोकीं ॥ मळविरहित दिसतां पंकीं ॥
तैसा गुरु स्वरुपें तो कीं ॥ बोलिले भगवद्वाक्यीं ॥ जाणुनि भजिजे भजकीं ॥१॥
आला अंकुर हा ब्रह्मबिजाला ॥ नामरूपा येणें ज्याला ॥ कारण तें हेंचि अजाला ॥ छेदाया कर्मगजाला ॥
बळ कैंचें जीव अजाला ॥ म्हणवुनि श्रीगुरु हरि झाला ॥ रक्षाया चरणरजाला ॥ श्रीरंगानुज तनुजाला ॥२॥

पद ४५९. [चाल-धरविन चक्र करीं श्री,]
त्याला भवसिंधु हो बिंदुवत रे ॥ध्रु०॥
स्वप्नीं गज लागे पाठीं हें तों न पडे जागृत द्दष्टीं ॥ स्वरूपीं निमग्न चित्त रे ॥१॥
जग नग पाहातां वस्तु सुवर्णीं पाहते पाहणेपणही गिळोनी ॥ शुद्ध बुद्ध नित्य मुक्त रे ॥२॥
निज रंगें रंगले संत पूर्ण सत्य ज्ञानानंत ॥ विदेहत्वें विचरत रे ॥३॥

पद ४६०. [चाल-रम गोसावि की]
तो ईश्वरी पुरुष विरळा ॥ ज्याची अगाध हे लीळा ॥ जाणुनि अनित्य संसारा ॥
न घाली उपाधी पसारा ॥ साधन चतुष्टय संपन्न लाभ जोडियला सारा ॥१॥
सच्छास्त्रिंचें प्रमेय मनीं ॥ विचारुनियां अनुदिनीं ॥ अंतर्द्दष्टीं डोळस तो परगुण स्वदोषदर्शंनीं ॥२॥
निजात्मलाभापरिस सखा न मानीं शचिपतिच्याहि सुखा ॥ सहज पूर्ण निजानंदीं प्रत्यय रंगला देखा ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP